Skip to main content

मिपा - घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धा २०१३ - निकाल

लेखक संपादक मंडळ यांनी शुक्रवार, 04/10/2013 16:56 या दिवशी प्रकाशित केले.
मिपाकर मित्रांनो, या वर्षी आपण मिपा - घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धा २०१३ ही आपल्या घरच्या बाप्पाच्या भोवतीच्या सजावटीची स्पर्धा घेतली होती. मध्यंतरीच्या काळात सर्व्हर प्रॉब्लेम्समुळे निकाल तयार करायला उशीर झाला. पण आता सगळी विघ्ने दूर झाली आहेत आणि या स्पर्धेचा निकाल घोषित करताना परीक्षक आणि संपादक मंडळाला अत्यंत आनंद होत आहे. स्पर्धेला उत्तम प्रतिसाद मिळाला. मिपा मधे मधे बंद पडत असूनही एकूण ३२ लोकांकडून घरच्या गणेश सजावटीची छायाचित्रे आली. सगळीच अतिशय उत्तम होती.

मित्रास पत्र (सन 2045- एक झलक)

लेखक बबन ताम्बे यांनी शुक्रवार, 04/10/2013 15:02 या दिवशी प्रकाशित केले.
ब. र. ता. दिनांक : 8 जानेवारी 2045 प्रिय मित्रा , आज 8 जानेवारी 2045. बघता बघता ८० वय झाले . जुलै २०१३ साली तारेची अखेर झाली आणि २०२३ साली पोस्ट ऑफिस चे ब्यान्केत रुपांतर झाले . पत्र पाठवणे वगैरे कालबाह्य झाले म्हणून सरकारने पोस्त ऑफिसच बंद करायचा निर्णय घेतला .

मला जगायचंय !

लेखक प्रमोद देर्देकर यांनी शुक्रवार, 04/10/2013 13:37 या दिवशी प्रकाशित केले.
पुन्हा कधी तरी जाग आली ..... शरीर कशात तरी गुंडाळलेले .....हळू हळू नजर वर केली मला कळून चुकले मी इस्पितळात आ. य. सी. सी. यु. मध्ये आहे फक्त डोळ्यांची हालचाल शक्य ... डोक्यात विचारांचे काहूर माजलेले.... डोक्यात घणांचे घाव पडतायत..... घरुन निघालो तेव्हाच रेनकोट घालायला हवा होता माझी बाईक पुलावर आली आणि पाऊस तांडव करत बरसू लागला. बाईक बाजूला उभी करून डिकीत ठेवलेला रेनकोट काढेपर्यंत मी साफ भिजून गेलो होतो...... तेवढ्यात मागून रो रो करीत येण्यारया ट्रकचा आवाज ......अरे हे काय मी अलगद हवेत तरंगतोय ..... माझी बाईक ची सुद्धा तीच गत.....

"लर्न मराठी फ्रॉम इंग्लीश, हिन्दी ! ऑनलाईन अ‍ॅंड फ्री !!" माझा उपक्रम

लेखक कौशिक लेले यांनी शुक्रवार, 04/10/2013 12:22 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार. मी कौशिक लेले, मी २ वेबसाईट (ब्लॉग) तयार केल्या आहेत - एक इंग्रजीमधून मराठी शिकण्यासाठी आणि दुसरा हिन्दीमधून मराठी शिकण्यासाठी. http://kaushiklele-learnmarathi.blogspot.in/ http://learn-marathi-from-hindi-kaushiklele.blogspot.in/ या ब्लॉग मध्ये देवनागरी लिपी, प्राथमिक व्याकरण ( नाम, सर्वनाम, काळ, अव्यय ई. ) पासून सुरुवात करून लहान वाक्यांपर्यंत आणि पुढे पूर्ण संभाषण, रोजच्या भाषेत वापरले जाणारे short forms इथपर्यंत सर्व आहे.

फ्लावरच्या करंज्या

लेखक kalpana joshi यांनी शुक्रवार, 04/10/2013 12:13 या दिवशी प्रकाशित केले.
फ्लावरच्या करंज्या - अर्धा किलो किसलेला फ्लावर ,अर्धा चमचा हळद ,एक चमचा तिखट ,दोन हिरवी मिरचीचे तुकडे ,थोडी चिरलेली कोथिंबिर ,अर्धा चमचा मीठ ,अर्धा चमचा साखर . इत्यादी . घट्ट मळलेली कणिक . अर्धा किलो तेल . फ्लावरची वरील जिन्नस घालून वाफालेली भाजी करून थंड होऊ द्यावी . हे सारण नेहमी सारखे करंज्या करतो तसे भरून करंज्या करणे . व तळणे . गरम serve करणे .

दोष

लेखक सार्थबोध यांनी शुक्रवार, 04/10/2013 10:09 या दिवशी प्रकाशित केले.
मिसळलो त्यांच्यात ना मी, पाडले एकटे मला पाहून संधी; काढून वेळ, दोष लावला मला ll १ ll दिवसातले डावपेच रात्री, टाकायचे ठरवले तयांनी रात्र त्यांची चोरली मी, हा दोष लावला मला ll २ ll सभ्य कृतीत चौर्य, काय लागावी झोप तयांना स्वप्ने तयांची चोरिली मी, हा दोष लावला मला ll ३ ll फेडले वागलेले त्यांनी, सोने-पैसा लुप्त झाला परीस त्यांचा चोरला मी, हा दोष लावला मला ll ४ ll सजा तयांना द्याया ईश्वरे, योजून धाडिले संकटाला कृपा ईश्वराची चोरली मी, हा दोष लावला मला ll ५ ll झाले रिक्त कर्माने ते, परी मुळी ना पीळ गेला चोरले मी पुण्य त्यांचे, हा दोष लावला मला ll ६ ll पितळ

व्यथा

लेखक psajid यांनी गुरुवार, 03/10/2013 14:38 या दिवशी प्रकाशित केले.
गरिबीचा आसूड दुनिया माझी न्हवं, पायात डोकं दुमडून घ्यावं .....! अछुत जीव मनास ठावं, क्षुद्र मराण भाळी ल्यावं .....! हक्काचं मागणं घोर जीवा लावं, शिक्षेच्या झाकोळात मुजून जावं .....! आक्रीत करण्यां मन वेडं धावं, चाकोरीबाहेर पाऊल मरणास भ्यावं .....! आश्रूंभिजल्या भूमीच्या गंधात न्हावं, 'कर' नभाकडं मातीत एकरूप व्हावं .....! श्री. साजीद यासीन पठाण
काव्यरस

ऐका इंटरनेट देवा तुमची कहाणी - २ (निर्मात्याबद्दल थोडेसे)

लेखक नानबा यांनी गुरुवार, 03/10/2013 12:47 या दिवशी प्रकाशित केले.
भाग- १ इंटरनेटचे जनक - प्रो. लिओनार्ड क्लाईनरॉक s मॉडर्न इंटरनेटचे जनक म्हणून ज्यांचा सगळ्यात आधी उल्लेख करता येईल अशी व्यक्ति म्हणजे प्रोफ़ेसर लिओनार्ड क्लाईनरॉक. जगाला ही अद्वितीय देणगी देणा-या क्लाईनरॉक यांचा जन्म १३ जून, १९३४ रोजी न्यूयॉर्क शहरात एका ज्यू कुटूंबात झाला.

एक भेट....

लेखक mohite jeevan यांनी गुरुवार, 03/10/2013 10:48 या दिवशी प्रकाशित केले.
रस्त्यात सिंग़्नल पडला आणि मी ग़ाडी थांबवली, आज मी सुट्टी काढली कारण माझा मित्र उमेश कॅन्सरच्या शेवटच्या स्टेपला आहे,कालच त्याच्या भावाने मला सांग़ितले.लहानपणीचा जीवलग मित्र पण, तो राहीला अशिक्षीत आणि मी शाळा शिकून नोकरी. खुप दिवस त्याचा माझा सर्पंक नव्हता, मी नोकरीसाठी ग़ाव सोडले आणि त्याने ग़ावात राहुन शेती केली,ग़ावापासुन जवळच्याच शहरातील हॉस्पिटल मध्ये तो आहे, पण शेवटची घटका मोजत आहे,आसं मला कळाले. सिंग़्नल चालु झाला, मी ग़ाडी हाँस्पिटलच्या दिशेने वळवली,भव्य आशा हाँस्पिटलच्या आवारात मी ग़ाडी पार्कीग़ केली,आणि इकडे तिकडे नजर फिरवली,समोर हिरवळीवर रुग़्णाना त्याचे नातेवाईक खाऊ भरवत होते,तर काही व्हील चे