Skip to main content

पगडी

लेखक मनीषा यांनी शनिवार, 30/11/2013 15:54 या दिवशी प्रकाशित केले.
गाव तिथे चावडी चावडी तिथे वावडी | गोर्‍या गोर्‍या हातात सखु भरते बांगडी | लगबगीने चालताना सांडली तीची बुगडी | पायवाटेच्या धुळीने माखली हिरवी साडी | डोईवरती पदर घेता डोळ्यात टोचली काडी | उन्हाची काहीली काळजास घरं पाडी | ओरडून ओरडून कोणी देतो पहा दवंडी | गुलाल, बुक्का उधळीत दंडवत घाली बेगडी | आंधळ्याच्या हातात होती एक तागडी | पण नवलच घडले पडली दाजीबाची माडी | सांगोवांगीचीच कहाणी ऐकते सारी वाडी | गाव बोले चांगभलं नवस देवाचा फेडी | कशी , कुठे, कधी, कुणी जोडली कडीला कडी | रंगला कलगी-तुरा मिरवते पुणेरी पगडी |

शीळा घास

लेखक वैभवकुमारन यांनी शनिवार, 30/11/2013 14:46 या दिवशी प्रकाशित केले.
शीळा घास भीक मागत दारापुढे भिकारीण आली फाटके पोलके अन जिरलेली चोळी सुकलेल्या ओठी अश्या भाकारीच्या ओळी ठीगळांची नटलेली भुकेलेली झोळी भीक मागत दारापुढे भिकारीण आली -------1 कपाळ नीस्तेज पोटी हातभर खोली 'आशा' बाळ्गुनी पायी अंगठा ती घोळी उन्हाचे चटके त्यात डोळी कड ओली शिळ्या घासासाठी दारी उभी अशी भोळी भीक मागत दारापुढे भिकारीण आली----2 माय -माय करतच अनवाणी आली भान साऱ हरपुनी भुकेसाठी आली आली आली अशी एक भिकारीण आली शीळा घास पडे झोळी दुसऱ्या दारी गेली भीक मागत दारापुढे भिकारीण आली वैभव कुलकर्णी

'हरवलेलं गाव'

लेखक वैभवकुमारन यांनी शनिवार, 30/11/2013 14:16 या दिवशी प्रकाशित केले.
'हरवलेलं गाव' माझ्या घरातल्या अंगणाला नाही शेणसडा गेली तुळस झीजुन तया नाही पाणी घडा नाही शाळा ती पडकी कुठे दिसत नाही फळा आता नाही वनभोजन म्हणून रुसलाय मळा गेला पार तो खचून घेतोय निर्जानांच्या झळा कमी झाली वटपूजा नाही दोऱ्याचा तो लळा गेली पाखर उडून पडलाय ओसाड हा वाडा फोडे बुरुज हंबरडा डोळी चार चार धारा गेल 'जात' अडगळीत गेला खुंट्याला तो तडा आता दाण्यालाही लागलाय बघा गीरनीचा ओढा नाही पडे शब्द कानी "आज वासुदेव आला" नाही दारावर आता बघा "गारेगारवाला" वैभव कुलकर्णी

शिक्षकांची आठवण!!

लेखक वडापाव यांनी शनिवार, 30/11/2013 10:55 या दिवशी प्रकाशित केले.
नुकताच शाळेचा ब्लॉग वाचला... आणि एकदम शाळेतल्या आठवणी जाग्या झाल्या. मित्र-मैत्रीण आठवले, मैदान आठवलं, आपण केलेली मस्तीही आठवली. पण प्रकर्षाने आठवण आली, ती शिक्षकांची... आपल्या आवडत्या, चांगल्या शिक्षकांची आणि काही विनोदी शिक्षकांची सुद्धा. आम्हाला पहिली ते चौथी पराडकर बाई वर्गशिक्षिका होत्या. आमच्या वर्गाला चित्रकला सोडून बाकी सगळे विषय त्याच शिकवायच्या. सगळ्यात कमी गृहपाठ देणा-या आणि सगळ्यात कमी मारणा-या या आमच्या लाडक्या बाई होत्या. चित्रकलेला इंदुलकर बाई होत्या. ब वर्गाला मोर्जे बाई होत्या. त्यांच्या हातात कायम पट्टी असायची.

जर संभाजी महाराज ........

लेखक बाप्पू यांनी शनिवार, 30/11/2013 00:18 या दिवशी प्रकाशित केले.
संभाजी महाराजांच्या पराक्रमाबद्दल बरेच काही वाचले आहे आणि अजूनही वाचत आहे. शिवाजी महाराजांचे स्वराज्य समर्थपणे पेलणारा हा राजा काहीसा उपेक्षित राहिल्याची खंत मनाला लागत राहते… कारण आजही कित्येक लोकांना त्यांचे कार्य आणि बलिदान माहीतच नाहीये. काहींना तर फक्त "रंगेल" आणि "रगेल" या दोनच शब्दात संभाजी महाराजांचे वर्णन करता येते… आपल्या अल्पश्या आयुष्यामध्ये देखील त्यांनी इंग्रज फ्रेंच मोगल ई सत्तांना आव्हान दिले आणि हिंदवी स्वराज्य हे परकियांच्या हातात जाण्यापासून वाचवले. संभाजी महाराज हि फितुरीमुळे औरंगजेबाच्या हाती सापडले.

मदत....

लेखक जयंत कुलकर्णी यांनी शुक्रवार, 29/11/2013 16:51 या दिवशी प्रकाशित केले.
मला माझ्या काही पुस्तकांचे ई-बुक विक्रीस उपलब्द्ध करायचे आहे. मी काही कंपन्यांची सॉफ्टवेअर बघितली व त्यांच्या साईटही पाहिल्या. काहीजण म्हणतात डी एम आर वापरु नका तर काही म्हणतात त्याला पर्याय नाही. मला पायरसी होणार नाही असे काहीतरी पाहिजे. अर्थात मला कल्पना आहे ते १०० % होउ शकत नाही पण ८० % झाले तरी खूप आहे..... आपल्या मिपावर अनेक सॉफ्टवेअर तज्ञ आहेत त्यांनी जर थोडा वेळ काढून अभ्यास करुन काय वापरणे ठीक राहील याचा सल्ला दिला तर मला चांगली मदत होईल..... ती विनंती करण्यासाठी हा धागा...अर्थातच इतरांनाही त्याचा उपयोग होईल... जयंत कुलकर्णी

केला इशारा जाता जाता!

लेखक शशिकांत ओक यांनी शुक्रवार, 29/11/2013 14:40 या दिवशी प्रकाशित केले.
केला इशारा जाता जाता ... मि. वॉटसनकडे पहात शेरलॉक होम्सने डाव्या हाताच्या पकडीतील पाईपमधून लांबलचक झुरका घेतला. धुराचा भपका सोडत बारीक नजरेतून... ... बिंदू, अरुणा इराणी वा तत्सम हलकट जवानीची हूल दाखवणाऱ्या बिल्लो राण्यांच्या महिला मंडळाकडून केलेल्या इशाऱ्याची वाट पाहत असलेल्या मर्दांच्या एका हातात लाल पाण्याचा गिलास तर दुसर्‍या हाताच्या मुठीत कडक सिग्रेटची कांडी. ओठांचा चंबू करून धुराच्या गोल गोल रिंगा काढून आपापला धाक जमवणाऱ्या कधी अट्टल पटाईतांकडे, तर कधी शेरलॉक होमला आदरपूर्वक पहात असताना आरोग्यास हानिकारक संवैधानिक उदघोषणा 'पचका' करून जातात.

कांदे पोहे … एक अनुभव…

लेखक चिन्मय श्री जोशी यांनी शुक्रवार, 29/11/2013 08:41 या दिवशी प्रकाशित केले.
झालं काय होतं कि आमच्या लग्नाची घाई झाली होती घरच्यांना.... आणि तसं बघायला गेलं तर सगळ्या "आवडत्या" मैत्रिणींच्या लग्नाचं जेवण पण आम्ही पचवलं होता (दुःख पचवलं या अर्थी पचवलं).... म्हणून ठरलं कि आता बघायच्या कार्यक्रमांना सुरुवात करायची आणि मग पत्रिका, फोटो (हा माझ्या आज पर्यंतच्या काढलेल्या सगळ्या फोटोत सगळ्यात जास्त पैसे देऊन काढलेला सगळ्या वाईट फोटो होता... ) इत्यादी तयारी झाली आणि शुभारंभ (????) झाला....

मैत्री......एक आगळंवेगळ नातं

लेखक अनिल तापकीर यांनी गुरुवार, 28/11/2013 23:50 या दिवशी प्रकाशित केले.
(सदरचा लेख याला कविता म्हणावी की निबंध काही समजत नव्हते माझी मुलगी आरती दहावित शिकते तिने स्वता तयार करुन वाचयला दिला नि थक्क झालो. तिचे हे पहिलेच लेखन वाचुन खुप आनंद झाला. पहा आपल्याला कशी वाटते.) कु. आरती आनिल तापकीर , भारती विध्यापीठ कन्या प्रशाला , कोथरूड ,पुणे गाव- मुलखेड . तु मैत्रीण नाहीस , मैत्रीतला पहिला शब्दच तु आहेस . तु एक दिवस जरी शाळेला आली नाहीस कि असं की काही तरी घरीच विसरले . तुझ्यासारखी मैत्रीण मिळण्यासाठी नशीबच लागते . मैत्री करण्यासाठी प्रेम लागतं . तू माझं जीवनच बदलून टाकलं आहेस . मनातलं स्वप्न साकार करण्याची जिद्द दिली आहेस.