Skip to main content

<नवविवाहिताचे बाबांस पत्र>

लेखक राजेश घासकडवी यांनी मंगळवार, 03/12/2013 06:01 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा (शुद्धलेखनाचा दर्जा मूळ लेखनाबरहुकुम ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे) प्रिय बाबा, प्रत्येक मुलाप्रमाणे मी ही लग्नाबद्द्ल लहानपणापासुन खुप उत्सुक होतो. माझ्या बेबी डॉल, ड्रीम गर्लची स्वप्ने रंगवत होते. पण आज मला जाणिव होते आहे की लग्न म्ह्णजे फक्त अमर्याद सेक्स न्ह्वे. लग्न म्हणजे केवळ तुमच्या लाडक्या व्यक्ति सोबत हवे तेव्हा हवे ते करणे न्हवे.

टुक टुक! आमची महाराणी तुमच्यापेक्षा श्रीमंत!

लेखक हुप्प्या यांनी सोमवार, 02/12/2013 21:53 या दिवशी प्रकाशित केले.
भारताच्या सर्वोच्चपदी विराजमान असणार्‍या महात्यागी, महासाध्वी, महाज्ञानी महाराज्ञी सोनियाजी गांधी ह्या इंग्लंडच्या राणी एलिझाबेथपेक्षाही श्रीमंत असल्याचा निष्कर्ष एका पहाणीत काढला गेला आहे. चला!

साधीशीच माणसं ..

लेखक तुमचा अभिषेक यांनी सोमवार, 02/12/2013 21:38 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळी नेहमीपेक्षा वीसेक मिनिटे उशीराच घराबाहेर पडलो. ऑफिसला जायचे नसून ऑफिसच्याच कामासाठी इतरत्र जायचे होते. पुढची ट्रेन पकडायला हरकत नव्हती म्हणून बिछान्यातच पंधरा-वीस मिनिटे जास्तीचा मुक्काम ठोकला. तयारी मात्र नेहमीच्याच वेगाने झरझर आटोपून, मोबाईलमध्ये ट्रेनचा टाईम आणि आता झालेली वेळ, दोन्ही चेक करून रमतगमत चाललो तरी वेळेच्या आधी स्टेशनवर पोहोचेन अश्या हिशोबाने निघालो. पावले मात्र सवयीनेच झपझप पडू लागली, नव्हे किंचित जास्तच उत्साहाने.

पुखेत-पट्टाया-बँकॉक टुर - दिवस तिसरा

लेखक दिपक.कुवेत यांनी सोमवार, 02/12/2013 18:05 या दिवशी प्रकाशित केले.
========== १/१, १/२, ========== दुसर्‍या दिवसाची सकाळ अतीशय प्रसन्न उगवली. आज पुर्ण दिवस समुद्राच्या सान्नीध्यात जाणार होता. पॅटॉंग बीचवर पॅरॅसेलींग करताना वरुन दिसणारं निळशार, पारदर्शी पाणी आज जवळुन पहायला/अनुभवायला मिळणार होतं म्हणुन आम्हि दोघं खुप उत्साहित होतो. काल ह्या सफरीचे पैसे भरताना दोन पर्याय होते......मोठि लाँच (कॅपॅसीटि साधारण १००-१५० माणसं) किंवा छोटि स्पीडबोट (कॅपॅसीटि साधारण ३०-३५ माणसं).

~आज मला शब्द व्हायचय~

लेखक वैभवकुमारन यांनी सोमवार, 02/12/2013 17:29 या दिवशी प्रकाशित केले.
~आज मला शब्द व्हायचय~ आज मला शब्द व्हायचय पुस्तकात बसून अर्थात न्हायचय मग अरण असो कि सल असो सगळ्यांनी फक्त मलाच पहाचय ……. आज मला शब्द व्हायचय कधी कोणाच्या आठवणीत तर कधी कोणाच्या बातवणीत खरच मला कवितेत जायचंय शब्द बनून ओठांवर रहायचय ……. आज मला शब्द व्हायचय भूक माझी फारच थोडी फक्त मला अर्थांना खायचय रेघा रेघांचे शरीर फक्त सल्लज्ज अश्या एका ओळीत रहायचय ……. आज मला शब्द व्हायचय प्रेम पत्र असो मी मृत्यूपत्र असो मला कुन्या काळजात शिरायचं गेलो जरी मी पाण्यात वाहून एक अर्थ म्हनून मला उरायचं …….आज मला शब्द व्हायचय ~वैभव कुलकर्णी ~

मेकिंग ऑफ सिव्ह्गडावरील भजी

लेखक सुज्ञ माणुस यांनी सोमवार, 02/12/2013 17:25 या दिवशी प्रकाशित केले.
मेकिंग ऑफ सिव्ह्गडावरील भजी आजवर ट्रेकचे अर्धशतक झाले. कुठलाही विकांताला ट्रेकला चला असे कोणीही म्हटले की आम्ही एका पायावर तयार! कुठलेही ट्रेक चे ठिकाण असो, काय फरक पडतोय? काय फरक पडतोय ??? फरक तो पडता है भाई, ट्रेकिंग लोकेशन सिलेक्ट करनेमे हमेशा सावधांनी रखो. ! नाहीतर "तू प्लान कर. मी येतो" असे म्हणून तुम्ही एका पायावर तयार व्हायचा ट्रेकला आणि समोरचा पठ्ठ्या तुम्हाला सिव्ह्गडावर न्यायचा. देव करो आणि असले वाईट प्रसंग न येवोत तुमच्यावर! सिव्हगड वा सिंहगड जायचे म्हणजे फुल टू डोके सरकते. आणि त्यात रविवारी जायचे म्हणजे आवराच ! असो, आपले काही वैर नाहीये सिव्ह्गडाशी वा तानाजीशी.

नवविवाहितेचे आईस पत्र ........

लेखक युगन्धरा@मिसलपाव यांनी सोमवार, 02/12/2013 17:22 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय आई, प्रत्येक मुलिप्रमाणे मी ही लग्नाबद्द्ल लहानपणापासुन खुप उत्सुक होते. माझ्या राजकुमाराची स्वप्ने रंगवत होते. पण आज मला जाणिव होते आहे की लग्न म्ह्णजे फक्त गुलाबी स्वप्ने न्ह्वेत. लग्न म्हणजे केवळ तुमच्या लाडक्या व्यक्ति सोबत राहाणे न्हवे. तर त्याहि पलिकडे लग्न म्ह्णजे जबाबदार्या, त्याग आणि तडजोडी यांवर अवलंबुन असलेली एक संस्था आहे. मी मला हव्या तितका वेळ झोपु नाहि शकत. मला सर्वांच्या आधी उठणं गरजेच आहे. मी गबाळयासारखी घरभर फिरु नाहि शकत. मी टापटीप राहाणं गरजेच आहे.

युद्धकथा १०- फेलिक्स कर्स्टन-हिमलरचा डॉक्टर.

लेखक जयंत कुलकर्णी यांनी सोमवार, 02/12/2013 12:01 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रहो, दहा युद्धकथा लिहायचे वचन आज या कथेने पूर्ण होत आहे. आपण वेळोवेळी दिलेल्या प्रतिक्रियांसाठी मी आपले आभार मानतो. अशाच एका प्रतिक्रियेत कोणीतरी फेलिक्स कर्स्टनबद्दल लिहा अशी सूचना केली होती. ती सूचना मान्य करुन या लेखमालिकेतील हे शेवटचे पुष्प गुंफत आहे. मागची आठवी होती. नववी या अगोदरच लिहिली आहे पण ती या मालिकेत घालायची राहिली होती. म्हणून कदाचित ही नववी पाहिजे असे काही जणांचे म्हणणे पडेल म्हणून हा खुलासा... असो......तर ही शेवटची कथाही आपल्याला आवडेल अशी आशा व्यक्त करतो. या गोष्टीसाठी जोसेफ केसेलच्या द मॅजिक टच या पुस्तकाचा व यु एस् आर्मीच्या काही कागदपत्रांचा वापर करण्यात आला आहे.

कविता - एक खेळ

लेखक जेपी यांनी सोमवार, 02/12/2013 10:58 या दिवशी प्रकाशित केले.
आम्हाला कविता करन कधी जमलच नाही . पण कविता वाचायला भारी आवडत. काही गोड प्रसंगी इतरांच्या कविता स्वतच्या नावावर खपवायचा प्रयत्न हि केला . पूर्वी एका वर्तमान पत्रात कवितेचा एक खेळ यायचा . तोच खेळ येथे देत आहे . या खेळाचे नियम फार सोपे आहेत . मी तुम्हाला काव्याच्या दोन पंगती देत आहे . तुम्ही प्रतिसादात कमीतकमी दोन जास्तीतजास्त चार ओळी लिहा . नवरसा पेकी कुठल्या हि रसाच्या आसु द्या . फक्त वरच्याशी जुळणाऱ्या आणि खालच्याला पूरक आसु द्या . मी खाली माझ्या दोन ओळी देत आहे . " माझ्या मनात तुझे येणे -जाणे, कठीणनच आहे शब्दात पकडणे "