अळीवाचे लाडू
थंडीने तिचा गुलाबी रंग दाखवायला सुरुवात केली नाही तर इथे आम्हा खवय्यांची season special list तयार होऊ लागली. अहो काय काय यादी करावी तितकी कमीच. त्यात आवडत्या अळीवाच्या लाडवांचा क्रमांक प्रथम. करायला सोप्पा खायला त्याहून सोप्पा आणि एकदम healthy अशा या लाडवाने यादीची सुरुवात करूया.
साहित्य:
१ वाटी खवलेला नारळ
३/४ वाटी चिरलेला गूळ
१/४ वाटी अळिव
२ छोटे चमचे वेलची पूड
कृती:
१. अळीव नारळाच्या पाण्यात अथवा साध्या पाण्यात ४-५ तास भिजवावेत. साधारण अळीव भिजतील इतके पाणी घालावे व झाकून ठेवावे.
२. भिजवलेले अळीव, गूळ आणि नारळ एकत्र करावे व मंद आचेवर शिजण्यास ठेवावे.
मिसळपाव