Skip to main content

अत्तर

लेखक मनीषा यांनी शुक्रवार, 13/12/2013 13:36 या दिवशी प्रकाशित केले.
बादशहांच्या दरबारात खास कार्यक्रमाचे आयोजन केले होते. आमंत्रितां समोर दौलतीची शान मिरविण्यासाठी बादशहा, बीरबल समारंभाच्या तयारीकडे जातीने लक्ष पुरवित होते. काही नोकर चांदीच्या अत्तरदाण्या घेऊन आले. बादशहांना पाहून सलाम करत होते. या गोंधळात एकाच्या हातातील अत्तरदाणी पडून अत्तर उंची गालीचावर सांडले. न राहवून बादशहाने ते चटकन बोटाने टिपून आपल्या अंगरख्याला लावले. बीरबलाकडे पाहताच बादशहा खजील झाले. बीरबल मिश्कीलपणे हसत होता. बादशहाने रागारागाने आपल्या अधिकार्‍याला हुकूम फर्मावला, की तेथे असलेल्या हौदात पाण्याऐवजी अत्तर भरा. हौदात अत्तर भरले जात असताना बीरबलाकडे अभिमानाने बघत बादशहांनी विचारले, “क्यू बीरबल क्या खयाल हैं ?" क्षणभर थांबून बीरबल उत्तरला, "शहेनशहा, बुंद से गई, वो हौदसे नहीं आती।" ( शतशब्द कथा )
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 3582
प्रतिक्रिया 10

प्रतिक्रिया

होऊ दे अत्तराला खर्च

रणजीतसिंहांची कंजुषी हीच गोष्ट एक सत्य कथा म्हणून शिख महाराजा रणजितसिंह यांच्याबाबत फार वर्षापूर्वी ऐकिली होती. त्या कथेत एक परदेशी व्यापारी त्यांच्या दरबारात अत्तरे विकावयास आला होता. राजानेही अकबराच्या बाबतीत लिहिले आहे तेच केले. जमिनीवर पडलेला अत्तराचा थेंब (बुंद) राजाने उचलून वापरला.त्यावर तो व्यापारी कुत्सित पणे हसला. (आणि कथेच्या शेवटी तो म्हणाला की जमिनी वरचा एक थेंब टिपण्याच्या क्रियेमुळे आपली गेलेली इज्जत अत्तराने हौद भरल्याने परत येणार नाही.) बुंद से गई, वो होजसे नहीं आती.

आओ....ते अत्तराला त्याल कोन्चं वापारलं??? येक नम्ब्री? का दोन नम्ब्री??? त्ये सांगा हो! ;)

लेखनविषय आपण बालकथा लिहिले आहे, जर लिहिताना हेतू बालकथा लिहायचाच असेल तर असे १०० शब्दांत बांधू नका. इथे कोणाला आवडो न आवडो बालगोपाळांना काय कसे वाचायला आवडेल असा विचार करून खुलवून लिहा. पु ले शु.