Skip to main content

माज़ा अस्तित्वा - तंजावर मराठीतून पॉडकास्ट

लेखक शशिकांत ओक यांनी शुक्रवार, 21/02/2014 12:56 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रांनो, 1 मराठी भाषेचा अभिमान आपल्याला महाराष्ट्रात राहून साहजिक वाटतो. तसाच किंबहुना त्यापेक्षा काकणभर सरस अभिमान व कामगिरी 'जया' यांनी 'माज़ं अस्तित्व' या नावाने पॉडकास्ट सुरू करून केली आहे. आपली बोली भाषा टिकवून त्यातील विविध भाग रंजक व अभिनव प्रकारे कशी वापरता येतील असे सुचवणारे पर्याय शोधले आहेत.

वळुन जे बघतेस त्याचा त्रास होतो

लेखक अजय जोशी यांनी शुक्रवार, 21/02/2014 12:22 या दिवशी प्रकाशित केले.
स्पर्श जितका बोलका हृदयांस होतो पानगळ असली तरी मधुमास होतो तू निघुन जातेस याची खंत नाही वळुन जे बघतेस त्याचा त्रास होतो मित्र म्हणणे जवळचा हे खास नाही ते तसे होईल तेंव्हा खास होतो तेज देण्या केवढा बघ सूर्य जळतो फायदा नात्यातला चंद्रास होतो केवढी माया तुझी आहे प्रसिद्धी स्पर्शतो क्षणभर तुला, तो दास होतो बंधने तुडवीत जातो सहज सारी हा तुझ्याइतका मलाही भास होतो प्रेम इतके काय कामाचे जिथे की, आपला वापर 'अजय' सर्रास होतो
काव्यरस

कश्या कश्याला मुकलो ते...

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी शुक्रवार, 21/02/2014 06:48 या दिवशी प्रकाशित केले.
आठ दिवसानी टुर वरुन घरी आलो.. समोर तु उभी प्रसन्न वदना. मोकळा केश संभार. काजळ कोरलेले आतुर नयन आठ दिवस ऑफिस कामाशिवाय काहिच सुचत नव्हते.. तुला पाहिले अन उमगले. कश्या कश्याला मुकलो ते...

भाई नाहीतर भाभी!

लेखक हुप्प्या यांनी शुक्रवार, 21/02/2014 04:33 या दिवशी प्रकाशित केले.
जातिवंत भ्रष्टाचारी, नराधम, असंस्कृत, गलिच्छ लालूप्रसाद यांनी भ्रष्टाचाराच्या आणि घराणेशाहीच्या कलंकांना एक नवी उंची गाठून दिली यात मला तरी शंका वाटत नाही. स्वतःला तुरुंगात (अर्थात व्ह्यायपी कोठडीत जिथे तुरुंग अधिक्षक स्वतः तंबाखू मळून द्यायचे म्हणतात!) डांबल्यावर न डगमगता आपल्या अर्धांगीला मुख्यमंत्री बनवले. पुण्याचे सुप्रसिद्ध भ्रष्टाचारी सुरेशभाई कलमाडी हेही लोकसभा लढवण्यास उत्सुक आहेत. पण काँग्रेसने त्यांना पक्षातून निलं बित केले आहे. त्यामुळे तसे होणे अवघड वाटते आहे. मग आता त्यांची भार्या मीराभाभी अर्थात पुण्याच्या राबडीदेवी आता इच्छुकांच्या रिंगणात उतरल्या आहेत.

जगप्रसिद्ध प्राचीन हिंदू मंदिरांचा देश, कंबोडिया : १ : संक्षिप्त इतिहास

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी शुक्रवार, 21/02/2014 01:49 या दिवशी प्रकाशित केले.
================================================================== जगप्रसिद्ध प्राचीन हिंदू मंदिरांचा देश, कंबोडिया : १... २... ३... ४... ५... ६... ७...

दिपक कुवैत ह्यांच्या सोबत डोंबिवली कट्टा.....

लेखक मुक्त विहारि यांनी गुरुवार, 20/02/2014 21:59 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय मिपाकरांनो, आधी कळवल्या प्रमाणे, श्री.दिपक कुवैत ह्यांच्या बरोबर कट्टा करायचे ठरले आहे. तारीख मात्र १ मार्च किंवा २ मार्च असेल. बहुदा २ मार्च असलेली बरी , असे मला वाटते. कारण १ मार्चला वल्लींबरोबर घारापुरी लेणी बघीतल्या नंतर त्याच दिवशी कट्टा करण्यापेक्षा दुसरा दिवस असलेला बरा, असे माझे मत आहे. ठिकाण : नंदी पॅलेस खर्च : आपापला (दिपक कुवैत स्पॉन्सर करत असतील, तर फार उत्तम) खाणे-पिणे : सामिष आणि उचित पेयांसकट वेळ : संध्याकाळी ठीक ७:३० (जास्त उशीर केला, तर जागेची मारामार आणि उगाच २/३ तास तिष्ठत बसावे लागते.) चला तर मग, तारीख ठरवा.

तेलंगणा नंतर स्वतंत्र विदर्भ मागणीस जोर येणार का ????

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी गुरुवार, 20/02/2014 15:28 या दिवशी प्रकाशित केले.
तेलंगणा नंतर स्वतंत्र विदर्भ मागणीस जोर येणार का ???? फेस्बुकावर तर स्वतंत्र विदर्भ मागणीस समर्थन चालू आहे। शिवसेना आणि मनसेने निव्वळ आपली राजकीय गोची होईल म्हणून स्वतंत्र विदर्भ राज्यनिर्मितीला विरोध करू नये...मुंबईत बसून गडचिरोलीची समस्या सोडविता येत नाही...असे एक मत आहे तर पूर्वी नेहरूंनी बेरारात घातले, मग अत्रे, डांगे यांनी महाराष्ट्रात घातले परंतु विदर्भातील शेतकर्याची उपेक्षा मात्र थांबली नाही...धरणे झालीत परंतु कालवे, नाही...कापूस विदर्भात आणि सुतगिरण्या मात्र पश्चिम महाराष्ट्रात...नामशेष होत चाललेल्या कापूस आणि संत्रा लागवड क्षेत्राकडे कोणत्या जाणत्या राजाने आजवर लक्ष दिले??

जेव्हा फारुकी हरवतो...

लेखक स्वाती दिनेश यांनी गुरुवार, 20/02/2014 13:22 या दिवशी प्रकाशित केले.
फारुकी म्युनशनला एका कॉन्फरन्ससाठी येणार आणि मग पुढे चार दिवस फ्रांकफुर्टात आमच्याकडे मुक्काम करणार असे समजल्यापासून आम्ही फार आनंदलो होतो कारण आता गाणी, किस्से,गप्पागोष्टी ह्यात आमचे चार दिवस मजेत जाणार याची खात्रीच! मुंबापुरीतल्या एका कॉलेजातला हा संख्याशास्त्री पुलंपासून गंगाधर गाडगीळांपर्यंत सगळ्यांवर अधिकारवाणीने बोलतो.. नौशादसाब आणि लता ही त्याची दैवतं.. त्याचबरोबर भाभी पाठवणार असलेल्या मठऱ्या, शक्करपारे, मिठाई यावरही डोळा होताच .. :) फारुकीची यायची तारीख उजाडली. आज संध्याकाळपर्यंत त्याचा म्युनशनहून फोन येईल असा अंदाज होताच आणि फोन वाजला..

म्हणून नथुराम उजवा ठरतो.....

लेखक महेश_कुलकर्णी यांनी गुरुवार, 20/02/2014 12:23 या दिवशी प्रकाशित केले.
गेले २-३ दिवस, २३ वर्षापासून रखडलेल्या राजीव गांधी हत्या प्रकरणातील दोषींच्या कारवाईवरून वेगवेगळया घडामोडी घडत आहेत. दया याचिकेची वेळीच दखल न घेतल्याने आपोआपच दोषींची फाशी रद्द होवून शिक्षेचे जन्ठेपेमध्ये रुपांतर झाले. इकडे लगेच तामिळनाडू सरकारने तमिळ अस्मिता दाखवत दोषींना सोडण्याचा निर्णय घेतला. पंतप्रधानाची हत्या करून देखील फक्त भाषेची अस्मिता म्हणून त्या ‘दहशतवादा’चे समर्थन होते हे खरेच शोचनीय आहे. देशाला अग्रक्रमी(Nation First) ठेवून निर्णय घेणारा राजकीय पक्ष अथवा सरकारी धोरणे सध्या अभावाने पाहायला मिळतात.

येत्या मराठी भाषा दिनाच्या निमीत्ताने मराठी गायक "अजित कडकडे" यांच्या बद्दल सामुहीक लेखन

लेखक माहितगार यांनी गुरुवार, 20/02/2014 11:53 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार; माझ्या अलिकडील मिपा वास्तव्यात मिपाकर अमेय यांच्याकडून मराठी विकिपीडियाकरीता विकिमिडिया कॉमन्सवर मराठी गायक अजित कडकडे यांच प्राप्त झालेल छायाचित्र अशात लावल आहे. छायाचित्र लावताना मराठी आणि इंग्रजी दोन्ही विकिपीडियावर अजित कडकडेंबद्दल फारतर एक परिच्छेदभर माहिती आहे अस लक्षात आलं.