Skip to main content

सब घोडे बारा टक्के

लेखक जिज्ञासु आनन्द यांनी रविवार, 23/02/2014 06:50 या दिवशी प्रकाशित केले.
प्रासंगिक कवितेला क्षणभंगुरतेचा शाप असतो. प्रसंग झाला की संदर्भ बदलतात आणि कविता मागे पडते. १९५२ च्या निवडणुकीवेळी विंदांनी ही कविता लिहिली. अगदी शेवटपर्यंत ते तिला "काही केल्या मरत नाही म्हणुन ही दुर्दैवी कविता आहे" असे म्हणत असत. ज्या दिवशी मरेल (लाक्षणिक अर्थाने) तो दिवस भारताचा सुदीन. या वेळी तरी ही कविता कालबाह्य होईल का?

वसुधैव कुटुंबकम

लेखक आयुर्हित यांनी रविवार, 23/02/2014 03:21 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या टीव्ही वर सुरु असलेली झी एंटरटेनमेंट इंटरप्राईस ची ही जाहिरात आहे ||वसुधैव कुटुंबकम|| The world is my family
Taxonomy upgrade extras

केक रस्क

लेखक Mrunalini यांनी रविवार, 23/02/2014 03:07 या दिवशी प्रकाशित केले.

केक रस्क

साहित्यः मैदा - १५० ग्रॅम साखर - १५० ग्रॅम बटर - १५० ग्रॅम अंडी - ३ बेकिंग पावडर - १/२ छोटा चमचा व्हॅनिला इसेन्स - १/२ चमचा मिक्स ड्राय फ्रुट्स - १/४ वाटी मिठ चिमुटभर कृती: १. एका भांड्यामधे मैदा, मिठ व बेकिंग पावडर एकत्र चाळुन घ्यावे. २. दुसर्‍या भांड्यामधे बटर व साखर फेटुन घ्यावे. ३. साखर निट मिक्स झाल्यावर त्यात १-१ अंडे टाकुन फेटुन घ्यावे. ४. ह्यात मैदा व ड्राय फ्रुट्स टाकुन एकत्र करावे. ५. एका बेकिंग ट्रे ला बटर लावावे व त्यावर मैदा भुरभुरावा. त्यामुळे केक भांद्यास चिटकत नाही. ६.

अजंठा ...........भाग-१

लेखक जयंत कुलकर्णी यांनी रविवार, 23/02/2014 00:11 या दिवशी प्रकाशित केले.
Simple, Free Image and File Hosting at MediaFire हे चित्र प्रत्येक भागावर असेल........ अजंठा : ‘त्या काळ्याकुळकुळीत कातळावर पडलेली उन्हं हळुहळु लालसर होऊ लागली आणि त्या अर्धवर्तुळाकार घोड्याच्या नालेचा आकार असलेल्या घळीच्या दुसऱ्या टोकाला सुर्यबिंब मावळू लागले. त्या सुर्याच्या रेंगाळणाऱ्या किरणांनी प्रथम बुद्धाच्या चरणकमलांचे दर्शन घेतले.

सामान्य ज्ञानाची छोटीशी चाचणी

लेखक आशु जोग यांनी शनिवार, 22/02/2014 23:28 या दिवशी प्रकाशित केले.
सामान्य ज्ञानाची छोटीशी चाचणी (लोक्सभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर) जितेन्द्र आव्हाड (राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष) भास्कर जाधव (राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष) गणेश नाइक (नवी मुंबई, मंत्री) विनायक मेटे ( राष्ट्रवादीचे माजी प्रदेश उपाध्यक्ष) संजय निरुपम (खासदार) छगन भुजबळ (सार्वजनिक बांधकाम, गृह अशी खाती सांभाळलेले मंत्री) विनायक निम्हण(आमदार, पुणे) आणि नारायण राणे(मंत्री) या सर्वांमधे एक समान धागा आहे, कोणता ते ओळखा व्य. नि. करा

कल्की

लेखक निलरंजन यांनी शनिवार, 22/02/2014 15:37 या दिवशी प्रकाशित केले.
कल्की अवतार हा विष्णूचा अंतिम अवतार आहे असे म्हटले जाते की कलियुगा मध्ये अशी वेळ येईल की लोक खूप वाईट वागतील. जगाला हया संकटातून मुक्त करण्यासाठी कल्की अवतार पृथ्वीवर येतील, आणि जगातून वाईट गोष्टी नष्ट करेल तो जे वाईट वागेल त्याला ठार मारेल. लोक नंतर बदलतील, आणि चांगले लोक तयार होतील.

डॉक्टर झाकीर नाईक …

लेखक सुहासदवन यांनी शनिवार, 22/02/2014 14:28 या दिवशी प्रकाशित केले.
तु नळीवर बरेच विडीयो उपलब्ध असतात. असेच काही विडीयो पाहत असताना ह्या महाशयांचे काही समुपदेश प्रकारचे विडीयो पहाण्यात आले. त्यातील काही विडीयो इथे डकवत आहे.

सल्ला – एक अगत्याचे घेणेदेणे

लेखक सस्नेह यांनी शनिवार, 22/02/2014 13:23 या दिवशी प्रकाशित केले.
मला याची जाणीव नव्हती, पण माझ्या आसपासचा आसमंत अतिशय कनवाळू, विद्वत्तापूर्ण, अभ्यासपूर्ण अन सदैव पर-मदतीस तत्पर अशा सज्जन सल्लागारांनी प्रथमपासून परिपूर्ण असत आला आहे. ‘पर-मदत’ अशासाठी, की यांना स्वत:ला अनादी अनंत काळापासून कोणत्याच मदतीची कधी गरज पडली नसावी, अशी शंका येण्याइतपत स्वयंसिद्ध स्वयंपूर्ण असे हे महाभाग होत. पुन्हा, हे विद्वान लोक सर्वव्यापी होत. याचा पुरावा म्हणजे वर्तमानपत्रे अन मासिके यातून झालेला ‘ताईचा सल्ला ’, ‘माईचा सल्ला’, ‘काकांचा सल्ला’, इत्यादिंचा झालेला बोलबाला ! तसे तर आयुष्यात असंख्य प्रसंगी या सल्लावंतांनी मला तारून नेले आहे.

स्विकार...

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी शनिवार, 22/02/2014 05:34 या दिवशी प्रकाशित केले.
तुझे मुलायम मउ दोन्ही हात आजही ह्रुदयापाशी घट्ट कवटाळुन ठेवले आहेत मी.. कधी कधी प्रचंड एकटं वाटल्यावर शोधुन काढतो अडगळीत गेलेल्या फाइल सारखं...काही क्षण! माहित असतं नंतर .. पुन्हा तोच एकाकीपणा मला छळायला येणार आहे... आणि पुन्हा काही काळ त्याचा हिशेब चुकता झाल्यावर.... पुन्हा तुझ्या हातांची..त्यामागल्या स्पर्शांची वेडी हुरहुर! कधी कधी मला प्रश्न पडतो... मानवी मन... नाते ... संबंध... त्यातील व्यवहार... हे सर्व या दोन टोकांच्या मधल्या ताटातुटीवर बेतलेले आहे का गं? मग येते काही क्षणांची विमनस्कता... त्यावरची काही उत्तरं...
काव्यरस

(कश्या कश्याला मुकलो ते...)

लेखक धन्या यांनी शुक्रवार, 21/02/2014 23:25 या दिवशी प्रकाशित केले.
आठ दिवसांनी गावावरुन मुंबईला आल्यावर चाळीतल्या संडासाकडे गेलो.. समोर लोकांची रांग, मुठीत नाक धरुन. हाती पाण्याने भरलेला डबा. आपला नंबर येण्यासाठी आतूर डोळे कुणालाच आत जाऊन मोकळे होण्याशिवाय काहिच सुचत नव्हते.. माझा नंबर आल्यावर आतून भींती पाहील्या अन उमगले, कश्या कश्याला मुकलो ते...
काव्यरस