आय लव माय ईंडिया ..!
आज काहीतरी स्पेशल करायचे हे कालपासूनच ठरवले होते. दरवर्षीपेक्षा काहीतरी हटके, इतरांपेक्षा काहीतरी वेगळे. रात्री बाराच्या ठोक्यालाच कामाला लागलो. जेव्हा कालगणनेनुसार तारीख पलटली.
निव्वळ धमालमस्ती ऐवजी एखाद्या नवीन अंदाजाने आजचा दिवस साजरा करायचा होता. सुरुवात फेसबूक प्रोफाईल वरचा फोटो बदलण्यापासून केली. एक छानसा हवेत फडकणारा, भारतीय सार्वभौमत्वाची आणि प्रत्येक भारतीयाच्या स्वातंत्र्याची साक्ष देणारा तिरंगा प्रोफाईल डिसप्ले पिक्चर म्हणून लावला. ज्या खाली लाल गडद अक्षरात ठळक दिसेल असे कॅप्शन होते - आय लव माय ईंडिया .. लगोलग हाताबरोबर स्टेटस अपडेट केले - भारतमाता की जय ..
सुराई
'सुराई'
अजून देहातुनी उसळते अजाण शाई
अजून आत्म्यास गाज देते तुझी रुबाई
अजून तेजीत बाग आहे कळ्याफुलांची
अजून श्वासातली पुरेशी नसे कमाई
अधीर गात्रात रात होते पहाटताना ...
अजून तृप्तीत लोळते ही तुझी रजाई
मनात माझ्या तुझा विलासी महाल झुलतो
परी तुझ्या अंगणात मजला असे मनाई
हरेक पेल्यात कैफ अजुनी जुनाच आहे
भरुन घे तू नव्या दुखाने नवी सुराई !
अजून झाले न नाव माझे इथे पुरेसे
अजून पुरती नसे म्हणावी तशी बुराई
डॉ.सुनील अहिरराव
कॉकटेल लाउंज : मालिबू हॉट अॅप्पल स्ट्रुडेल
बर्याच दिवसात कॉकटेल बनवले नव्हते. बार मध्ये काय काय साहित्य आहे ते बघितले, पण घरात ज्युसेस अजिबातच नव्हते. अॅप्पी फिज़ची बाटली फ्रीझमध्ये मागच्या कोपर्यात पहुडलेली दिसली. लगेच तिला सत्कारणी लावायचे ठरविले आणि एक कॉकटेल आठवले. तेच हे, कॉकटेल लाउंज मालिकेतील आजचे कॉकटेल आहे मालिबू हॉट अॅप्पल स्ट्रुडेल
पार्श्वभूमी:
हे कॉकटेल मालिबूच्या साईटवर एकदा बघितले होते. 'अॅप्पल स्ट्रुडेल' ह्या नावाचे एका वोडकापासून बनणारे एक वेगळे कॉकटेल आहे. त्याचे साहित्य जरा जास्त आहे.
कॅलिडोस्कोप २
रसिकता
बेगम अख्तर समोर बसून आळवत्येय.
मला आठवतंय ते हिंदी चित्रपटांतलं मैफलीचं दृश्य –एक दोन श्रोते मनगटावरच्या गजरयाचा आस्वाद घेत उगाचंच माना डोलावताहेत, शेजारी किंवा हातांत ‘एकच प्याला.’ रसिकतेचा इतका कुरूप चेहरा इतर कुठं बघायला मिळत नाहीं.
पण या बरोबर मला आठवतोय सत्यजित रे यांच्या ‘शतरंज के खिलाडी’ मधला अमजदखान देखिल.‘शोले’तल्या या मोकाट सुटलेल्या गब्बरसिंगला रेंच्या या चित्रपटांत एका मवाळ, काव्य-संगीत-प्रिय नवाबाच्या रुपात बघायला प्रथम थोडं कठीण जातं. नंतर मात्र संगीताच्या पूर्ण आहारी गेलेला हा नवाब उमजायला लागतो. ही सुद्धा एक रसिकता, तीही टोकाची.
मी १६ मार्च ला निघणार
काल ५०० रुपये काढले आणि एकदम RELIEF आला
आजवर अनेकवेळा मला डेबिट/क्रेडीट कार्ड वापरण्याचा सल्ला मिळाला पण मी दुर्लक्ष केले
प्रत्येक गोष्टीची वेळ यावी लागते असे म्हणतात त्या प्रमाणे ती वेळ आली
आली म्हणजे मी ओढवून घेतली
सत्तरी ओलांडलेल्या आम्हा मित्रात बायकोला न घेता ट्रीपला जाण्याची कल्पना मांडली गेली आणि अंमलात आणण्याची सुरवात झाली
नेपाळ पाहण्याचे ठरले . आरक्षण झाले . गेले ५० दिवस बायको चुकूनही दुखावली जाणार नाही
याची काळजी घेतली !!
दोन दिवसापूर्वी कळले कि ५०० आणी १००० च्या नोटा नेपाळमध्ये वापरणे त्रासदायक होते
या नोटा स्वीकारल्या जात नाहीत .
आयचाघोरसचा सिद्धांत
तुला ल सा वि चा अर्थ समजत नसताना
तू माझा म सा वि(कायला) काढलास
लाज वाटत नाही? त्रिज्या मेली तुझी
कोन वाकला आणि वर्गमुळ खपलं
चौकोनात फिरणार्या तुला
वर्तुळात त्रिकोण काढून
नव्वद अंशातून बगितलं हळूच
टँजंट का मारलास मला?
मी भेदतच होतो परिघ
शेवटी षटकोनातून बाहेर पडलास तू
पोटरूपी वर्तुळावर "पाय" (२२/७) देऊन काय साधलंस?
शेवटी कितीही वेगात फिरली
तरी अक्ष तोच राहतो, अक्ष तोच राहतो
अक्ष तोच राहतो, अक्ष तोच राहतो, अक्ष तोच राहतो, (एको)
काव्यरस
Taxonomy upgrade extras
१९९६ माऊंट एव्हरेस्ट - ४
गोरान क्रप हा स्वीडनचा एकांडा शिलेदार शिखरावर सर्वप्रथम चढाई करणार होता. २९ वर्षांचा गोरान स्टॉकहोमहून सायकल चालवत एव्हरेस्टच्या पायथ्याशी आला होता. वाटेत ईराणमध्ये एका स्त्रीने त्याच्या डोक्यात बेसबॉलची बॅट घातली होती ! नशीबाने डोक्यावर हेल्मेट असल्याने तो वाचला होता. पाकीस्तानमधेही एकदा जमावाने त्याच्यावर हल्ला केला होता. या सगळ्यातून सहीसलामत बचावून तो काठमांडूत पोहोचला होता. त्याच्याबरोबर त्याच्या एव्हरेस्टच्या चढाईचं चित्रीकरण करण्यासाठी सहाय्यकही होते.
१ मे ला गोरानने बेस कँप वरून चढाईला सुरवात केली.
यांबू , सौदी अरेबिया , मध्ये राहणारे कुणी मिपाकर आहेत का?
"यांबू , सौदी अरेबिया , मध्ये राहणारे कुणी मिपाकर आहेत का?"
प्रिय मिपाकरांनो,
सध्या मी भारतात आहे.
गेले काही दिवस मी जॉबच्या शोधात होतो.
तो मिळाला.
मी जॉइन करत असलेली कं. कॅनेडीयन असून, सध्या त्यांचे काम यांबू,सौदी अरेबिया, इथे सुरु आहे.
पुढील ३/४ महिने मला यांबूलाच रहावे लागणार आहे.
माझा मुळचा पिंड कट्टा करणे, हाच असल्याने, तिथे पण एखादा मस्त कट्टा करावा, असा बेत आहे.
मागच्या वर्षी मी दुबईला पण कट्टा केला होता.
ह्यावर्षी भारतात पण बरेच कट्टे केले.
आता एक मस्त यांबू-कट्टा पण होवू देत.
कळावे,
लोभ आहेच,
तो वाढावा ही विनंती,
मुवि
थोडं समजून घ्या ना...!!!
'साली कोणीतरी पाहिजे यार!!!!'
'हं...'
'हे असं एकटं बोर होतं. त्यात आपल्याहून फडतूस लोकांना एकसोएक मिळतात ते पाहिल्यावर तर असली हटते ना... मग अजूनच एकटं वाटायला लागतं.'
'नाही ते खरंय... पण हे सगळं तू बोलतोयस? काल एवढं मोठं प्रवचन देत होतास मला की -'
'नाही म्हणजे मला मान्य आहे की कालच मी असं म्हणालो की, काय गरज आहे मुलींची?? मुलींशिवाय दुसरं काही नाहीये का जगात? त्यांच्याहूनही सुंदर अशा ब-याच गोष्टी आहेत!!'
'फॉर एक्झाम्पल??'
'हा?? अं... अरे ते आपलं... अरे तेच ना... तेच तर म्हणायचंय मला... की मी हे सगळं काल परवापर्यंत म्हणत होतो. आता नाही... आता माझ्या लक्षात आलंय सगळं.'
'हो?? काय?'
'हेच की...
मिसळपाव