Skip to main content

आई म्हणोनी..

लेखक rakhee यांनी मंगळवार, 11/03/2014 18:55 या दिवशी प्रकाशित केले.
आई म्हणोनी.. पिल्लू आज आजारी आहे ,त्यामुळे घरीच आहे शाळेत गेले नाही . मुलं आजारी असली कि कसतरीच होतं नाही ? रोज दंगा मस्ती करून आपल्याला त्रास देणारी , खूप बडबड करणारी मुलं आजारात गुपचूप निजून पडली असली कि आत काहीतरी तुटतं . काहीच सुरळीत वाटत नाही . बस आपलं बाळ लवकर हसत खेळत होऊ दे अशी प्रार्थना मन करू लागतं . ज्याच्या बडबडीचा आपल्याला त्रास होऊन आपण म्हणतो अरे बस कर आता , तीच बडबड पिल्लू लवकर करावं म्हणून आपलं मन धडपडू लागते . प्रत्येक पालकाचा हाच अनुभव असेल हो न ? किती गोड असतं नाही त्याचं बोलणं , निरागस हसणं बघतच रहावं असं . माझ्या पिल्लांनी मला खूप काही शिकवले .

शाक भाजी (वांगी,बटाटा चना भाजी )

लेखक आरोही यांनी मंगळवार, 11/03/2014 15:04 या दिवशी प्रकाशित केले.
'शाक भाजी ' नाव वाचून काही जणांना कळले नसेल काय प्रकार आहे तो ,पण हा वांग्याचा अत्यंत साधा पण चवदार असा प्रकार आहे ,तसे याला शाक भाजी का म्हणतात हे मला देखील ठाऊक नाही मी माझ्या एका मावशीच्या घरी हि भाजी खाल्ली होती आणि तेव्हापासून मला हि भाजी खूप आवडते ती तेव्हा या भाजीचे नाव शाक भाजी असेच म्हणाली होती ,असो आपल्याला नावाशी काय करायचे आहे आपण भाजी कशी करतात ते बघुयात ... साहित्य : ४ वांगी,१ बटाटा ,१ टोमाटो,५-६ कढीपत्ता पाने ,वाटीभर उकडलेले चणे .२ लवंग ,४ काळीमिरी ,१,तमालपत्र .मीठ ,तेल ३ चमचे ,पाणी वाटणासाठी :एक ते दीड इंच आले,६-७ लसुन पाकळ्या ,१चमचा जिरे ,१ चमचा लाल तिखट ,अर्धा चमचा हळद,

लोकायत आणि चार्वाक

लेखक माहितगार यांनी मंगळवार, 11/03/2014 15:02 या दिवशी प्रकाशित केले.
लोकायताचे वैशिष्ट्य म्हणजे ते एकमेव दर्शन आहे की ज्यात वेद, परलोक व देव या तिघांनाही फेटाळून लावले आहे. चेतनावाद हा सर्व धर्मांचा व दर्शनांचा अविभाज्य भाग आहे. शरीर ह्या हाडा-मांसाच्या गोळ्यापेक्षा चेतन जीव हा निराळा आहे हा झाला चेतनावाद.

MH370 - फ्लाईट डीलेड..

लेखक गवि यांनी मंगळवार, 11/03/2014 14:19 या दिवशी प्रकाशित केले.
व्हर्गा हा पावसाचा एक प्रकार आहे.. तो जमिनीवर पोचण्याआधीच वाफ होऊन नाहीसा होतो. व्हर्गासारखं हवेत नाहीसं झाल्याचा भास देणारं मलेशिया एअरलाईन्सचं बोईंग विमान. सगळेजण या विचित्र घटनेविषयी सर्वत्र वाचत आणि ऐकत आहेतच. तरीही काही इतर नाही तरी महत्वाच्या वाटणार्‍या गोष्टींची एक यादीच का होईना, पण बनवण्यासाठी टंकणं अनिवार झालं. या फ्लाईटसाठी वापरलेलं विमान म्हणजे बोईंग ७७७ - २०० ई आर. (777-200ER) ER म्हणजे एकस्टेंडेड रेंज. लांब प्रवासासाठी जास्ती अंतर एका दमात पार करता यावं म्हणून जास्त कपॅसिटीचे फ्युएल टँक्स बसवलेलं.

आला स्मायलीवाला...

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी मंगळवार, 11/03/2014 13:54 या दिवशी प्रकाशित केले.
ढीशुम ढिशुम क्लेमरः- सदर लेखन मि.सूडोकू यांनी आमच्या नामा'चा उप योग-करून लिहिलेल्या एका लेखावरून http://misalpav.com/node/27052 सुचलेले आहे. त्यामुळे हा लेख त्याची प्रतिक्रीया...विडंबन ..इत्यादी काहिही नसून त्या निमितानी काहि धमाल लेखन करावं..अश्याच अनुषंगानी लिहिलेला आहे. ======================================================== प्रातःकाळची प्रसन्न स्मायलीमय वेळ.

अहमदाबाद-गांधीनगर_2

लेखक अमितसांगली यांनी मंगळवार, 11/03/2014 13:47 या दिवशी प्रकाशित केले.
दिवस दुसरा: प्रवासाची रूपरेषा १. कांकरिया लेक (तलाव) : (लागणारा कालावधी : ४० मि.) २. सिद्दी सय्यद मस्जिद: कांकरिया लेकपासून १५ मि. च्या अंतरावर (लागणारा कालावधी: ३० मि. ) ३. जुम्मा मस्जिद: सिद्दी सय्यद मस्जिदपासून १५ मि. (लागणारा कालावधी: ४० मि.) ४. साबरमती आश्रम: लाल दरवाजापासून ३० मि. (लागणारा कालावधी: ३ तास ) ५. सायन्स सिटी: साबरमतीपासून ४५ मि. (लागणारा कालावधी: ३ तास ) १. कांकरिया लेक : संध्याकाळी सहाची बस पकडायची असल्याने दुसऱ्या दिवसाचा सूर्योदय कांकरिया लेकवरच बघण्याचे नियोजन होते. पण नेहमीच उठण्याच रडगाण पाठ सोडायला नको.

क्षितिज

लेखक सार्थबोध यांनी मंगळवार, 11/03/2014 12:23 या दिवशी प्रकाशित केले.
मन विलाप जाणते धरतीचा सागरतिरी सूर्याचे ओझरणे प्रतिसाद लाटांवरुनी ll १ ll विहंग एकला प्रवासी समांतर अवकाशी धरतीस व्‍याकुळलेल्या साथ क्षणापुरती ll २ ll संध्येस का छळतो उनाड अल्लड वारा मावळत्या कातरवेळी जीव एकल्या विहारा ll ३ ll क्षितिजाचे रूप विलोभी उतरे गगनावरुनी डोळ्यादेखत माझ्या मिसळे पाण्यामधुनी ll ४ ll - सार्थबोध

हे लोकं बोलतात तरी काय / कसे.

लेखक अत्रन्गि पाउस यांनी मंगळवार, 11/03/2014 08:17 या दिवशी प्रकाशित केले.
दोन राष्ट्रप्रमुख, पंतप्रधान किंवा तत्सम अत्युच्च पदस्थ लोकं जेव्हा अधिकृत कामासाठी भेटतात तेव्हा ते जी चर्चा वाटाघाटी करतात त्याचा गोषवारा / औटकम आपल्याला नंतर कळतो..आपण नेहेमी ऐकतो वाचतो कि अमुक नेत्याने अतिशय मुत्सद्दीपणे अमुक एक परिस्थिती हाताळली / आपलं मुद्दा गळी उतरवला वगैरे वगैरे.. परंतु हे लोकं प्रत्यक्ष बैठकीत / बोलण्यांमध्ये ते काय /कसे बोलत असावेत ? विशेषतः बंद दाराआड चर्चेत जेव्हा प्रत्येक शब्द, हालचाल, मौन सगळे सगळे महत्वाचे असेल त्यावेळी आपलं मुद्दा मांडतांना, रेटतांना, सोडतांना शिष्टचारांचा डोलारा सांभाळत .. ते एक्झाकटली 'बोलत' काय/कसे असावेत?

मृगगड - उंबरखिंड - भाग १

लेखक वेल्लाभट यांनी मंगळवार, 11/03/2014 07:31 या दिवशी प्रकाशित केले.
’मृगगड??? हा कुठे आला? ऐकलं नाही कधी याबद्दल! मोठा आहे का? किती कठीण आहे? काय विशेष आहे त्या किल्ल्यावर?’ इत्यादी असंख्य प्रश्न उपस्थित झाले, जेंव्हा मृगगडाचं नाव सुचवलं गेल. तसा हा अपरिचितच किल्ला म्हणायला हवा. इंटरनेटवरही याची म्हणावी तेवढी मुबलक माहिती मिळत नाही. सुधागड, राजगड ही नावं शर्यतीत होती पण शेवटी एक दिवसाचाच ट्रेक करायचा ठरल्याने ती बाद झाली. मग कोहोज, टकमक गड, घनगड आणि हा मृगगड अशी काही नावं पुढे आली. मृगगड त्यातल्या त्यात जवळ, छोटा, फार कठीण नसलेला, (ही सगळी विशेषणं पुढे बदलली. कशी ते कळेलच) असा होता आणि नवीन होता त्यामुळे ‘होऊदे ट्रेक !’ असं म्हणून मंडळी ट्रेक ला तय्यार झाली.

बिअरचा ग्लास (?) आणि भारतीय प्रमाणमीमांसा

लेखक माहितगार यांनी सोमवार, 10/03/2014 22:19 या दिवशी प्रकाशित केले.
भारतीय तत्वज्ञानातील प्रमाणमीमांसा हा संबंधीत विषयातील तज्ञांनी हाताळावयाचा विस्तृत विषय आहे.