Skip to main content

अजंठा ...........भाग-२

लेखक जयंत कुलकर्णी यांनी शुक्रवार, 28/02/2014 17:18 या दिवशी प्रकाशित केले.
Simple, Free Image and File Hosting at MediaFire अजंठा ...........भाग-१ वत्सगुल्म शाखा : वाकाटकांची अशी काही शाखा आहे हे १९३९ पर्यंत माहीतच नव्हते. तसे अजंठामधे यांचे बरेच शिलालेख आहेत पण वाईट अवस्थेमुळे त्याच्यातील नावे चुकीची वाचली गेली. अकोला जिल्ह्यात वाशीम येथे एक ताम्रपट सापडल्यावर बऱ्याच गोष्टींचा उलगडा झाला.

मोरारजी देसाई ; स.का. पाटील आणि फ्लोरा फाऊंटेनचे कारंजे

लेखक माहितगार यांनी शुक्रवार, 28/02/2014 08:43 या दिवशी प्रकाशित केले.
कॅलेंडर तयार करणारे चूकतात ? का जन्म घेणारे ? माहीत नाही; पण ज्यांचा वाढ दिवस नेमका २९ फेब्रुवारी त्यांचा वाढदिवस केव्हा साजरा करावा खासकरून व्यक्ती महाराष्ट्राची माजी मुख्यमंत्री आणि भारताची माजी पंतप्रधान असेल तर.

फॅण्ड्री आवडणे , न आवडणे

लेखक सांजसंध्या यांनी शुक्रवार, 28/02/2014 07:18 या दिवशी प्रकाशित केले.
एकदाचा फॅण्ड्री पाहिला. फेसबुकवर रोज येणारी परीक्षणं पाहून फॅण्ड्री पाहीलेले लोक आपल्याला खिजवतात असं वाटू लागल होतं. मग ज्या जिद्दीने सिनेमाबद्दल खूप काही कळत नसतानाही पाहीला त्याच जिद्दीने गद्यात लिहीणं जमत नसतानाही लिहायचं ठरवलं. लिहायचं ठरवलंच आहे तर तांत्रिक गोष्टी कळत नसताना काय लिहायचं ? तर एक गोष्ट खरी की हा सिनेमा असा आहे की तो पाहीलेल्यांना त्याबद्दल चांगलं वाईट इतरांना सांगावंसं वाटत राहतंं हे खर आहे.

मंगळ कार्य !

लेखक साळसकर यांनी शुक्रवार, 28/02/2014 00:03 या दिवशी प्रकाशित केले.
आज पत्रिका आली एका मंगळ कार्याची. एका मित्राच्या लग्नाची. म्हटलं तर माझा मित्र, म्हटलं तर माझ्या वडीलांचा मित्र. माझ्यापेक्षा बारा वर्षे मोठा तर माझ्या वडीलांपेक्षा बारा वर्षे लहान. जुन्या वाडीतला जुना मित्र. आतासे राहायला आणखी कुणीकडे. लग्न त्याचे आजवर झाले नव्हते हे पत्रिका बघूनच समजले. अन नाही म्हटले तरी धक्काच बसला. अजून झाले नव्हते की एक मोडून हे दुसरे? पहिले कोणाशी झाले, कधी झाले, का मोडले? कि झालेच नाही ! पण मग एवढे उशीरा का? भावांची लग्ने झाली असे कानावर होते. एकाचे सहकुटुंब फोटोही फेसबूकावर बघून झाले होते. मग तीनही भावांत देखणा हा, याचेच कसे राहिले? अवाजवी अपेक्षा?

मायमराठी

लेखक सार्थबोध यांनी गुरुवार, 27/02/2014 14:00 या दिवशी प्रकाशित केले.
शब्द अलंकार भंडार, मधाळ अमृतवाणी वदे सुमधुर सिद्ध ऐसी, भाषा माझी मराठी ll १ ll वेदतुल्य मंगल प्रार्थना, आरती ईश्वराची दंड थोपटे गर्जुनी, आरोळी हो पोवाड्याची ll २ ll सुबक डौल लावण्याचा, शृंगारते लावणी तरल मनीच्या भावना, भावगीती रंगती ll ३ ll सजग करण्या जना, बोले फटका झणी ठेचुन काढी दुष्ट रुढी, भारुड कीर्तनातुनी ll ४ ll अभंग कवणे जागविती, सदभाव भक्ती वर्णन करितो विश्वाचे, मुक्तछंद पक्षी ll ५ ll शब्दांची तीक्ष्ण पाती, दंडिते शत्रू लेखातूनी संपन्न सुबत्ता शास्त्र, झळके व्याकरणातूनी ll ६ ll परंपरा नाट्यपदे नाटके, साहित्य श्रीमंती ईश्वर स्वये प्रगटे, ऐकून

जीवनगाणे – ५

लेखक सुधीर कांदळकर यांनी गुरुवार, 27/02/2014 07:51 या दिवशी प्रकाशित केले.
जीवनगाणे - १ जीवनगाणे - २ जीवनगाणे - ३ जीवनगाणे - ४ फ्रॅन्सीस क्रीक फ्रॅन्सीस हॅरी कॉम्टन क्रीक. जन्म ८ जून १९१६ रोजी इंग्लंडमधील वेस्टन फॅवेल, नॉर्दम्टन इथे. हॅरी क्रीक (१८८७ – १९४८) आणि ऍनी एलिझाबेथ क्रीक या दांपत्याचा सर्वात मोठा मुलगा म्हणजे फ्रॅन्सीस क्रीक.

फ़्यंड्री...!

लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी बुधवार, 26/02/2014 21:32 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी. मंडळी, मिपावर फ्यंड्रीबद्दल उत्तम लिहून आल्यानंतर आणि इतरही ठिकाणी फ़्यांड्रीवर येता जाता चर्चा व्हायला लागल्यामुळे चित्रपट पाहण्याची उत्सूकता लागली होती. मराठी चित्रपटांनी कात टाकली आहे. पारंपरिक चित्रपटापेक्षा काही तरी वेगळे मराठी चित्रपटातून यायला लागले आहे. वास्तवतेवर आधारित सकस कथा, ध्वनी, छायाचित्रण,कलाकार, या आणि विविध अशा बदलांनी मराठी चित्रपट जरा हटके यायला लागले आहेत. मराठी चित्रपटांना विषय फुलवता यायला लागले थेटरात शांतपणे चित्रपट बघायला जावे, इथपर्यंत मराठी चित्रपटांनी भरारी घेतली आहे, असे वाटायला लागले आहे.