मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

माझं कोकणातलं गांव :- भाग-४ (परतीचा प्रवास)

प्रमोद देर्देकर ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
माझं कोकणातलं गांव :- भाग - ३ मागील भागात>> घरी येता येईतो चांगलाच अंधार पडलेला असायचा. दिवे लागणी झाली कि मग पर्वचं वगैरे होवुन गाण्याच्या भेंड्या, पत्ते खेळणं असा सगळा वेळ जायचा. तिथुन पुढे >> कधी दुपारी मी आणि काका घराजवळच्या हौदात पन्हाळीला पिण्याचे पाणी येत नाही म्हणुन जिथुन पाणी येतं तिथपर्यंत पर्‍यात पाट साफ करत जायचो. हा पर्‍या गणपतीच्या देवळाकडे जाताना जो पर्‍या लागतो तोच पण त्याच्या थोडं वरती जावं लागतं. तिकडे जायला वेगळी एकेरी पाऊलवाट आहे. वाटेत भरपुर दगड धोंडे आहेत.

युरोप मधील पहिला वाहिला धमाल मिपा.कट्टा म्युनिक मधला

दिव्यश्री ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
तारीख १३ आणि १४ मार्च २०१४ हे दिवस अविस्मरणीय राहतील माझ्या आयुष्यात कारण साधुसंत येती घरा...चा अनुभव मला परदेशात घेता आला . श्री.निनाद , श्री.पेठकर काका , सौ . पेठकर काकू आणि आम्ही दोघे असा कट्टा झाला . खरं तर कट्टे झाले २ दिवस सलग . निनाद यांनी मला आधी सांगितले होते कि काका आणि काकू म्युनिक दौर्यावर येत आहेत . मी तयार होतेच , कट्ट्याला हजेरी लावायला . :D १३ तारखेला सक्काळ सक्काळीच फोणाफोणी करुण आम्ही मरियन प्लात्झ (म्युनिक मधील प्रसिद्ध ठिकाण ) ला भेटायचं ठरवलं . त्यानुसार आम्ही भेटलो .

हिटलर आणि शिकेलग्रुबर नावाचा शिपाई

सुधीर कांदळकर ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
मारिया ऍना शिकेलग्रुबर. ऑस्ट्रीयामधील वाल्डफीअर्टेल Waldviertel विभागातल्या (जन्म १५-०४-१७९५) स्ट्रोन्स या छोट्याशा खेड्यात श्री. योहान शिकेलग्रुबर आणि श्रीमती थेरेसा फेईसिंगर या दांपत्याच्या पोटी १५-०४-१८४७ रोजी जन्माला आली. या दांपत्याला एकूण ११ अपत्ये झाली पण त्यातली केवळ ६च जगली. मारिया २६ वर्षांची असतांना तिची आई वारली. नंतर ४० वर्षांची होईपर्यंत ती काय करीत होती याचा कुठे काही पुरावा सापडत नाही. आपल्या वयाच्या ४२व्या वर्षी तिने एका मुलाला जन्म दिला. मारिया ऍना शिकेलग्रुबरला ऍलॉईस हे पुत्ररत्न झाले तेव्हा ती स्ट्रोन्स या गावी ट्रमेल्श्लागर नावाच्या एका कुटुंबात काम करीत होती.

१९९६ माऊंट एव्हरेस्ट - ६

स्पार्टाकस ·
१० मे १९९६ एव्हरेस्टच्या शिखरावर दुपारचे १.४५ वाजलेले होते. अनातोली बुकरीव, अँडी हॅरीस, नील बिडलमन, मार्टीन अ‍ॅडम्स आणि जॉन क्राकुअर आधीच शिखरावर पोहोचलेले होते. क्राकुअरने मोजून पाचव्या मिनीटाला खाली उतरण्यास सुरवातही केली होती ! तो उतरून गेल्यावर १.५० च्या सुमाराला क्लेव स्कोनींगने शिखर गाठलं, दुपारी २.२० च्या सुमाराला सँडी हिल पिटमन आणि तिच्या पाठोपाठ लोपसांग जंगबू शेर्पा पोहोचले. त्यांच्या नंतर १० मिनीटांतच शार्लोट फॉक्स, टिम मॅडसन आणि लेनी गॅमलगार्डने एव्हरेस्टचा माथा गाठला.

ती आणि तिचा भाऊ

kurlekaar ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
ती आणि तिचा भाऊ (ही लघुकथा ‘आश्लेषा’ च्या २०१३ च्या दिवाळी अंकांत प्रकाशित झाली होती) .....अचानक समोर तिला तिच्या ओळखीची परी दिसली.—घामाघूम व धोडीशी घाबरलेली. “अगं, तुझा भाऊ वर आलाय, मी किती वेळ शोधत्येय तुला सांगायला”. “काय?” ती किंचाळली. “पण हे कसं शक्य आहे? मी तर त्याला गेल्याच पक्षात पृथ्विदर्शन वर पाह्यलं होतं”. हातांतली फुलं तिने परीकडे सोपवली व ती सुसाट निघाली. “अगं पण तो कुठे आहे हे तरी सांगूदे मला”, परी म्हणाली. “कांही आवश्यकता नाही, मला कल्पना आहे, आणि तिथं तो नसला तर त्याला शोधून काढेनच की मी” ती जाताजाता ओरडली.

आता माझी सटकली रे.........!

आयुर्हित ·
नंदन निलकेणी एक सुशिक्षीत मान्यवर, चांगल्या खाजगी संस्थेत प्रत्यक्ष कामाचा भरपूर अनुभव, Managing Director, President, CEO या पदावरचा अनुभव, देशासाठी चांगले काहीतरी करून दाखवायची तयारी, Imagining India: The Idea of a Renewed Nation या पुस्तकाचे लेखक, एक कॉंग्रेस नेता,

भाजप ---- फ़ॉरेन पॉलिसी

अज्ञात ·
भाजप हा सर्वात मोठा पक्ष म्हणुन या निवडणुकीमधे निवडुन येणार हे जवळ जवळ निश्चित झालेल आहे. इतकच नाही तर त्यांना बहुमत मिळायची व सरकार स्थापनेसाठी कोणाची मदत घेण्याची गरज पडणार नाही हीच शक्यता जास्त आहे. अशा परिस्थितीत भाजपची इंटरनॅशनल पॉलिसी काय असेल ? कोणात्या देशाशी जास्त चांगले संबंध असतील ? इंपोर्ट एक्सपोर्ट व त्यावरच्या ड्युटी यांची पॉलिसी काय असेल याला जास्त महत्व प्राप्त होत. माझ्या वाचनात भाजपच्या आंतर्गत पॉलिसीबाबत आलेल आहे, पण इंटरनॅशनल पॉलिसीबाबत काहिच आलेल नाही. कोणाला याबाबत माहिती आहे का ? असेल तर इथे मांडाव.

काय म्हणाव आता...........

जयंत कुलकर्णी ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
मित्रहो...... माझे म्हणणे आहे की त्यात लपविण्यासारखे काय आहे ? A classified Indian army report that analyses the causes of India's military defeat in the 1962 border war with China was blocked hours after it was posted on the internet. A large section of the Henderson Brooks-Bhagat report was recently posted by Australian journalist and author Neville Maxwell on his website http://www.nevillemaxwell.com/TopSecretdocuments.pdf . Read more at: http://indiatoday.intoday.in/story/henderson-brooks-report-on-indo-china-war-put-online/1/349957.html माझ्या पराभवाचे श्राद्ध या लेखामधे मी हा अहवाल प्

क्रिकेट आणि मी

kurlekaar ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
क्रिकेट आणि मी क्रिकेट चं माझं वेड अगदी लहानपणापासून -म्हणजे चौथी पांचवी पासूनचं. तेंव्हा तो खेळ देखिल कळायचा नाहीं व इंग्रजीतील commentary सुद्धा. पण विजय हजारे खेळायला आला की मी रेडीओ जवळ बसुन राह्यचो. तेंव्हाची audio technology सुद्धा फारशी प्रगत नव्हती. फलंदाजाने फटका मारला की वाऱ्याची झुळुक यावी तशीच एक disturbance ची wave रेडीओवर यायची.पण तो एक चौकार होता का एकेरी वा दुहेरी धावा होत्या ते कळायचं नाही.