Skip to main content

विडंबन - धोबिचा कुत्रा

लेखक विवेकपटाईत यांनी शनिवार, 26/07/2014 09:03 या दिवशी प्रकाशित केले.
बिभीषणाने दिला होता रावणाला हो दगा. बदल्यात त्याला मिळाली सुवर्ण लंकेची हो गादी. गादी साठी त्याने पक्ष आपला सोडला. विसरला होता तो त्रेता नाही कलयुग आहे हो. घरात त्याला आता प्रवेश नाही मिळाला. घाटा वरचा राजा तो नाही झाला. घर का ना घाट का धोबिच्या कुत्र्या सारखा भुंकत-भुंकत आता भटकतो गल्ली बोळ्यात.

हरिहर - एक ट्रेक कथा

लेखक विअर्ड विक्स यांनी शनिवार, 26/07/2014 00:09 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या एक-दिड वर्षात वेळेअभावी दुर्ग भ्रमंती जवळपास धूमकेतूसारखी झाली होती . या वर्षी मात्र त्या सर्वाची भरपाई करायची असे मनात होते. जूनपासून कचकून जवळपास प्रत्येक शनिवार-रविवार दुर्गभ्रमंती करायचीच असा संकल्प सोडला नि तो बऱ्यापैकी पूर्णत्वाच्या मार्गावर आहे.चला….आत्मस्तुती पुरे झाली. मुद्द्यावर येऊ या ... तसे आम्ही मुंबईकर मुद्द्यावर येण्यास जास्त वेळ लावत नाहीच म्हणा ... असो... दुर्गभ्रमंती करायची हौस तर फार भारी पण ती एकट्याने करण्याइतकी माझी इच्छाशक्ती माझ्या काही मित्रांइतकी दांडगी नाही. (थोडक्यात एकटे जायला ….. समजून घ्या).

काही अनवट खाद्यमिश्रणे

लेखक अत्रन्गि पाउस यांनी शुक्रवार, 25/07/2014 21:58 या दिवशी प्रकाशित केले.
तसे आपण अनेक नवीन जुने पदार्थ करून खातोच पण मला काही पदार्थ एकाबरोबर एक आवडतात... त्यांना विशिष्ट काही नावे नाहीत ....कदाचित तुम्ही हे करून खात असाल...तसे असेल तर फारच उत्तम ....पण नसाल तर खाऊन बघा आवडतात का आणि तुम्ही पण असे काही करत असाल तर सांगा... १. उत्तम बासमती तांदुळाचा भात + मेतकुट + तूप +साय+ दुध ...त्यावर दह्याची मोठी खाप + एक उकडलेला बटाटा +किंचित मीठ २. दही, दुध भाताला उत्तमपैकी तूप जिर्याची आणि लाल तिखटाची फोडणी बरोबर पाव भाजीची भाजी ३. पाव भाजीचा अतिबटर लावून भाजलेला पाव + चहा ४. माणिक पैंजण + गोड ताक + ताज्या कैरीच्या लोणच्याचा खार ५.

इंग्रजी शब्दांचा मराठीत होणारा चुकीचा वापर

लेखक मराठी कथालेखक यांनी शुक्रवार, 25/07/2014 16:48 या दिवशी प्रकाशित केले.
मराठीत (वा हिंदीत) बोलताना इंग्रजी शब्दांचा वापर होणे नित्याचेच आहे. पण त्यातही चुकीच्या शब्दांचा वापर पाहिला की हसावे की रडावे ते कळत नाही. आणि हा वापर इतका भक्तिभावे होतो की वाटावे हे जणू मराठीच शब्द आहेत. काही उदाहरणे देत आहे. १) Queue करीता रांग हा मराठी शब्द प्रतिशब्द न वापरता "लाईन" हा शब्द सर्रास वापरला जातो. कधी त्याचे "लायनी" असे अनेकवचन ऐकले की बोलणार्‍याची 'कीव' कराविशी वाटते. २) वीज वा वीजप्रवाह याकरिता 'लाईट' ३) Bicycle करिता 'सायकल' ४) पती/पत्नी करीता अनुक्रमे मिस्टर/मिसेस.

जीवन विमा/आरोग्य विमा माहिती हवी

लेखक तुषार काळभोर यांनी शुक्रवार, 25/07/2014 15:29 या दिवशी प्रकाशित केले.
येथे सध्या विम्यामध्ये होणार्‍या फसवणुकीविषयी चर्चा चालली आहे. पण विमा म्हणजे केवळ कंपनीचा फायदा/एजंटचा फायदा, असं नाही. तर विचारपुर्वक गरजेनुसार घेतलेला विमा नक्कीच 'आपल्या' फायद्याचा ठरू शकतो. मला थोडी माहिती: योग्य/अयोग्यः आहे, आणि थोड्या शंकाही आहेत, त्यावर चर्चा व्हावी असे वाटते. सर्वांच्या अनुभवातून (व वादविवादातून ...... ऊप्स! चर्चेतून!! ;) ) हा धागा नक्कीच माहितीपुर्ण होईल. १. जीवन-विमा व गुंतवणुक या वेगळ्या गोष्टी आहेत. टर्म इन्श्युरन्स सोडून इतर सर्व पॉलिसीज या फक्त आणि फक्त विमा कंपनी व एजंट यांच्या आर्थिक फायद्यासाठी असतात.

तमाशा : महाराष्ट्रातील एक रांगडा कलाप्रकार

लेखक psajid यांनी शुक्रवार, 25/07/2014 15:17 या दिवशी प्रकाशित केले.
नुकतेच जेष्ठ तमाशा कलावंत बाळू उर्फ अंकुश संभा खाडे यांचे वृद्धापकाळाने सांगलीच्या सरकारी रुग्णालयात निधन झाले. यापूर्वी २0११ मध्ये त्यांचे बंधू काळू ऊर्फ लहू संभाजी खाडे यांचे निधन झाले. दोघांच्या रूपाने गेल्या सुमारे ६0 वर्षांतील तमाशात इतिहास घडविणारे व या इतिहासाचे साक्षीदार असणारे हरपले आहेत. एवढा प्रदीर्घ काळ काळू-बाळू या जोडगोळीने तमाशा गाजवला. मराठी मनावर राज्य केले. अखेरच्या श्वासापर्यंत ही जोडी एक होती. त्यांचे प्रपंच वेगळे झाले, मात्र दोघांत मतभेद कधी झाले नाहीत. सारखे दिसण्याचा, जुळेपणाचा आनंद त्यांनी सार्यांना दिला.

<इंचा-इंचाने आपण बेळगाव यळ्ळुर मध्ये माघार घेत आहोत>

लेखक प्रसाद गोडबोले यांनी शुक्रवार, 25/07/2014 14:35 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्र टाईम्स मधील ही बातमी वाचून महाराष्ट्रदेशाचे काय होणार अशी काळजी कुणाच्याही मनात उभी राहील. आपणही ही बातमी वाचा आणि विचार करा. मुख्य लेख वाचण्यासाठी "माऊस ची लेफ्ट क्लीक " आणि "डोळे" वापरा तर वाचकांचे प्रतिसाद वाचण्यासाठी ही डोळेच वापरावे लागतील. (आतापर्यंत ७ प्रतिसाद आले आहेत व एकही वाचण्यासारखा नाहीये .) http://maharashtratimes.indiatimes.com/nation/maharashtra-karnataka-bor… अलीकडे मी वाचलेल्या बातम्यातली ही एक अतीशय गंभीर बातमी आहे.

प्रबंध

लेखक वेल्लाभट यांनी शुक्रवार, 25/07/2014 14:34 या दिवशी प्रकाशित केले.
चिरदाह वेदनेचा मजला अखंड व्हावा मन त्यातही रुळावे, अन दाह थंड व्हावा येऊनिया न यावा माझा प्रयास कामी नशिबासही कसा हा माझाच छंद व्हावा ते शब्द आठविता, जणु काळही थिजावा एका क्षणाक्षणाचा बघता निबंध व्हावा एकी अशी असावी, निश्चय असा असावा हातात हात यावे, अन मार्ग रुंद व्हावा झिरपावी या मनात एकेक गोष्ट ऐसी प्रत्येक भावनेचा न्यारा सुगंध व्हावा विश्वास या मनीचा, एकाकी मंद व्हावा आतून हाक यावी, अन तो बुलंद व्हावा माझेच मी पुसावे अश्रू असे हसूनी कसलातरी मनाचा माझ्या प्रबंध व्हावा - अपूर्व ओक
काव्यरस

नसलेल्या बाईचं असणं.

लेखक इनिगोय यांनी शुक्रवार, 25/07/2014 14:12 या दिवशी प्रकाशित केले.
आटपाटनगरात नसते एक बाई. तिला नसतं तिचं नाव. तिचं नसतं एक घर. तिचं नसतं एक कुटुंब. नसतो तिचा एक नवरा. तिची मुलं तर नसतातच तिची. नसतात तिची भांडीकुंडी. कपडेलत्ते. फर्निचर वगैरेही. तिचा नसतो तिचा वेळ. तिचा दिवस. तिचे श्रम तिचे नसतात. इतकंच कशाला.. तिची विश्रांतीही तिची नसते. तिचं शरीर. तिचं मन. तिची ओळख. तिचं जगणं. अहेवपणी नाहीच आलं तर म्हणे मरणही.. ...नसतं काहीसुद्धा तिचं. पण नाही म्हणायला तिचा असतो एक गाव. नदीकाठी असतं एक... अगदी ऎसपैस चिमुकलं घर! तिथे असतो तिचा एक मोकळा स्वच्छ श्वास. असतात सुंदर संध्याकाळी तिच्या. आणि पहाटेची निवांत वेळ? तीही असतेच. एखादा झोका..

डांबरी रस्त्यावर

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी शुक्रवार, 25/07/2014 11:55 या दिवशी प्रकाशित केले.
लांबच लांब डांबरी रस्त्यावर घरंगळत जाणारे पावसाचे पाणी कुठेतरी जाऊन थांबत असेलच कदाचित, तिथेच तू भेटशील.. -- तुला ते पाणी भेटल्यावर मी सोडलेली कागदाची नाव तुला सापडली असेलच त्यावर त्या नावेत तुझ्यासाठी माझी स्वप्नं पाठवली आहेत एखाद्या तरी स्वप्नाने तुला घायाळ केले असेलचं... -- त्या नावे पाठोपाठ नारळाच्या करवंटीत चार चाफ्याची फुलं पाठवली आहेत सकाळी घराच्या मागच्या आंगणात सापडली तेव्हा तुझ्या स्मिताचा सुगंध आठवला -- तुझ्यापर्यंत पोहचतांना किती चिमुकले भवरे पार केले असतील त्या नावेने कुणास ठाऊक पण तुला सापडली कि जप तिला तशी ती नाव खुप भक्कम आहे पण पाणी एकाजागी थांबत नसतं आणि नावेला कुठेतरी किनार्