Skip to main content

कल्पित सत्य: भाग १, २ (सव्वाशेर तडका आणि बुमरेंग)

लेखक निमिष सोनार यांनी शनिवार, 05/07/2014 10:54 या दिवशी प्रकाशित केले.
#कल्पित_सत्य (१)"सव्वाशेर तडका" सुचना: हा प्रसंग मला सुचलेला आणि पूर्णपणे काल्पनीक आहे पण तो सत्य व्हायला हवा का याचा विचार वाचकांनी करावा. एका न्यूज चैनेल चा फोटोग्राफर पाऊस न पडणाऱ्या एका भागात जातो. पाऊस न पडल्याने चिंतेत असलेला एक शेतकरी आकाशाकडे खूप आशेने बघत असतो. फोटोग्राफर त्याचा फोटो काढतो. त्या शेतकऱ्याला खूप राग येतो. तो फोटोग्राफरच्या कानाखाली एक ठेवून देतो. त्याचा कैमेरा हिसकावून घेतो आणि भेग पडलेल्या जमिनीत टाकून देतो. कैमेरा गेल्यामुळे फोटोग्राफर रडतो व शेतकऱ्याला मारायला धावतो.

वारी

लेखक आनंदमयी यांनी शनिवार, 05/07/2014 08:13 या दिवशी प्रकाशित केले.
श्वासांतून वाहे सावळा मुरारी.. पायी चाले वारी पंढरीची|| सावळ्या डोहात सावळा तरंग भक्तिरूपी दंग वारकरी|| बंधने जुनी का भासती विजोड देहा लागे ओढ विठ्ठलाची..|| अधिरश्या जिवा पावलांची साथ वसे अंतरात भक्तियोग || पाहता लोचनी विठ्ठल सावळा तप्त जीव भोळा श्रांत होई || विष्णुरूपी लीन होवून मरावे अंतास उरावे विष्णूरूप || अदिती जोशी
काव्यरस

न आवडलेली पुस्तके- (कादंबरी)

लेखक पुस्तकमित्र यांनी शुक्रवार, 04/07/2014 23:32 या दिवशी प्रकाशित केले.
एखाद्या पुस्तकाबद्दल छान छान परिक्षणं लिहून येतात, चर्चा घडलेल्याही आपण ऐकतो, कुणीतरी खूप कौतुक करतं, 'एकदा तरी हे पुस्तक वाचाच', असा आग्रह करतं, आणि आपण मोठ्या उत्सुकतेनी पुस्तक वाचायला घेतो तो काय? काही मोजक्या पानातच भलामोठ्ठा अपेक्षाभंग पदरी पडतो! हा असा अनुभव अगदी प्रत्येक वाचनवेड्याला आलेला असतो. ही अशी निराशा येण्याचं कारण काहीही असू शकतं, आपल्या पुस्तकाकडून निर्माण झालेल्या अपेक्षा किंवा मूळ कथेपासून/सत्य परिस्थितीपासून फारकत किंवा असंच इतर काहीही..... पण हे अनुभवही नक्कीच एकमेकांना सांगण्यासारखे असतात. इथेही पुस्तकवेड्यांनी आपले असे गमतीदार अपेक्षाभंग लिहावेत ही विनंती.

झटपट चकली(ब्रेडची)

लेखक इशा१२३ यांनी शुक्रवार, 04/07/2014 20:57 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः ब्रेड चुरा ३ वाटी बेसन पीठ २ चमचे तंदूळ पिठ २ चमचे ओवा १ चमचा धने पुड १/२ चमचा जिरे पुड १/२ चमचा आमचुर पावडर १ छोटा चमचा तिखट १ १/२ चमचा(आवडीप्रमाणे) तीळ १/४ वाटी मीठ चवीनुसार gj कृती: प्रथम तीळ भाजून घ्यावेत. बेसन पीठ आणि तांदूळ पीठ थोडेसे भाजून घ्यावे. एका भांड्यात सगळे साहित्य एकत्र करुन चांगले मळून घेणे.

महाराष्ट्रवादी पक्षांचे स्वबळाचे तुणतुणे

लेखक बाबा पाटील यांनी शुक्रवार, 04/07/2014 20:24 या दिवशी प्रकाशित केले.
च्यामारी महाराष्ट्रात दररोज एक एक जण नुसत्या दंडाच्या बेटक्या दाखवतायेत,्खरच एकदा होवुन जावुद्या खडाखडी,पाचही पक्षांना एकमेकांची लायकी तरी कळेल.(अवांतर -आप नावाच्या पक्षाला व इतर चिल्लर मंडळी यांना आम्ही महाराष्ट्रवादी पक्ष मानत नाही त्यामुळे त्यांच्या निष्टावंतानी पोटशुल करुन घेवु नये) तरी सध्या या महाराष्ट्रात पाच दहा तरी भावी मुख्यमंत्री फिरतायेत इतकच कशाला काही कवी मनाचे स्वंयघोषित नेतेही स्वतः मुख्यमंत्री झालो आहे असे स्वप्न पहात आहे अस समजल आहे.तरी सांप्रत देशी स्वबळावर लढल्यास कोना देशीचा (पक्षाचा)नेता राज्य सिंहासनावर विराजमान होतो हे पाहणे बरेच मजेदार प्रकरण असेल्,अशी अपेक्षा आहे,वर

कहां गये वो लोग?--मंग्या

लेखक राजेंद्र मेहेंदळे यांनी शुक्रवार, 04/07/2014 17:26 या दिवशी प्रकाशित केले.
हां गये वो लोग?--बाबूकाका कहां गये वो लोग?--आजीबाई कहां गये वो लोग?--नाथा दहावीची परीक्षा नुकतीच संपली होती.डोक्यावरचे अभ्यासाचे ओझे उतरले होते.आणि वर्षभर पुस्तकात घातलेल्या माना वर झाल्या होत्या.सुट्टीत कोण कोण कुठे कुठे जाणार ह्याचे बेत ठरत होते.एकीकडे उन्हाळा वाढत चालला होता आणि अंगातुन घामाच्या धारा वाहात होत्या. एकदा असाच दुपारचा चहा पीत गॅलरीत

नारकोंडम बेट-- पुढे

लेखक सुबोध खरे यांनी शुक्रवार, 04/07/2014 13:40 या दिवशी प्रकाशित केले.
नारकोंडम बेट-- पुढे आमच्या सर्व लोकांच्या गणवेशात आणि बुटात समुद्राचे पाणी भरून ते जड झाले होते. जेमिनी किनार्यावर आणल्याबरोबर नौदलाच्या मुलभूत प्रशिक्षणाप्रमाणे मागे बसलेल्या नौसैनिकाने जेमिनीची मोटर सुरु करण्याचा प्रयत्न केला. पण मोटार मध्ये सुद्धा पाणी शिरले होते आणि ती पण चालू होईना.आता प्रेम कुमारला अजूनच टेन्शन आले. कारण वायरलेस बंद होता. जेमिनीची मोटार चालत नव्हती (आणि त्याच्या खिशातील पाकीट आणि घड्याळ भिजले होते.) तो विचारू लागला सर आता परत कसे जायचे? मी का कुणास ठाऊक बेफिकीर होतो. मी त्याला म्हणालो कि जे होईल ते पाहू.

भरले खेकडे

लेखक जागु यांनी शुक्रवार, 04/07/2014 13:05 या दिवशी प्रकाशित केले.
पहिला खेकड्यांची थोडीशी माहीती करून घेऊ. खेकडे म्हणजे लहान मुलांचा आवडीचा बाऊ. अगदी त्यांना चालताना पाहण्या पासून ते खाण्या पर्यंत. लहानांबरोबरच मोठ्यांनाही खेकडे म्हणजे आवडते प्रकरणच. त्यात हे खेकडे लाखेने भरलेले असले म्हणजे तर अजूनच चविष्ट गंमत. तर ह्या खेकड्यांचेही अनेक प्रकार आहेत. त्यापैकी मला माहीत असलेले समुद्रातले, खाडीतले व डोंगर-जमिनीतले खेकडे. डोंगरातील खेकडे काळे कुळकुळीत पाठीचे असतात. त्यांना मुठे म्हणतात. इतर खेकड्यांपेक्षा हे जास्त चविष्ट असतात. समुद्रातील व खाडीतीत खेकडे जरा फिक्कट कळापट-करड्या रंगाचे असतात. समुद्रात तर नक्षिदार पाठीचे खेकडेही असतात.

मराठी संकेतस्थळ रचनाकार आणि विकसकांची माहिती हवी (वेब डिझायनर्स /डेव्हेलपर्स)

लेखक माहितगार यांनी शुक्रवार, 04/07/2014 11:41 या दिवशी प्रकाशित केले.
मराठीतील पहिले संकेतस्थळ मायबोलीच्या स्थापनेला जवळपास १८ वर्षे होत आली आहेत. मराठी संस्थळांना तंत्रज्ञान, स्थैर्य आणि आत्मविश्वास प्राप्त करून देण्यामध्ये मराठी संकेतस्थळ रचनाकार आणि विकसकांनी (वेब आर्कीटेक्ट्स/ डिझायनर्स /डेव्हेलपर्स) महत्वपूर्ण भूमीका निभावली आहे. उल्लेखनीय मराठी संकेतस्थळ रचनाकार आणि विकसकांबद्दल आणि मराठी संकेतस्थळे विकासात कार्यरत व्यावसायिक आस्थापनांबद्दल माहिती हवी आहे.

चव

लेखक भृशुंडी यांनी गुरुवार, 03/07/2014 21:48 या दिवशी प्रकाशित केले.
सोडी केशसंभार विखुरला स्तनांवर दृश्य वेड लावी मला नग्न सावळ्या रूपाचे हात वेढले उराशी त्याचे होता युग्मपाश बोटे आतुर धावती तप्त देठांपाशी खोल जाता नाभी-डोही घनदाट होई सृष्टी अंधारात साथ देती तुझे चित्कार चिंब ओल्या पाकळ्यांत होती जिव्हेचेच दंश माझ्या ओठांवर चव तुझ्या अमृताची
काव्यरस