Skip to main content

रोझे और रोटी!

लेखक हुप्प्या यांनी शुक्रवार, 25/07/2014 10:08 या दिवशी प्रकाशित केले.
दिल्लीच्या महाराष्ट्र सदनातील अनागोंदी कारभाराला कावलेल्या शिवसेना खासदारांनी राडा केला आणि त्यांच्या न्याय्य आणि उचित मागण्या मागे पडल्या आणि एका सच्चा रोझेदार मुस्लिमाला त्याचा रोजा भंग करायला लावण्याचे महामहामहापाप त्यांच्या डोक्यावर बसले. मूळ समस्या साफ मागे पडली आणि नसते लचांड गळ्यात पडले. आता दादापुता करुन आपण मुस्लिमांचे तारणहार कसे आहोत. सर्व धर्मांचा आपण कसा आदर करतो वगैरे फालतू आणि खोटारडी बडबड शिवसेनेच्या विविध नेत्यांच्या तोंडून ऐकावी लागत आहे.

रस्ता - रस्सा

लेखक अत्रन्गि पाउस यांनी गुरुवार, 24/07/2014 21:15 या दिवशी प्रकाशित केले.
दुसर्या त्या धाग्यातला रस्सा ऐवजी रस्ता वाचून आठवले .. काही वेळा प्रचलित शब्द काही जण थोडासा विचित्र वापरतात ... अर्थ लक्षात येतो नाही असे नाही पण कानाला खटकत राहते ... आमचे एक मित्र 'आवश्यकता'हा शब्द नेहेमी 'आवशक्यता" असा वापरतो...कितीही वेळा सांगितले तर उपयोग शून्य .. तसेच आमची एक मामी एकदा घरातला फ्युज गेला आणि तो दुरुस्त केला होता तेव्हा म्हणाली होती "काय करणार, सकाळी इलेकट्रिकसिटी गेली आणि मग बराच वेळ मेकानिक'ल' आलाच नाही" तसेच काही ऐकलेले शब्द (बरोबर - चुकीचे) (प्रोक्षण - प्रक्षोण) Continental - Contentinental असो

टेक्निकल रायटींगबद्द्ल माहिती हवी आहे.

लेखक अंतरा आनंद यांनी गुरुवार, 24/07/2014 16:11 या दिवशी प्रकाशित केले.
Technical writing / instructional designing ' या क्षेत्राबद्द्ल माहिती हवी आहे. (१) या क्षेत्रातले नोकर्‍यांचे तसेच फ्रीलान्सिंग कामाचे स्वरुप, संधी याबद्द्ल माहिती हवीय. (२) या क्षेत्रात कामासाठी स्वत:ला तयार करायचे असेल तर कोणती कौशल्ये शिकायला हवीत?आणि कशी? (३) टेक्निकल रायटिंग (नुसतं software Tools नव्हेत तर content generation) चे प्रशिक्षण देणार्‍या चांगल्या संस्था कुठ्ल्या? यातले online courses करायचे असल्यास कोणत्या संस्थेचे करावेत? आंतरजालावरून शोधलेल्या काही संस्था म्हणजे TECHTOTAL ,TWB , TECHNOWRITES आणि ibruk. यापैकी ibruk मुंबईत असल्याने जवळ.

मार्बल केक: प्रकार २

लेखक स्वाती दिनेश यांनी गुरुवार, 24/07/2014 16:05 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या त्सेंटा आजीची एक मैत्रिण आहे, बिर्गिटं तिचे नाव.. भयंकर उत्साही! सत्तरीच्या पुढची ही तरुणी, अजूनही कुठेकुठे पाककलास्पर्धां मध्ये भाग घेऊन जिंकत असते..

बिरड्या/डाळिंब्यांची मिसळपाव

लेखक कंजूस यांनी गुरुवार, 24/07/2014 15:25 या दिवशी प्रकाशित केले.
बिरड्या/डाळिंब्यांची मिसळपाव फोटो इथे http://s1366.photobucket.com/user/Wdapav/library/m2 पाहा . साहित्य : भिजवून मोड आणून सोललेले वाल उर्फ बिरड्या/डाळिंब्या एक वाटी , मसाल्यासाठी: लसूण चटणी , किसलेले सुके खोबरे भाजून , लाल तिखट ,हळद ,मिठ . तेल . मिसळीत टाकण्यासाठी : कांदा ,लिंबू ,फरसाण ,बारीक शेव ,तळलेला पोहे चिवडा ,कोथिंबीर ,भावनगरी इ०. कृती : १)बिरड्या थोड्या पाण्यात शिजायला ठेवा . २)अर्धवट शिजल्यावर त्यातील थोड्या घेऊन मसाल्याबरोबर कुटा/वाटा .त्याला थोड्या तेलावर भाजा . ३)वरील मिश्रण अगोदर शिजत असलेल्या बिरड्यात सोडून उकळले

जडण-घडण...7

लेखक माधुरी विनायक यांनी गुरुवार, 24/07/2014 14:58 या दिवशी प्रकाशित केले.
जडण-घडण...7 शाळेत मी छान रमून गेले होते. डी. एड्.च्या मैत्रिणीही संपर्कात होत्या. अनुभवांची देवाण - घेवाण सुरू होती. अशात एके दिवशी त्यापैकीच एका मैत्रिणीचा फोन आला. तिचं बोलणं ऐकून मला वाईट वाटलं, पण फार धक्का नाही बसला. म्हटलं तर फार वेगळी गोष्ट नाही. ती दोन भावांची एकुलती लाडकी बहीण. ९६ कुळी. आणि जातीबाहेरच्या मुलाच्या प्रेमात पडलेली. घरून प्रचंड विरोध, मात्र मावशीची साथ, कारण मुलगा खरंच चांगला होता. अगदी दोघांची कुटुंबं एकमेकांना उत्तम ओळखणारी. पण मुलगा आपल्यातला नाही, या एका कारणावरून तिच्या घरच्यांचा विरोध. त्यावरून रोज वाद.

डॉक्टर आणि समीक्षक

लेखक विवेकपटाईत यांनी गुरुवार, 24/07/2014 07:39 या दिवशी प्रकाशित केले.
एकाच्या हातात कात्री दुसऱ्याच्या हातात लेखणी डॉक्टर आणि समीक्षक करतात सदा चीरफाड. डॉक्टरची कात्री चालते शरीरावर बहुतेक रोग्यांचे वाचविते प्राण. समीक्षकाची लेखणी चालते कवितेवर बहुतांश कवींचे *हरते ती प्राण.
*टीप: समीक्षकांच्या, समीक्षेला घाबरून बहुतांश कवी कविता करणे सोडून देतात.
काव्यरस

इन्सुरन्स विषयी माहिती हवी आहे

लेखक jaydip.kulkarni यांनी बुधवार, 23/07/2014 21:00 या दिवशी प्रकाशित केले.
गेले काही दिवस रिलायंस लाइफ इन्सुरन्स चे फोन येत आहेत , त्यांनी एक आकर्षक ऑफर माझ्यासमोर मांडली पण मला त्या विषयी पूर्ण खात्री /विश्वास नव्हता म्हणून इथे सल्ला हवा आहे .. तर ऑफर अशी आहे - रिलायंस लाइफ इन्सुरन्स ची एक पौलीसी घ्यायची आणि हि पौलीसी रिलायंस कॅपिटल कडे मोर्गेज करून त्यावर एक ठरावीक रक्कम लोन म्हणून घ्यायची , लोन चा कोणताही हफ्ता भरायची गरज नाही , फक्त दर वर्षी पौलीसी प्रिमियम भरायचा सलग 15 वर्षे , नंतर २० वर्षांनी जेव्हा एक ठराविक रक्कम मिळेल त्यातून मूळ कर्ज तसेच ४.९९ % व्याज दराने व्याज रिलायंस कॅपिटल कापून घेईल व उरलेली रक्कम परत मिळेल .....

बडबड गीत

लेखक भिंगरी यांनी बुधवार, 23/07/2014 16:23 या दिवशी प्रकाशित केले.
एक बडबड गीत ............. बरं का ग मंदा काय झालं एकदा, ताई आमची चिरत होती खसाखसा कांदा . कांदा राहिला हातात विळी गेली बोटात विळी वरुन उठली, नाचत सुटली. धक्क्याने मोराम्ब्याची बरणीच फुटली. हाय हाय हाय काचेवरती पाय. काच गेली पायात आता करू तरी काय? बाबा हसले खो खो खो आई हसली खी खी खी ताईला आले रडू आईने दिला लाडू ---------------------------------------- आणि हे 'बेताल बरबाद गीत' ............. बऱ का गं जनता काय झालं एकदा मंत्री आमचे मोडत होते पटापटा कायदा. कायदा राहिला बुकात शिक्षा झाली कोकणात. हाय हाय हाय माझ्या पोराचे काय? पत गेली आता करू तरी काय? पदावरून उठले भांडत सुटले धक्क्
काव्यरस