सिग्नल - लघुकथा
सिग्नल पडला तशी त्याने बाईक झेब्रा क्रॉसिंगच्या अलीकडे थांबवली.त्याच्या मागोमाग एक दोन बाईक्स येउन झेब्रा क्रॉसिंगच्या अलीकडेच थांबल्या. पण 'व्यक्ती तितक्या प्रवृत्ती' प्रमाणे जसं वेळ जात होता तसं येणारी वाहणं क्रॉसिंग पार करत होती. एका काकांनी त्याच्या उजव्या बाजूने जाऊन त्याच्या समोरच बाईक लावली.एक मुलगी, ती आली तिथून तिला उजवीकडे वळण शक्य नसल्याने डाव्याबाजूला वळून झेब्रा क्रॉसिंगच्या पुढे येउन थांबली. अस करत अर्धे अधिक लोक झेब्रा क्रॉसिंग वर आले. त्याच्या मनात विचारांनी गर्दी केली.
ह्या लोकांना नियम पाळायला काय होतं?
सप्ताहिक सकाळ-२ लेख!
साप्ताहिक सकाळमधे मध्यंतरीच १ लेख प्रकाशित झाला होता.तो मि इथे शेअर केलेला आहे. आता त्याच्यापुढील प्रवास.. गेल्या दोन अंकात अजून २ लेख आलेत. हे दोन्ही लेख तसे गणेशोत्सवाशी संबंधीत आहेत.
माझे मित्र आणि सा.सकाळचे उपसंपादक :- अभिजीत सोनावणे यानी मला श्रावणाच्या पहिल्या अठवड्यात सदर दोन्ही विषयावर लेख हवेत,म्हणून सांगितले होते.
मैत्रीण
(पात्र: ताई: उमेश ची मोठी बहिण, उर्मी: उमेशची बायको, उमेश)
उर्मी: वन्स, तुम्ही समजवा न उमेशला, तुमच ऐकेल तो. मी पुष्कळ प्रयत्न केला माझं ऐकतच नाही. एकच रट लाऊन बसला आहे, पहिले मुलगा पाहिजे, मुलीचं नंतर बघू. वन्स, लग्नानंतर पहिल्यांदा गर्भार राहिली आहे मी. पहिले मुलगी झाली तर काय झालं. मी त्याला म्हंटले, पुन्हा गर्भात मुलगी आली तर मी नाही म्हणणार नाही गर्भपाताला. भावाला बहिण पाहिजेच. मग बहिण मोठी असेल तर काय फरक पडतो.
ताई: पुष्कळ फरक पडतो, तुला माहित आहे, बाबांनी माझ्यासाठी इंजिनिअर मुलगा बघितला. सालंकृत कन्यादान केल, सव्वा लाख हुंडा दिला वर २० तोळे सोन ही.
थोडे अद्धुत थोडे गूढ - २
हेनरी मॉरीसन फ्लॅगर हा एकोणिसाव्या शतकातील एक द्रष्टा अमेरीकन उद्योगपती. स्टँडर्ड ऑईल कंपनीचा एक प्रमुख भागीदार असलेल्या फ्लॅगरला १८७८ मध्ये पहिल्या पत्नीच्या आजारानिमीत्त फ्लोरीडात आल्यापासून त्या प्रदेशाने आकर्षीत केलं होतं. पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर यथावकाश त्याने फ्लोरीडाला कायमचं वास्तव्यास येण्याचा निर्णय घेतला.
त्या काळी फ्लोरीडा हा गरीब आणि मागासलेला प्रदेश होता. परंतु पर्यटकांना आकर्षीत करण्याची फ्लोरीडाची क्षमता फ्लॅगरने अचूक ओळखली. मात्रं त्या काळात फ्लोरीडात उत्तमपैकी हॉटेल आणि वाहतुकीच्या साधनांची वानवाच होती.
ट्रेकिंग बिकिंग
विकेंड बिकेंड
ट्रेकिंग बिकिंग ...
धबधबे.. डोंगर बिंगर ...
पोरी बिरी जाकेटातल्या...
फोटो बिटो
uploading.....
Tag
like
कमेंटेड ...इंजोयेड अलोट....
एकच तर जिंदगी हि...
एकच तर जिंदगी हि
बालपण मार खाण्यात गेल
जवानी अभ्यास करण्यात
अभ्यास करण्याच्या वयात प्रेम केलं
आन आयुष्य घातलं खड्ड्यात
म्हणतात आपलं भविष्य आपण ठरवतो
पण हे कोण सांगणार त्या गरीब मुलाला
कि त्यावर ९५ टक्के प्रभाव
घरात्ल्यांचाच असतो
स्वप्न बघायला मन उघडं असते
पण हे पण ऐका लोक्कांनो
त्या पक्षीच्या शेपटीला एक दोरी पण बांधलेली असते
आकाशाला जरी सीमा नसली तरी
आता तुमच्या स्वप्नांना सीमा असते
मजा करण्याचा वय त्या मुलाचं
डिप्रेशन मध्ये अडकला
सगळ्या चिंता विसरण्याचा सोडून
प्रेयसीच्या रुसव्या-फुग्व्यान मध्ये लटकला
हे म्हणजे आधीचा मर्कट त्यावर मद्यप्याला
रस हळू हळू उडत जाई जीवनाचा
इतक्या डिप्रेशन मध्ये पाहून
सोडून गेली कि हो ती त्याला
प्रेयसी गेली सोडून
घरातल्यांशी तो भांडला
मित्र मात्र अजूनही होते
पण ह्याने आत्महत्येचा पर्याय निवडला
गुंफता कवन हे
नमस्कार मंडळी,
एका उर्दू संकेतस्थळावरील काव्यदालनात विहरताना मला एक रोचक धागा दृष्टीस पडला होता. त्या धाग्यातील कल्पना मला आवडली, आणि ती मिपावरही आपण उतरवावी असा मनात विचार आला. त्यासंदर्भात संपादक मंडळाशी संवाद साधून त्यांच्या सहमतीने, वतीने मी ही कल्पना, हा उपक्रम आपल्या सगळ्यांसमोर मांडत आहे.
गुंफता कवन हे
उपक्रमाचं साधारण स्वरूप असं आहे, की एक काफ़िया घेण्यात यावा, आणि त्याला आपापल्या प्रतिभासाच्यात घालून सभासदांनी त्यांना सुचतील तसे शेर जोडत जावे आणि आकारास यावी एक सुंदर कविता; एक सुंदर ग़ज़ल.
याकरिता, दोन काफ़िये दिले जात आहेत.
तवा पुलाव
मला पडलेले काही अत्यंत गंभीर प्रश्न - भाग १
मला पडलेले काही अत्यंत गंभीर प्रश्न खालीलप्रमाणे (कृपया प्रामाणिक व खरीखुरी उत्तरे द्यावीत. कृपया प्रतिसाद गोडसे/गांधी/मोदी/सावरकर, धर्मनिरपेक्षता, काँग्रेस/भाजप, ब्राह्मण/अब्राह्मण इ. जहाल विषयांच्या वळचणीला नेऊ नये ही नम्र विनंती).
(१) घोडा व बैलाच्या तळपायांना खिळे मारून नाल ठोकले जातात. चालताना ते खिळे त्यांना बोचतात का? चालताना खिळ्यांमुळे त्यांच्या तळपायांना जखमा होतात का?
(२) संसदेच्या किंवा विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मंत्रीमंडळाने तयार केलेले भाषण राष्ट्रपती किंवा राज्यपाल वाचून दाखवितात.
मिसळपाव