मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

उच्च दर्जाचे हेल्मेट ची सक्ती, असावी/नसावी ?

पगला गजोधर · · काथ्याकूट
आजचा फिल ह्यूजचा मृत्यूदिवस हा क्रिकेटसाठी अतिशय दु:खद दिवस आहे. मिपाकरांतर्फे मी, 'ईश्वर त्याच्या आत्म्याला शांती देवो' अशी प्रार्थना करतो. सामन्यादरम्यान बाऊन्सर डोक्यावर आदळल्याने जखमी झालेला ऑस्ट्रेलियाचा फलंदाज फिलीप ह्युज याचे आज सकाळी निधन झाले. अवघ्या २५ वर्षांचा ह्युज शेफिल्ड शिल्ड सामन्यादरम्यान मंगळवारी बाऊन्सर लागून व तो बेशुद्ध पडला. त्याच्यावर सेंट व्हिन्सेंट इस्पितळात तातडीची शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र त्यानंतर तो कोमात गेला होता. गेल्या दोन दिवसांपासून तो मृत्यूशी झुंज देत होता, मात्र आज त्याचे निधन झाल्याने ही झुंज अपयशी ठरली. दरम्यान ह्युजने सामन्यादरम्यान घातलेले हेल्मेट जुने तसेच हलक्या दर्जाचे होते, असे हेल्मेट बनविणारी कंपनी ‘मासुरी’ने स्पष्ट केले असून, त्यामुळे क्रिकेटमध्ये सुरक्षेच्या उपायासाठी, आता मैदानातील सर्वच खेळाडूंना (फलंदाज + जवळचे सर्वच क्षेत्ररक्षक यांना), त्यांची इच्छा वा नसो, त्यांनी 'उच्च दर्जाचे हेल्मेट ची सक्ती', ICC ने करावी का ? किंवा सक्ती करू नये व खेळाडूंना तो निर्णय घेऊ द्यावा ?

वाचन 13714 प्रतिक्रिया 0