Skip to main content

इंग्रजी गाण्यांचे हिंदी संस्करण

शुक्रवार, 26/12/2014 या दिवशी प्रकाशित केले.
डिस्क्लेमर : हा धागा प्रास ह्यांना समर्पित. काल खूप दिवसांनी हिंदी गाणी ऐकत होतो.गाणी ऐकता-ऐकता तलत मेहमूदचे "इतना ना मुझसे तू प्यार जता" हे गाणे सुरु झाले. आणि लक्षांत आले की हीच सुरावट आपण ऐकली आहे.आज मुद्दाम शोध घ्यायचा ठरवला आणि समजले की, सुरावट तीच आहे. बघा पटत असेल तर... मोझार्टची सिंफनी : http://www.youtube.com/watch?v=-hJf4ZffkoI सिनेमातील गाणे : http://www.youtube.com/watch?v=yydQcwOmGck मग अजून काही गाणी आठवत गेली... सिनेमा : कबूतर का बदला उर्फ मैने प्यार किया.... मूळ गाणे : http://www.youtube.com/watch?v=TcJ-wNmazHQ&ytsession=_eW2qIcqmhLGmbnqXE… सिनेमातील गाणे : http://www.youtube.com/watch?v=-hJf4ZffkoI सिनेमा : घायल मूळ गाणे : http://www.youtube.com/watch?v=iyLdoQGBchQ&ytsession=68Zt10aApoP5RRtA_w… सिनेमातील गाणे : http://www.youtube.com/watch?v=3ttlkdoFFEU&ytsession=4aUtfTG0moi_Yt0fi1… आणि आता सर्वात शेवटी आमचे आवडते...कारण ह्या मुळ गाण्यावर बप्पीदांनी मस्त हिंदी संस्करण केले.आणि बॉनी-एम सारख्या प्रथितयश ग्रूपला पण हे गाणे गायचा मोह आवरता आला नाही. सिनेमा : बहुदा "प्यारा दुश्मन" मूळ गाणे : http://www.youtube.com/watch?v=g_jUtiKSf1Y हिंदी सिमातील गाणे : http://www.youtube.com/watch?v=wdmVO_Maujo बॉनी एम : http://www.youtube.com/watch?v=RW65T5SjFeA आता निदान ह्यानिमीत्ताने तरी "प्रास" भाऊ त्यांच्याकडच्या पोतडीतून काहीतरी खास चीज़ काढतील अशी आशा...

वाचने 30675
प्रतिक्रिया 43

प्रतिक्रिया

In reply to by hitesh

पण कधी कधी कुणाचेही बोट न पकडता, अचानक लागलेला शोध जास्त महत्वाचा वाटतो. कारण वरील सगळी गाणी मला कुणाचीही मदत न घेता मिळाली. फारच अडल्याशिवाय किंवा अज्ञान असेल तरच मिपाकरांची मदत घ्यायचे ठरवले आहे. परत एकदा... लिंक बद्दल मनापासून धन्यवाद...

असंख्य उदाहरणं मिळतील बघा आता प्रतिसादांत ! प्रेरणा म्हणा किंवा चोरी..... अशी हुबेहूब गाणी आरडींच्या काळापासून अवतरत आली आहेत हिंदी चित्रपटांत. (यावर काथ्याकूटही झाला होता माझ्या आठवणीप्रमाणे मिपा वर.... कुणी वाचनखूण असेल तर द्यावी) मी एक छोटीशी लिस्ट देतो इथे चित्ररूपात.... बाकी जाणकार मिपाकर योगदान देतीलच.... खात्री बाळगू शकता. Bollywood-Chor-Giri

माझ्याकडे लिंक्स नाहीत पण या गाण्यांच्या चालींमध्ये आश्चर्यकारक साम्य आहे - १.मूर्तिमंत भीती उभी (नाटक: संगीत शारदा) आणि ये जिंदगी उसीकी है (चित्रपट: अनारकली) २.ठंडी हवाएँ लहराके आए (चित्रपट: नौजवान) सागर किनारे दिल ये पुकारे (चित्रपट: सागर) ३.मै जिंदगी मे हरदम रोता ही रहा हूँ (चित्रपट: बरसात) बरसात मे जब आयेगा सावन का महीना (चित्रपट: माँ ) ४.ये मेरा दीवानापन है (चित्रपट: यहुदी) देख हमें आवाज ना देना (चित्रपट:अमरदीप ) ५. खूबसूरत हसीना जानेजाँ जानेमन (चित्रपट: मि.एक्स इन बाँबे) ऐ मेरे हमसफर ऐ मेरी जानेजाँ (चित्रपट: बाजीगर) अशी अजून बरीच आहेत पण ही पटकन आठवणारी!

सागर किनारे दिल ये पुकारे (चित्रपट: सागर) हे गाणे यमन मधील आहे. याच्याशी साधर्म्य असणारी बरीचशी गाणी आहेत. पण थेट चाल आहे ती नरमगरम चित्रपटातील " हमे रासतों की जरुरत नही है..." या गाण्याशी आहे आर डी बर्मन ने याबद्दल बोलताना साम्गितले की त्याने एखादा चित्रपट फारसा गाजला नाही तर त्यातली चांगल्या चालींची गाणीही मागे पडतात त्यामुळे त्याने ती चाल दुसर्‍या चित्रपटात वापरली.. असाच किस्सा आहे तो अभिमान चित्रपटातील " तेरे मेरे मिलन की ये रैना." या गाण्याची चाल झुटी चित्रपटात वापरली.] मात्र सागर किनारे दिल ये पुकारे या गाण्याची चाल मराठीतील "पुण्यवम्त दाता.धरी मनी खंत." या वरून घेण्यात आलेली आहे. अजून एक "तू कल चला जायेगा तो मै क्या करुंगा.तू याद बहुत आयेगा तो मै क्या करुंगा" चित्रपट जनम. या गाण्याची चाल मराठीतील "हलके हलके जोजवा बाळाचा पाळणा. पाळण्याच्या मधोमध फिरतो खेळणा " या गीतावरून घेतलेली आहे

In reply to by विजुभाऊ

"तू कल चला जायेगा तो मै क्या करुंगा.तू याद बहुत आयेगा तो मै क्या करुंगा" चित्रपट जनम. या गाण्याची चाल मराठीतील "हलके हलके जोजवा बाळाचा पाळणा. पाळण्याच्या मधोमध फिरतो खेळणा " या गीतावरून घेतलेली आहे आरारारा!!!

खरं तर यात लहान मोठा असा कोणी नाहीये. तरीपण सगळ्यात मोठे चोर इन्स्पायर्ड> आहेत राजेश रोशन आणि अन्नु मलिक. राजेश रोशनने तर अमेरिकन नागरी युद्ध (सिविल वॉर्)चे गाणे सुद्धा सोडले नाही. वर्जिनल = ना बोले तुम ना मैने कुछ सुना... (अमोल पालेकरचा बातों-बातोंमें) ढुप्लिकेट= व्हेन जॉनी कम्स मार्चिंग होम

सागर किनारे, दील ये पुकारे याची चाल (म्हणजे सुरूवातीच्या ओळीची) मला पुढील तीन गाण्यांसारखी वाटते.. थंडी हवाए लहराके आये.... रहेना रहे हम, महका करेंगे.. हमे और जीने की, चाहत ना होती (अगर तुम ना होते..) बाकी एक गाणे दुसर्‍या गाण्याच्या चालीवर म्हणले तर खूप गंमत येते...

last christmas, I gave you my heart - दील मेरा चुराया क्यु? (अकेले ह्म अकेले तूम..) mama mia - मिल गया..हमको साथी मिल गया... आता पुढील गाण्याचे वरीजीनल गाणे ओळखा पाहू...(हिंट : आपली सगळ्यांची लाडकी हिरॉईन आहे वरीजीनल मध्ये...) https://www.youtube.com/watch?v=gxN9p5xA8cM

In reply to by योगी९००

ह्या गाण्याची एक गंमत आहे... आर.डी. ने त्याच गाण्यात ४ गाणी गुंफली आहेत...http://www.youtube.com/watch?v=P8DChUlivQ0 १. चांद म्रेरा दिल २. कदमो में आ दिल क्या मयफिल है तेरे ३. तुम क्या जानो ४. मिल गया आणि असाच प्रयोग त्याने अज्जुन एकदा केला..."यादों की बारात"...http://www.youtube.com/watch?v=fmnmiuSboJs १. आप के कमरे में कोई रहता है २. दिल मिल गये ३. दम मारो दम (ऑल टाइम फेवरीट) मला वाटते असाच एक प्रयोग त्याने "१९४२ अ लव स्टोरी"त पण केला होता. हॅटस ऑफ फॉर आर.डी. ह्या आर.डी. वर कुणीतरी जोरदार लिहायला पाहिजे...आमचा अभ्यास कमी पडतो.

ह्म्म्म "चेहरा है या चांद खिला है " (सागर) हे रुशी पकूरचं गाणं पोवाड्यासारखं म्हणून पाहा बरं! अरे चेहरा है या चांद खिला है~~~~~~~~~~~~~~ जुल्फ घनेरी श्याम है क्या... ओ ओ ओ ओ .... अन सागर जैसि आंखोवाली ये तो बता तेरा नाम है क्या.. जी जी रं जी!!

एनिग्माचं वे टू एटर्निटी... आणि त्याच्यावरून ढापलेलं भरो... मांग मेरी भरो.... स्टारिंग अक्शय आणि ममता....

घरकुल ह्या मराठी चित्रपटातील 'पप्पा सांगा कुणाचे' हे जॉन रेगनच्या 'पपा हि लव्हज ममा' व 'नं.५४' हे अँडी विल्यम्सच्या 'हाउस ऑफ बांबू'वरुन जसेच्या तसे उचलले आहे.

च्यायला ! किती वेळा सांगू तुम्हाला. अगदी ० पासून विमानापर्यंत सगळे शोध भारतातच लागलेले आहेत. बाहेरच्या लोकांनी ते सर्व इथूनच ढापले आहे. हा आता ते त्यांनी आपल्या वेळेपेक्षा अगोदर प्रकाशित केले एवढ्यावरुन तुम्ही आम्हाला ढापूचंद / चोर म्हणता ? आपणच आपल्या माणसांना नावे ठेवली तर कसे होणार ? "आपला तो बाब्या, दुसर्‍याचं ते कार्ट" असे वागायला कधी शि़कणार रे तुम्ही सर्वजण ?

इथलाच ५ वर्षांपूर्वीचा 'गाडी रुळांवरून सांधे बदलून जाते तेंव्हा' हा धागा आठवला. चिरतरूण विषय आहे, आणखी मजेशीर माहिती वाचायला मिळेल.

आपल्या वडिलांच्या - सचिनदांच्या ' देवदास ' मधील ' आन मिलो शाम सावरे ' वरुन आर.डी.ने ' कुछ ना कहो ' (१९४२: अ लव्ह स्टोरी)बेतलं. सचिनदांच्या ब-याच गाण्यांच्या अप्रतिम आॅर्केस्ट्रेशनमागे आर.डी.चा सहभाग आहे - उदाहरणार्थ ऐ मेरी टोपी पलटके आ (फंटूश), बैठे है क्या उसके पास (ज्वेल थीफ), मीत ना मिला रे मन का (अभिमान). अशी बरीच आहेत.

आर डी चं महेबूबा महेबूबा खरं तर या दोन्ही गाण्यांआधीचं एक यिडिश गाणं हे म्हणे मूळ गाणं आहे असं मला माझ्या मुलाने सांगितलं होतं, कोणतं ते आता आठवत नाही. याच गाण्यावर आधारित इंग्लिश गाणं

याना फांद्यावर बान्धिले गं मुलीनी हिंदोळे , पंचमीचा सण आला डोळे माझे ओले , याला चाल सुचत नव्हती. अचानक त्यानी एक हिंदी गाणे ऐकले व चाल सुचली. पंछी बनु उडती फिरु मस्त गगन मे

In reply to by hitesh

'फांद्यावर बांधिले ग'वाटव्यांनी चाळीशीच्या दशकात प्रस्तुत केले होते. 'पंछी बनू' पन्नाशीच्या दशकातील गीत आहे. वास्तविक 'फांद्यावर' वरून एन. दत्तांनी 'झुकती घटा, गाती हवा' चा अंतरा बेतला आहे, हे त्यांनीच एका मुलाखतीत सांगितले आहे.

In reply to by प्रदीप

मलाही हीच शंका होती. क्रोनोलॉजीबद्दल शंका होती.

हे मराठी गाणे मूळ http://www.aathavanitli-gani.com/Song/Phandyavari_Bandhile_Ga हे गाणे कॉपी आहे https://www.youtube.com/watch?v=RJ8YV7jHgv4 हे मूळ गाणे https://www.youtube.com/watch?v=im_0uzsQH_w आणि घर आया मेरा परदेसी https://www.youtube.com/watch?v=ujW8N9bvvCI

आण्णु मलीकच्या गान्यांबद्दल ल्ह्या ना. अगदी मेरा पिया घर आया , दम मस्त कलम्दर मस्त मस्त ( तु चीझ बडी है मस्त मस्त...)

तू चीज बडी है मस्त तुमचा नेमसेक विजू शाहचं आहे.

काय मज्जा धागा आहे हा ! ही सगळी गाणी ऐकतेय आणि थक्क होतेय. याला प्रेरणा चोरी ढापूगिरी काहीही म्हणा, सगळी गाणी मस्त आहेत. मजा आली.

पाकी गाण्यांचे बॉलिवुडी संस्करण हा विषय येउ दे