पूर्वेच्या समुद्रात-४
लेखनप्रकार
पूर्वेच्या समुद्रात-४
बेयपूर या ठाण्याकडून आम्ही निघालो आणि कोचीकडे कूच केले. समुद्र खवळलेला होताच. पण रोज मरे त्याला कोण रडे या न्यायाने सर्व जण त्याकडे दुर्लक्ष करत होते. हे म्हणजे एखादे आक्रस्ताळे दुसर्याचे मुल रडून तुम्हाला त्रास देत असेल तरी तुम्ही काहीही करू शकत नाही तेंव्हा त्याकडे दुर्लक्ष करायला शिकता तसे.
काही काळाने कोचीचे बंदर दिसू लागले. तेथे समुद्र कायमच अतिशय खवळलेला असतो. तेंव्हा त्या डचमळणार्या समुद्रातून कोचीच्या संथ पाणी असलेल्या कालव्यात (बैक वाटर) शिरली तेंव्हा जोराच्या पावसात आपली गाडी एकदम बोगद्यात शिरते तेंव्हा कसे एकदम आवाज बंद होऊन शांत वाटते तसे वाटू लागले.
काही मिनिटात आमचे जहाज किनार्याला लागले. छान सकाळ होती. त्यातून आमच्या डाव्या इंजिनाच्या पंख्यातून काहीतरी आवाज येत असल्याचे शुभ वर्तमान आमच्या इंजीनियरने दिले. त्यामुळे जहाज एक दिवास तरी कोची बंदरात थांबणार असण्याची उत्साहवर्धक बातमी त्याने दिली. आता इतकी छान बातमी मिळाल्यावर मी ताबडतोब कॅप्टनला कोचीच्या संजीवनी या रुग्णालयात मित्रांना भेटायला जातो म्हणून परवानगी विचारली. नाही तरी मला काही काम नव्हतेच. पण ते म्हणाले डॉक्टर आम्ही रिट्झ (नाव नक्की आठवत नाहीये) हॉटेलात जेवायला जाणार आहोत तिथे ये साडेबारा एक वाजे पर्यन्त. तेंव्हा साडे नऊ वाजले होते मी हो म्हणालो. आणि ताबडतोब कपडे घालून निघालो. बंदरातील धक्का नौदलाच्या गोदितच आहे आणि हे रुग्णालयसुद्धा जवळच आहे. मी बाहेर पडलो तोच रुग्णालयाकडे कोणत्या तरी जहाजाकडून परत जाणारी रुग्ण वाहिका दिसली मी हात केला त्यात बसलेल्या वैद्यकीय सहाय्यकाला माझे ओळखपत्र दाखवले. तो हसून म्हणाला सर मी तुम्हाला ओळखतो. तुम्हा थोड्या दिवसापूर्वी मुंबईला अश्विनीत ( रुग्णालयात) होतात. मी तेथे चर्मरोग विभागात होतो. मग त्या रुग्ण वाहिकेत बसून दोन मिनटात मी संजीवनी रुग्णालयात उतरलो. बर्याच दिवसांनी मी स्थिर जमिनीवर चालत होतो आणि त्यातून ओळखीच्या रुग्णालयात आल्याने मला फार बरे वाटत होते. म्हणतात ना चुकला फकीर मशिदीत सापडेल तसे मला झाले होते. तेथे वाटेत दोन मित्र भेटले त्यांच्या बरोबर मी डॉक्टरांच्या चहापानाच्या खोलीत गेलो. बर्याच दिवसांनी बरेच जुने मित्र तेथे भेटले. चहा पिउन होईस्तोवर माझा एक वर्षे कनिष्ठ पणिक्कर म्हणून स्त्रीरोग तज्ञ भेटला. तो अगदी खुश झाला. तो म्हणाला कि बरं झालं तू आलास. मिया विचारले का रे त्यावर तो म्हणाला इथली क्षकिरण तज्ञ कालच रात्री तातडीच्या सुटीवर गेली आहे. तिचे वडील मुंबईत जसलोक रुग्णालयात हृदयविकाराचा झटका आल्याने भरती झाले आहेत. त्यांना भेटायला ती रात्रीच्या विमानाने मुंबईला गेलेली आहे. आता माझ्याकडे एक स्त्री रक्तस्त्राव होत असल्याने भरती झाली आहे तिला बर्याच वर्षांनी उपचारानंतर गर्भ धारणा झाली आहे. पण आता सोनोग्राफीशिवाय गर्भ ठीक आहे कि नाही ते कळायला मार्ग नाही. तू म्हणजे देवाने पाठवल्यासारखा आलास. मी त्याला हसत म्हटले कि मी काही येथे ड्युटीवर आलो नाही. त्यावर तो म्हणाला मला माहिती आहे कि तुझ्याकडे आखत्यारी/ अधिकार(authority) नाही. फक्त गर्भ जिवंत आहे कि नाही तेवढे सांग म्हणजे उपचार काय करायचे ते ठरविता येईल[.पूर्ण रिपोर्ट देऊ नको. मी हसत म्हटले ठीक आहे मला चहा तरी पिऊ दे. आम्ही चहा घेतला तोवर त्याने त्या स्त्रीला क्षकिरण विभागात हलवायला सांगितले. आम्ही दोघे तेथे गेलो मी तिची सोनोग्राफी केली सुदैवाने तिचे मुल व्यवस्थित होते. मी त्याला व्यवस्थित रिपोर्ट तयार करून दिला. तो हसत म्हणाला याची काही गरज नाही. मी त्याला शांतपणे म्हणालो कि मी जरी येथे कामावर(ड्युटी) नसलो तरी नौदलाच्या एका सैनिकाच्या बायकोची सोनोग्राफी केली आणि रिपोर्ट दिला तर मला कोणी फाशी देणार नाही. त्यावर तो हसला. मला धन्यवाद देऊन जातो म्हणाला. तेवढ्यात त्या रुग्णालयातील एक सिस्टर आत आली आणि म्हणाली सर माझे वडील कोट्टायमहून येथे प्रोस्टेटच्या सोनोग्राफीसाठी आले आहेत पण मादाम सुट्टीवर गेल्या आहेत. तुम्ही कृपा करून त्यांची सोनोग्राफी कराल काय? नाही तर तेवढ्यासाठी त्यांना परत यावे लागेल. आता ७६ वर्षाचा माणूस ७० -७२ किमी अंतर कापून येतो त्याला परत कुठे पाठवायचे म्हणून मी म्हटले ठीक आहे त्यांना घेऊन या.
त्यांना आत आणेपर्यंत पणीक्कर हसत म्हणाला. यांची सोनोग्राफी होईपर्यंत एक अजून रुग्ण पाठवू का ती पूर्ण दिवसाची भरती आहे. मुलाची पोझीशन नुसती सांगितलीस तरी चालेल. मग काय मी म्हणालो पाठव आता आलीया भोगासी असावे सादर.
हे सर्व होईस्तोवर बर्याच लोकांना कळले होते कि कोणीतरी नौदलाचा डॉक्टर आला आहे. मग जे लोक क्षकिरण तज्ञ नाही म्हणून परत जाणार होते ते सर्व तेथे रांग लावून उभे राहिले. कोणी तरी आर्मीचा सैनिक त्यांच्या कण्णुरच्या रेकॉर्ड कार्यालयातून आला होता. त्याचे पेन्शनपूर्वीची वैद्यकीय तपासणी होती त्याचा छातीचा एक्स रे चा रिपोर्ट हवा होता. २८० किमी लांबून आलेल्या माणसाला परत कसे पाठवणार. केरळ मध्ये बरेच निवृत्त सैनिक आहेत त्यांना खाजगी रुग्णालये परवडत नाहीत. ( आखाती देशांतील पैश्याच्या ओघामुळे तसे झाले होते)त्यामुळे तेथे बरेच निवृत्त सैनिक उपचारासाठी १००-२०० किमी वरुन येतात.) एकाला बघीतले तोवर दुसरा म्हणतो सर मी त्रिवेंद्रमहून आलो आहे. असे करता करता मला दुपारचे दोन वाजले. अर्थात मला बसल्या जागी एकदा चहा एकदा कॉफी एकदा समोसा आला तेवढे मी खाऊन घेतले होते. दोन वाजता मला आठवण झाली कि अरे आपल्याला रिट्झ हॉटेलात जायचे आहे. एक तर दुपारच्या टळटळीत उन्हात कुणाची तरी स्कूटर घेऊन जायचा कंटाळा आला होता आणि शिवाय चहा कॉफी आणि समोश्याने भूकही उरली नव्हती. मी आता विचार करत होतो जहाजामध्येच परत जावे तेवढ्यात पणिक्कर आला आणि म्हणाला चल घरी जाऊन जेवू या. मी संकोचाने म्हटले अरे नको अशा अवेळी तुझ्या बायकोला त्रास कशाला? त्यावर तो म्हणाला मला माहिती आहे तू किती जेवतोस. आमच्या घरी उरलेल्या अन्नामध्येच तुझं जेवण होईल उगाच औपचारिक पण नको. मग त्याच्या मागे त्याच्या स्कूटर वर बसून घरी गेलो. त्याच्या बायकोची ओळख होतीच. त्याच्या मुलाच्या वेळेस त्याच्या बायकोची सोनोग्राफी पुण्याला मीच केली होती. (या नंतर एक वर्षाने परत त्याच्या मुलीच्या वेळेस मी तीची सोनोग्राफी विशाखापट्टणम येथे पण केली). त्याच्या कडे घरगुती केरळी पद्धतीचे साधे जेवण जेवून त्याने मला परत जहाजात सोडले. या वेळेपर्यंत दुपारचे चार वाजले होते.
मी जहाजात परत आलो तेंव्हा कॅप्टन माझी वाट पाहत होते. मी आत गेलो आणि मी रिट्झ मध्ये येऊ शकलो नाही याबद्दल त्यांची माफी मागितली. त्यावर ते म्हणाले डॉक्टर तू मूर्ख आहेस. एवढ्या दिवसानंतर संधी आली तर तू रुग्णालयात जाऊन रुग्ण पाहत बसलास, आम्ही तेथे शेवंड (lobster) खाल्ले मजा केली. मी त्यांना विचारले तुम्हाला कसे कळले कि मी रुग्ण पाहत होतो. ते म्हणाले मी जीप घेऊन रुग्णालयात तुला आणायला आलो होतो पण तुझ्या खोली बाहेर एवढी गर्दी होती. मी विचार केला डॉक्टर येईल हे सर्व संपवून. आम्ही सर्व बियर पीत होतो २ वाजे पर्यंत त्यानंतर मग खाण्याची ऑर्डर दिली जेवून साडेतीन ला परत रुग्णालयात तुझ्या खोलीशी आलो तो सर्व सामसूम. मग काय आम्ही परत आलो. मी हसून म्हटले सर काय करणार तेथे रुग्णच असे आले कि मला नाही म्हणताच येईना. ते म्हणाले म्हणूनच मी म्हणतोय कि तू मूर्ख आहेस रुग्णालयात गेलासच कशाला?
मी क्काही न बोलता हसत बाहेर पडलो.
एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवली कि एकदा डॉक्टरची झूल तुम्ही अंगावर चढवली कि ती सहज उतरवता येत नाही. (हिपपोक्राटीक शपथ) चा पगडा तुमच्या मनावर जबरदस्त असतो.
आणि चांगले काम करण्यासाठी तुम्हाला अधिकार किंवा अख्त्यारी (authority) असलीच पाहिजे असे नाही.
पूर्वेच्या समुद्रात-३ http://www.misalpav.com/node/29719
पूर्वेच्या समुद्रात-२ http://www.misalpav.com/node/29607
पूर्वेच्या समुद्रात- १ http://www.misalpav.com/node/29373
वाचने
17231
वाचनखूण
प्रतिक्रिया
29
हा ही भाग आवडला
In reply to हा ही भाग आवडला by श्रीरंग_जोशी
हेच म्हणतो..
सहमत, पण थोड्याश्या फरकासह...
चांगले काम करण्यासाठी तुम्हाला अधिकार किंवा....
छान लिहिताय.
वॉव...
In reply to वॉव... by अर्धवटराव
+१
एक पेशंट म्हणुन त्या स्त्रीया
In reply to एक पेशंट म्हणुन त्या स्त्रीया by स्पंदना
+१
मस्तं लेख!!!! पण नेची
In reply to मस्तं लेख!!!! पण नेची by कॅप्टन जॅक स्पॅरो
नेव्ही असं वाचण्यात यावं!!!
In reply to नेव्ही असं वाचण्यात यावं!!! by कॅप्टन जॅक स्पॅरो
अचानक मृत्यु झाला होता त्या
In reply to अचानक मृत्यु झाला होता त्या by स्पंदना
ओह...ओके...मग बदली डॉक्टर
अगदी सहमत!डाॅक्टर मग तो
In reply to अगदी सहमत!डाॅक्टर मग तो by अजया
+१
सर्वसाधारणपणे कोचीला दोन
हा भागही आवडला. पैजारबुवा,
एकदा डॉक्टरची झूल तुम्ही अंगावर चढवली कि ती सहज उतरवता येत नाही
डॉक
In reply to डॉक by इरसाल
+१
....चांगलीच रंगलीय मालिका.....!!!
सुबोध सर,आपल्याला काही पर्याय असतो ?
अनुभव कथन आवडले...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- रूठ ना जाना तुम से कहू तो... { 1942 A Love Story }अनुभव आणि कथन दोन्ही आवडले.
मस्तच मजा येतेय पु भा प्र
मस्त... सुन्दर लिखान
सुंदर लिहिलंय!
अहॉय कोस्टगार्ड्स!!!,
डॉक्टर आपण ही कविता वाचलीच