Skip to main content

स्पर्श आंधळे ,गंध आंधळे भोवताली वनराई ग............

लेखक झंडुबाम यांनी रविवार, 11/01/2015 या दिवशी प्रकाशित केले.
काल office मध्ये बसलो होतो ,अचानक whatsapp आला . requirement of writer tomorrow for visually challenged student . मी reply केला ,आवश्यक माहिती घेतली आणि confirmation देऊन टाकल थोडी धाकधूक होती कि जमेल काय म्हणून . एकतर बरीच वर्ष झाली होती, लिहायची अशी सवय राहिली नव्हती . whatsapp वर notification आले मी check केलं ,ज्याची exam द्यायची त्याचा contact number आला होता .तन्मय नाव त्याच मी number डायल केला स्वतःची ओळख करून दिली , विचारलं कि कुठे भेटायचं ? तन्मय :- तुला कॉलेज माहित आहे . मी :- नाही कधी गेलो नाही तिथे तन्मय :- ok . तू घाबरू नकोस ,मी guide करेन तुला ,तू स्टेशनला भेट . त्याच उत्तर ऐकून क्षणभर मलाच माझा हेवा वाटून गेला . त्याचा confidence आवडून गेला मला . मी ok म्हणून ठेवून दिला फोन . आज सकाळी उठलो बरोब्बर ७:१५ वाजता स्टेशन वर पोहोचलो . तो उभा होता bridge वर . एकदम बारीक अंगकाठी पण हसरा चेहरा , त्याच्या सोबत त्याचा एक मित्र पण होता . मी गेलो त्यांच्याजवळ ओळख दाखवली . त्याबरोबर त्याने माझा हात घट्ट पकडला . स्पर्शाची भाषा . बोलल्याप्रमाणे माझा हात धरून चालू लागला आणि left turn आल्यावर माझा हात ओढला . त्याला कसं समजलं असेल कि left turn आलाय ? चालता चालता मी त्याला काही विचारू लागलो . मी :- कुठे राहतोस ? तन्मय :- विरार त्याचं उत्तर ऐकून मी त्याच्याकडे बघतच राहिलो हा मुलगा रोज विरार ते माटुंगा प्रवास करतो ? मी :- अभ्यास झालाय ? तन्मय :- हो मराठी सोपा जाईल ,history थोडा राहिलंय . मी त्याच निरीक्षण करत होतो . कशी जगतात हि माणसं ? दिवस नाही रात्र नाही नुसता अंधार . पण त्याच्या प्रत्येक हालचालीत एक आत्मविश्वास दिसत होता . अंध माणूस कधी आपला चेहरा सरळ नाही ठेवत ,नेहमी त्यांची नजर वरच्या बाजूला असते . कदाचित चेहरा स्थिर ठेवायला नेमका काय reference पकडायचा ते समजत नसेल . डोळ्यांची बाहुली साधारण पांढरट रंगाची पण त्याची सदैव हालचाल चालू थोडावेळ पण स्थिर नाही . मधेच तो माझ्याबद्दल विचारू लागला . मी job करतोय हे ऐकून त्याला आश्चर्य वाटलं . तन्मय :- तू खूप लहान वाटतोस . त्याने हे statement कसं काय दिलं ते मात्र मला अजूनही समजलेलं नाही . पहिला मराठीचा पेपर होता . मी त्याला आधी सगळे प्रश्न वाचून दाखवले . आणि त्याला जमेल तशी उत्तरं तो सांगत होता आणि मी लिहित होतो . नंतर दोन पेपरच्या मध्ये break होता . त्याने मला काही notes दिल्या आणि म्हणाला मला वाचून दाखव . अशा प्रकारे अभ्यास करण्याची पद्धत ? मला किंवा कोणालाही स्वतः वाचल्या शिवाय काहीच लक्षात राहणार नाही. शेजारी बसून कोणीतरी वाचतोय आणि आंपण ते लक्षात ठेवायचं ,कल्पना पण करवत नाही . मी वाचून दाखवलं . History चा पेपर झाला . नंतर बराच वेळ बोलत बसलो . मला जाणून घ्यायचं होतं त्याचं विश्व आणि त्याला जाणून घ्यायचं होतं माझं . त्याच्याशी बोलताना जाणवलं कि जगण इतकं निष्ठुर असु शकत ? मी - :weekends ला काय करतोस ? तन्मय :- खेळतो ,फिरायला जातो . माझं कुतूहल जाग झालं मी :- काय खेळतोस? तन्मय :- कॅरम ,क्रिकेट ,फुटबॉल हे ऐकून मी चकित झालो . न राहवून मी विचारलं मी :- कॅरम कसा खेळतो ?आणि कोणासोबत ? तन्मय :- मित्रांबरोबर ,ते लोक मला guide करतात . मी अवाक झालो . मनातल्या मनात सलाम केला त्याला आणि त्याच्या मित्रांना . त्याने मधेच विचारलं तन्मय :- तू advertising field मध्ये कोणाला ओळखतोस का ? मी :- नाही रे का ? तन्मय :- मला advertising agency जॉईन करायची आहे माझी इच्छा आहे कि एखादी तरी ad बनवायची . कोणी contact असेल तर बघ बघ ना मी विचार केला कि देवाने डोळे दिले नाहीत तरीही माणूस स्वप्न बघायचा थांबत नाही . पण कसं करू शकेल शकेल हा ? visualization साठी जे लागत तेच नाही रे तुझ्याकडे . मी :- अरे पण graduation तर complete कर आधी . तन्मय :- ते करीन side by side ,पण पप्पांना मदत करायची आहे . मी :- म्हणजे? तन्मय :- ते चर्चगेट ला एका shop मध्ये काम करतात . मी :- अजून कोण आहे घरी ? तन्मय :- कोणी नाही मी ,आई , आणि बाबा माझा हात आपोआप त्याच्या डोक्यावरून फिरला , मी म्हटलं तन्मय आधी शिक्षण पूर्ण कर रे . खूप भरून आलं होतं . मनात म्हटलं देवा एखाद्याच्या वाटेवर इतके पण काटे टाकु नकोस कि प्रवासच नकोस व्हावा . खूप दया येत होती त्याची . त्याने फोन काढला खिशातून . मी विचारलं मी dial करून देऊ का ?त्याने नाही म्हटलं आणि सराईत पणे number शोधला आणि dial केला . त्याने फोन ठेवल्यावर मी विचारलं कसा काय शोधलास रे number ? तन्मय :- हे बघ स्पेलिंग वरून . एक एक अक्षर type करायचं . आणि त्याने माझा number शोधून दाखवला . क्या बात है . मी :- तुला notes कोण वाचून दाखवत घरी ? तन्मय :- आई दाखवते वाचून रोज . मला जरा मित्राकडे सोड मला notes घ्यायच्या आहेत . मी त्याचा हात धरून त्याच्या मित्राकडे घेऊन गेलो . त्याने bye म्हटलं . मी तिथून निघालो , बाकी सगळी मुलं ओरडत होती, खेळत होती कुठल्याही कोलेज मध्ये असेल तसाच माहोल . पण हे सगळ तन्मय च्या नशिबी नाही . मी वळून पाहिलं तो मित्राचा हात धरून चालत होता . डोळ्यात पाणी आलं . आपसूकच आकाशाकडे नजर गेली मनातल्या मनात देवाचे आभार मानले , वाटून गेलं खूप सुखी आहे मी . खरच सुख मानण्यात आहे अस म्हणतात तेच खरं . आपली tensions म्हणजे salary ,job ,EMI इतकच संपली आपली दुनिया , मी आणि माझं या पलीकडे विचारच नाही करत आपण .पण आजचा अनुभव अंतर्मुख करून गेला . विचारांचं काहूर माजलंय डोक्यात . शिक्षण ,नोकरी ,पैसा या सगळ्याच्या मागे लागतो पण आपण जगतो कधी ? नुसतेच धावतोय ,कशासाठी ,कोणासाठी,आणि कुठपर्यंत ते पण माहित नाही . मग आयुष्याच्या शेवटी जमाखर्च मांडताना कळणार कि जमा फक्त कमी . संदीप खरे ची चकवा चित्रपटातली कविता आठवून गेली कधी वाटते दिवस रात्र हे नसते काही असले ग त्यांच्या लेखी रात्र सदाची ज्यांचे डोळे मिटले ग स्पर्श आंधळे ,गंध आंधळे भोवताली वनराई ग तमातली भेसूर शांतता कानी कूजन नाही ग अजून उजाडत नाही ग ,अजून उजाडत नाही ग
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 4277
प्रतिक्रिया 20

प्रतिक्रिया

-_- -_- -_-

ओह्हो ! त्या पिल्लाचे न तुमचेही फार कौतुक! :) अशा गोष्टी आपला जीव थोडावेळ तरी उजळून जातात नै ?

In reply to by मितान

वाह मितान!! अगदी नाडी पकडलीस लेखाची!! मी ही हेच म्हणेन लेखकाला. दया नको असते फिजिकली चॅलेंज्ड, लोकांना. मेंदू शाबीत असतो ना? उलट त्यांच्याकडे पाहून आपणही थोडं उजळावं त्या ध्येयासक्त प्रकाशात. आपल्या येथले स्पा नावाचे सदस्य अ‍ॅदव्ह्र्टायझींग मध्ये असतात. पहा विचारुन त्यांना काही जमेल का ते.

जिगरबाज तन्मयला आॅल द बेस्ट!

वाचताना मन हेलावुन गेले. डोळ्यात पाणी आल. सलाम त्या चिन्मयला.

जिगरबाज तन्मयला आणि धन्यवाद आम्हाला आरसा दाखवल्याबद्दल. छोट्या गोष्टींची मोठी काळजी करणार्या पांढरपेशां कळपातील एक.

हा लेख वाचायचा राहून गेला होता. तन्मयला आॅल द बेस्ट व तुम्हाला धन्यवाद हा लेख आमच्यापर्यंत पोहचवण्याबद्दल.
तन्मय :- विरार
अरे वा! आमच्याच गाववाला. भेटलं पाहीजे कधीतरी सवडीनं.