Skip to main content

धुकं

लेखक विवेकपटाईत यांनी मंगळवार, 16/12/2014 या दिवशी प्रकाशित केले.
धुक्यात उमटली चित्रे काही त्यास समजलो जीवन नाती. धुक्यातली नाती धुक्यात विरली जीवन यात्री उदास एकाकी.

रेड सिग्नल

लेखक अद्द्या यांनी मंगळवार, 16/12/2014 या दिवशी प्रकाशित केले.
इथली माझी पहिलीच पोस्ट आहे . . काही चुकलं असल्यास सांभाळून घ्या . ऑफिसचं फुकटचं इंटरनेट वापरून चांगली गाणी / सिनेमा डाउनलोड करणे . आणि ते तिथेच बघत/ ऐकत बसणे या पेक्षा दुसरी मजा नाही . . त्यातही तो कुठला डब केलेला तमिळ / तेलगु सिनेमा असेल . तर मग . . आहाहाहा . काल हि हेच चाललं होतं . .आणि तेवढ्यात . फोन वाजला . कोण आहे हे न बघता मी उचलला . आणि मी काही बोलायच्या आतच . समोरून आवाज आला . " घरी येणार आहेस कि नाही आज . कि तिथेच गादी टाकून दिलाय तुमच्या मालकाने . घर आहे म्हणावं मला . " आणि फोन कट . माझा चेहरा बघून माझा HOD म्हणाला . " मा का फोन था क्या ? . मी म्हणलो . " हा .

स्वामी विवेकानंद- भाग-१ - दिल ढूँढता है फिर वही फ़ुरसत के रात दिन...

लेखक मारवा यांनी सोमवार, 15/12/2014 या दिवशी प्रकाशित केले.
स्वामी विवेकानंद एक बहुआयामी व्यक्तीमत्व होते. त्यांच्या विषयी विचार करतांना त्यांना एका साच्यात बसविता येत नाही. खर म्हणजे अस कोणत्याच माणसा विषयी होत नाही व करु नये अस वाटत. त्यांच्याविषयी कधी सहानुभुती वाटते कधी चीड निर्माण होते कधी त्यांच्यातली रसिकता भुरळ पाडते कधी आदर वाटतो कधी कौतुक. कधी आश्चर्य म्हणजे मिक्स्ड इमोशन्स म्हणतो तस मला वाटत. त्यांच समग्र साहीत्य वाचतांना त्यांचा पत्रसंग्रह मला विशेष आवडतो. कारण त्यातुन जे स्वामी विवेकानंद आहेत त्यांच्यातील नरेंद्र नावाचा तरुण कधी कधी बाहेर येतो. तो नरेंद्र मला स्वामी पेक्षा जास्त जवळचा वाटतो आवडतो.

बार-बे-क्यू नेशन, द हेवन!

लेखक संजय क्षीरसागर यांनी सोमवार, 15/12/2014 या दिवशी प्रकाशित केले.
काल सकाळी पत्नीच्या आग्रहाखातर सयाजी मधल्या बार-बे-क्यू नेशनला गेलो होतो. पुण्यात राहाणार्‍यांना जवळच्या जवळ, अप्रतिम फूड क्वालिटी आणि कमालीचा बहारदार अँबियन्स असलेलं हे एक मस्त रेस्टॉरंट आहे. एकतर ते दहाव्या मजल्यावर आहे आणि फक्त वरुन कव्हर्ड असल्यानं सगळीकडून अमर्याद आकाश सतत दिसत राहतं ( त्यासाठी अर्थात सकाळी जायला हवं). . (फोटो हॉटेल साइटवरुन साभार). इथे कव्हर्ड दिसल्या तरी प्रत्यक्षात साइडस ओपन आहेत. फोटो बहुदा रेस्टॉरंटच्या डाव्याबाजूचा आहे.

“पडणे” एक कला

लेखक दशानन यांनी सोमवार, 15/12/2014 या दिवशी प्रकाशित केले.
दुसरा कोणी पडला तर त्याच्याकडे पाहून फिदीफिदी हसण्याची आपल्याकडे वाईट सवय आहे. पण त्यांना पाडणाऱ्या व्यक्तीने घेतलेले कष्ट दिसत नसतात असे माझे स्पष्ट मत आहे म्हणून मी “पडणे” एक कला हा लेख लिहितो आहे. सतत पडण्याची माझी दीर्घकालीन वाटचाल आहे, मी रस्तावर पडलो आहे, पाण्यात पडलो आहे, डोंगरावर पडलो, स्कूटर, बाईक, कार मधून देखील पडलो आहे, तसेच अनेक वेळा खड्यात देखील पडलो आहे, तसेच एकदा हवेतून देखील पडलो आहे.

अंधार क्षण भाग ४ - एस्टेरा फ्रँकेल (लेख १९)

लेखक बोका-ए-आझम यांनी सोमवार, 15/12/2014 या दिवशी प्रकाशित केले.
अंधार क्षण - एस्टेरा फ्रँकेल आपल्या आयुष्यात जन्म आणि मृत्यू आपल्या हातात नसतो, पण त्यांच्या दरम्यान जे आयुष्य आपण जगतो, ते बहुतांशी आपण काळाच्या ओघात घेतलेल्या निर्णयांचा परिणाम आणि परिपाक असतं. हे निर्णय कधी सोपे तर कधी कठोर आणि कधी तर अशक्यप्राय असू शकतात. दुस-या महायुद्धाच्या धुमश्चक्रीत लोकांसमोर अनेक वेळा असे निर्णय घेण्याची परिस्थिती आली. मी जेव्हा एस्टेरा फ्रँकेलची मुलाखत घेतली तेव्हा मला जाणवलं की तिच्यासमोर निर्णय घेण्यासाठी जे पर्याय होते आणि त्यामुळे तिला ज्या पेचप्रसंगाला सामोरं जावं लागलं, तशी परिस्थिती फार थोड्या लोकांवर त्यांच्या पूर्ण आयुष्यात आली असेल.

विषाणू (भाग २)

लेखक अरुण मनोहर यांनी रविवार, 14/12/2014 या दिवशी प्रकाशित केले.
............. आदिवासी मानवापासून आपण सगळ्याच अर्थाने खूप दूर आलेलो आहोत. तरिही आपल्याला आपले मूळ ठिकाण बघण्याची आतुरता आहे. तिथे पोहचल्यावर पुरातन सृष्टी आपल्याला दिसेल. तिचा फ़क्त तेथेच आनंद लुटा. तेथून कोठलीही वस्तू आणणे हे धोक्याचे आहे. काहीही आणायला परवानगी नाही. हे लक्षात ठेवा.” विषाणू (भाग १) पुढे वाचा.... पृथ्वीवर पोहोचल्यानंतरचे सगळे सोपस्कार होऊन मंडळी आपापल्या कक्षांमधे विसावली. थोडा आराम झाल्यावर सगळ्यांचे आलिशान हवाई वाहनामधून आजुबाजुंच्या पर्वतराजीभोवती ऊड्डाण झाले. सरोवराच्या बाजुने भटकंती झाली.

काळ भैरव {काल भैरव} उजैन

लेखक मदनबाण यांनी रविवार, 14/12/2014 या दिवशी प्रकाशित केले.
१} रात्रीच्या सुमारातला मंदीर प्रवेश K1 २} मंदीराच्या बाहेर, देवाला लागणारा मद्याचा नैवैध्य विकणारा विक्रेता. K2 ३} व्हरायट्री ऑफ ब्रँड विक्रीस ठेवलेले यावेळी पहावयास मिळाले. K3 ४}मंदीराच्या प्रवेशद्वाराच्य