भविष्य (शतशब्दकथा)
''गेली साडेचार वर्षं तुम्ही आमच्या वाहिनीवर साप्ताहिक भविष्य सांगितलेत.
अत्यंत लोकप्रिय कार्यक्रम होता- टीआरपी पण मस्तच !
पण म्हणतात ना , प्रत्येक गोष्टीला शेवट असतोच.
आता जरा चेंज पाहिजे असं ग्रोवरसाहेब. . आय मीन लोकं म्हणतायत.''
''पण एव्हढं वर्षं पूर्ण झालं असतं तर . . . ''
''कसं आहे काका, मला पण असंच वाटतं, पण माझ्या हातात नाही हो ते!
म्हणाल तर त्रिवेदीला सांगून आमच्याच समूहात हिंदी च्यानलवर प्रयत्न करूयात.''
''नको. . . हिंदीत नको. ''
''मग वास्तुशास्त्र, अंकशास्त्र असं काही कराल ?''
''छेछे , भलतंच काय?''
''ठीकाय तुमची इच्छा! परत कधी लागलं तर कळवतोच.''
मोठ्या कष्टाने गोपाळराव घरी निघाले.
आपल्याच कार्यक्रमाचं प्रारब्ध कसं नाही कळालं हा एकच विचार त्याना सतावत होता.
(शतशब्दकथा)
वाचने
3919
वाचनखूण
प्रतिक्रिया
12
या logical fallacy चं नेहेमीच
In reply to या logical fallacy चं नेहेमीच by आदूबाळ
+१
सगळ्या भविष्य/पत्रिका
१०० + १
In reply to १०० + १ by एस
छेछे ! अहो हा एकच शब्द धरलाय!
गोपाळरावानी त्यांचे आडनाव
In reply to गोपाळरावानी त्यांचे आडनाव by विजुभाऊ
+++१११
बर हाय.
आवडली कथा !!
छान..!!
सर्वांचे खूप आभार !!
क्या बात है ! ग्रेट.