Skip to main content

दिल्ली मतमोजणीपूर्व धागा

लेखक क्लिंटन यांनी शनिवार, 07/02/2015 23:04 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, आजच दिल्ली विधानसभेसाठीचे मतदान पार पडले.मतमोजणी १० फेब्रुवारीला होईल.बहुतांश एक्झिट पोलच्या अंदाजांप्रमाणे आआपला जबरदस्त यश मिळायची शक्यता आहे.एक एक्झिट पोल भाजपला २७ ते ३५ तर आआपला ३१ ते ३९ अशा जागा देत आहे तर अन्य एक एक्झिट पोल भाजपला काठावरचे बहुमत देत आहे.अजून मतमोजणी झालेली नाही तेव्हा प्रत्यक्ष निकाल काहीही लागला तरी दोन्ही परिस्थितीत माझे निकालांनंतरचे मत कसे असेल हे लिहिणे हा या धाग्याचा उद्देश आहे.यापैकी आआप जिंकल्यास माझे मत काय असेल हे या लेखात आणि भाजप जिंकल्यास माझे मत काय असेल हे नंतर प्रतिसादात लिहेन. दोन्ही मला लेखातच लिहायचे होते पण विस्तारभयास्तव ते टाळतो.

खरी कविता..

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी शनिवार, 07/02/2015 18:24 या दिवशी प्रकाशित केले.
त्या खर्‍या कविता..म्हणुनी शब्द कल्पना सांगत नाही. येतील आज..? पुन्हा? .. का कधिही!(?) अश्या कुठे त्या.. थांबत नाही. बोलावुनी वा हाकारुनी त्या ढुंकुन कधिही पहात नाही. आणि घेतले टाळे लावुनी येणे-असता.. रहात नाही. बासरी ,पुंगी..नाद कसाही निश्चित त्यांचे स्वरूप नाही. किंवा स्वये त्या नाद-घेऊनी येतील..त्याचे अप्रुप नाही. वार्‍या समं ते शब्द वाहती कवेत त्यांना घेता..
काव्यरस

इलेक्शनी- चारोळ्या

लेखक विवेकपटाईत यांनी शनिवार, 07/02/2015 18:14 या दिवशी प्रकाशित केले.
आज सकाळी दिल्लीत निवडणूक होती. आमच्या भाग उत्तम नगर भागात, जिथे नावाखेरीज काहीच उत्तम नाही., सकाळी वोट टाकून आलो. थोडा-फार फेर-फटका ही मारला. अनधिकृत वस्तीतल्या गल्ली बोळ्यांत आज जे काही खुले आम दिसत होते, त्याला काय म्हणावं....... (१) प्रसाद घ्या तीर्थ प्या आटोत बसा वोट आपला असा विका. (२) नेता नोट मोजतात नोट मते मोजते. (३) गांधींच्या डोळ्यांत एकच सवाल? गुलाबी नोटेवर फोटू का?

automatic प्राणायाम :-डोक्यातली हवा काढणारी पीन

लेखक पिनुराव यांनी शनिवार, 07/02/2015 16:34 या दिवशी प्रकाशित केले.
अनुलोम-विलोम वगैरे प्राणायाम करतांना नाकातून शेंबूड वगैरे सामग्री बाहेर येण्याच्या तक्रारी असतात . श्वास वर ओढताना नाकपुडीत मच्छर वा चाचनही जाण्याची शक्यता असते. शिवाय आमच्या तरुण पिढीला, स्मार्ट (आजोबा-आजीना,काका ,मामा ,मावश्या, आई बाबा वगैरे) वडिलधार्यांना खाली बसून नाकाला हात लाऊन प्राणायाम करण्याची लाज वाटते .

कावळा *** लकी नसतो;

लेखक चुकलामाकला यांनी शनिवार, 07/02/2015 14:52 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा डोळा लवतो लकी नसतो; कावळा *** लकी नसतो; विचारा मला मी सांगतो! एक सुंदरी शेजारी आली, हसली आणि 'नाव काय?' म्हणाली; खुश होऊन बोलायला जातो.... इतक्यात मेला कावळा ***! शब्द घशात अन् स्वप्न ढगात... कोण म्हणत... नशीब उघडत कावळा *** त? गाडी पुढे सरकते.. पार्किंग मिळते ... बाहेर पडता बायकोची चिकणी मैत्रीण समोर येते... ओळखिच हसून 'नमस्ते' म्हणते; मी ही हसतो ... खुशीत येतो... इतक्यात कावळा परत घात करतो! हळूच *** अन् भावी डेट ची वाट लावतो. संसार होतो...

पुन्हा एकदा राजगड तोरणा!!--भाग २

लेखक राजेंद्र मेहेंदळे यांनी शनिवार, 07/02/2015 13:58 या दिवशी प्रकाशित केले.
पुन्हा एकदा राजगड तोरणा!!--भाग 1 रात्री थंडीने कहर केला होता. त्यातच मंडळींची मंदिराच्या आतबाहेर ये जा चालू होती त्यामुळे झोपमोड होत होती. मंदिरात एक लाईट चालू ठेवला असल्याने त्याचाही उजेड जरा त्रासदायक होत होता. पण दिवसभर केलेले श्रम या सर्वांवर मत करत होते आणि डोळे गपागप मिटत होते. पहाटे ४ वाजल्यापासून गावकर्‍यांची नाश्ता पाण्याची लगबग सुरु झाली कारण त्या १७ जणांची ऑर्डर होती. तरीही चिवटपणे प्रयत्न करुन ६ वाजेपर्यंत झोपलो .

गाडी मागणाऱ्यांना कसे टाळावे?

लेखक प्रतापराव यांनी शनिवार, 07/02/2015 11:56 या दिवशी प्रकाशित केले.
मी एक सेकंडह्यांड स्पार्क.गाडी घेतली आहे. हळू हळू शिकणे चालू आहे.परंतु सध्या एक समस्या भेडसावत आहे बरेच परिचित, नातेवाईक हे गाडी मागत असतात. त्यातील काहींना आपण विश्वासाने देवू शकतो परंतु काहींना मात्र टाळायचे असते. त्यांना काहीना काही कारणे द्यावे लागतात नाहीतर शिष्टपणाचा शिक्का मारायला तयार .माझा स्वभाव हा अतिभिडस्त असल्याने सर्वांना टाळता येत नाही .पहिली गोष्ट इतरांची गाडी मागणे हे काही मला योग्य वाटत नाही. परंतु काही जन मात्र बिनदिक्कत गाडी मागतात त्यांना टाळण्यासाठी काय उपाय असतील तर सुचवावे एखाद दुसर्याचा प्रयोग करून बघावे म्हणतो .

माझी लाचखोरी....

लेखक जेपी यांनी शनिवार, 07/02/2015 11:21 या दिवशी प्रकाशित केले.
घटना जुनी आहे.१० वी झाल्यावर सगळे करता तस मला सेवायोजन कार्यालयात नावनोंदणी करायला जायच होत. गावाकडुन गादी पकडुन जिल्ह्याला जायला उशीर झाला..१ वाजला.कार्यालयात पोहचलो. माझे येण्याचे कारण तिथल्या कर्मच्यार्‍याला सांगितल..त्यांने बोर्डाकडे बोट दाखबल..कार्यालय १ वाजता बंद.. डोळ्यासमोर तो बोर्ड,कर्मचारी,पुन्हा होणारी चक्कर,वाया जाणारा वेळ आणी पेसा नाचु लागला..

डॉक्युमेंटेशन आणि आपण

लेखक अत्रन्गि पाउस यांनी शनिवार, 07/02/2015 11:08 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वरंग मध्ये जपानी बुजुर्ग नटांचे आवाज /अभिनय रेकोर्ड करून ठेवले आहेत आणि आपल्या कडे तसे नाही म्हणून पुलंनी हळहळ व्यक्त केली ... सहज गम्मत म्हणून स्वत:च्या जन्मदिवसाचा केसरी वाचायला मागितला तर अमेरिकेतल्या त्या ग्रंथपालिकेने काही मिनिटात तो मायक्रोफिल्मवर वाचायला उपलब्ध करून दिला ... हे असे काही अनुभव घेतल्यानंतर खुद्द पु लंनी मात्र स्वत:चे एकपात्री पुरेसे रेकॉर्ड योग्यप्रकारे करून ठेवले नाहीत बालगंधर्वांची रुक्मिणी / भामिनी , बखलेबुवा/ केशवराव भोसले आदि अनेक दिग्गजांचे गायन हे आणि असे आणखीन कितीतरी दृकश्राव्य डॉक्युमेंटेशन करून ठेवायला हवे होते पण आता ते शक्य नाही ... थोडे आणखीन मागे ज

नरहरी सोनार हरीचा दास

लेखक देवदत्त परुळेकर यांनी शनिवार, 07/02/2015 09:44 या दिवशी प्रकाशित केले.
आज संत नरहरी सोनार महाराज यांची पुण्यतिथी (माघ वद्य तृतिया). त्यांना भावपूर्ण आदरांजली. वारकरी संत मंडळात विविध जातीजमातीचे संत आहेत. विविध व्यवसाय करणारेही संत आहेत. बहुतेक संत प्रपंच करीत परमार्थ साधनाही करीत होते. गोरा कुंभार, सावता माळी, सेना न्हावी यांच्या नावातच त्यांचा व्यवसायही दडला आहे. नरहरी महाराज हे सुवर्णकार जातीतले होते. वाड्‌.मयेतिहासात त्यांचा ’नरहरी सोनार’ असा उल्लेख केला जातो. यादवकालात शिवाचे उपासक ’शैव’ आणि विष्णूचे उपासक ’वैष्णव’ या दोन्ही संप्रदायांचा विशेष प्रभाव होता.