Skip to main content

फावल्या वेळेतली फोटोग्राफी….भाग ३

लेखक मेघनाद यांनी रविवार, 18/01/2015 22:25 या दिवशी प्रकाशित केले.
फावल्या वेळेतली फोटोग्राफी | भाग १ | भाग २ | १. अमुल संडे बटरस्कौच + स्ट्राबेरी हिमक्रिम Ice cream २. बाहुली / मूर्ति Doll ३.

अमृतसर ४ - खटकरकलां

लेखक सर्वसाक्षी यांनी रविवार, 18/01/2015 17:25 या दिवशी प्रकाशित केले.
अमृतसरला जायचे तेव्हा खटकरकलांला भेट द्यायचीच असे ठरवले होते.0 अमृतसर चंदिगड महामार्गावर असलेले खटकरकलां हे महान देशभक्त व हुतात्मा भगतसिंग यांचे काका सरदार अजितसिंग यांचे जन्मस्थान. येथे हुतात्मा भगतसिंग यांचे वडीलोपार्जित घर आहे. अमृतसर पासून अंतर १३० किलोमिटर.

सोबती

लेखक सुचेता यांनी रविवार, 18/01/2015 15:58 या दिवशी प्रकाशित केले.
सुखाला मिळतील सोबती खूप सहायला तुम्ही एकटेच असता कितीही जवळचं वाटलं कोणी शेवटी कडेने पोहणारे निघतात ज्याचं त्याला लागतं भोगावं प्राक्तनात असलेलं चुकत नसतं कुणी किती जरी केला अट्टाहास दैवात लिहलेलं टळत नसतं हेच जर आहे चिरंतन सत्य पाठ फिरवून भागणार नसतं रडतराउ होउन कुंथण्यापेक्षा हसत सामोरं जाणं योग्य असतं
काव्यरस

Bio-Medical उपचारपद्धती व Autism

लेखक स्वमग्नता एकलकोंडेकर यांनी रविवार, 18/01/2015 12:09 या दिवशी प्रकाशित केले.
सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा! माझ्या नवीन वर्षाच्या संकल्पानुसार मी माझा आउटलुक बदलण्यावर गेला महिनाभर काम करत आहे. मैत्रिणींशी/काही जवळच्या नातेवाईकांशी खुल्या मनाने चर्चा केली. आता मला पुन्हा नव्याने पॉझिटीव्ह दृष्टीकोनाने कामाला लागायची प्रेरणा मिळाली.  :) एक मुख्य संवादाचे, प्रेरणेचे साधन आहे ते हे लेख लिहीणे. फार स्ट्रेंजली मला ही लेखमालिका लिहून बरं वाटतं! कदाचित माझ्याच डोक्यातील विचारांचा नीट निचरा होत असावा? किंवा सगळे विचार डोक्यात गरगर फिरण्याऐवजी कागदावर ऑर्गनाईझ्ड पद्धतीने उमटले की बरं वाटत असावे.

छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ६ निकाल - व्यक्तिचित्रण

लेखक एस यांनी रविवार, 18/01/2015 01:24 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकरांनो! सर्वप्रथम मी येथे, आज या ठिकाणी, आजच्या या दिवशी, आजच्या प्रसंगी (इत्यादी इत्यादी) सर्व मिपाकरांचे आभार मानतो. या स्पर्धेला आपण भरभरून प्रतिसाद दिलात, एकसे एक प्रवेशिका पाठवल्यात, त्यांना दादही दिलीत, आणि स्पर्धेच्या बदललेल्या स्वरूपाचे खुल्यादिलाने (बेशर्त??) स्वागत केलेत. त्याबद्दल धन्यवाद! संपादक मंडळाने माझ्यावर एवढी मोठी जबाबदारी टाकली आणि तेवढा विश्वास दर्शवला त्याबद्दल त्यांचे मानावे तेवढे आभार थोडेच आहेत! अर्थात्, 'संपादक मंडळ' या आयडीकडून व्यक्तिगत संदेश आल्याचा विरोप (इमेल) पाहिल्यावर आधी थोडा दचकलोच. त्यात मिपा उघडेना.

सिंहगड व्हॅली

लेखक नांदेडीअन यांनी रविवार, 18/01/2015 00:18 या दिवशी प्रकाशित केले.
पुण्यातल्या पक्षी निरीक्षकांचे नंदनवन म्हणजे सिंहगड व्हॅली ! व्हॅलीमध्ये पक्ष्यांच्या नानाविध जाती बघायला मिळत असल्या, तरी इथला आकर्षणाचा केंद्रबिंदू स्वर्गीय नर्तक आहे. (Asian Paradise Flycatcher) या स्वर्गीय नर्तकाचा केवळ एक चांगला फोटो मिळावा यासाठी अनेक हौशी फोटोग्राफर तासनतास एकाच जागी चित्त लावून बसलेले असतात. सहसा दर्शन न देणारे अनेक रानपक्षी या व्हॅलीमध्ये हिवाळ्यात मात्र सहजपणे पाहायला मिळू शकतात. त्यातल्या त्यात वेगवेगळे, अत्यंत देखणे फ्लायकॅचर पक्षी पाहायला मिळाले तर क्या कहने !

प्रश्न असा की......

लेखक चुकलामाकला यांनी शनिवार, 17/01/2015 22:34 या दिवशी प्रकाशित केले.
प्रश्न असा की ज्या प्रश्नाचे कधीच नसते सुचले उत्तर प्रश्न असा की ज्या प्रश्नाचे प्रश्नातच दडलेले उत्तर.. प्रश्न असा की मनात येता डोळे अलगद भरून यावे दुखरे आणिक हळवे उत्तर अश्रूंमध्ये वाहून जावे.. प्रश्न असा की सात्विक, दाहक, तेजस्वी कृष्णेसम कणखर प्रभेत त्या प्रश्नाच्या व्हावे द्रोण, भीष्म अन कृपही निरुत्तर.. प्रश्न असा की रुढींचा मृत सागर त्याने ढवळून जावा सत्य शुद्ध अन मांगल्याचा अभंग त्यातून तरून यावा.. प्रश्न असा की विश्वाच्या गर्भाला त्याने स्पर्शून जावे उत्तर त्याचे शोधू जाता सिद्धार्थांचे गौतम व्हावे..

आरती

लेखक सतिश गावडे यांनी शनिवार, 17/01/2015 21:29 या दिवशी प्रकाशित केले.
आज सकाळी कळव्यावरुन फोन आला. "मला गुरुजींसाठी आरती लिहायची आहे." मी म्हटलं चांगलं आहे; लिहा की. फोनवरचा आवाज अडखळला. मी काय झाले असे विचारताच "मी आता तांब्या पंथाची दीक्षा घेतली आहे. मला आरती लिहिणे जमणार नाही. तुम्ही लिहून दया ना." मी प्रयत्न केला. -------–------------------ अत्रुप्त आत्मा माझे आई स्थाण दयावे तुझे पायी तुझा तांब्या मी वाहीन तुझाच दास मी होईन गायछापाचा नैवैद्य तुजला जिलबीचा प्रसाद दे मजला जरी थांबेन मी दाबून नीट आतल्या आत पडेल पीठ येऊ दे माझी तुला करुणा लल्लल्लल्लल्ललू दयाघना अत्रुप्त आत्मा माझे आई स्थाण दयावे तुझे पायी

अभिवाचनयोग्य कथा सुचवा....

लेखक आपला अभिजित यांनी शनिवार, 17/01/2015 18:44 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रहो, जाहीर कार्यक्रमात अभिवाचन करता येतील, अशा मराठीतील काही वेगळ्या, दर्जेदार कथा सुचवता येतील? प्रसिद्ध कथाकारांच्या फारशा परिचित नसलेल्याही चालतील. फक्त त्या अभिवाचनयोग्य हव्यात. (थोडं वर्णन, थोडे संवाद, थोडं रंजन, असा मिलाफ साधणा-या.) आधी वाचलेल्या, कुणी सुचवलेल्या कथाही नमूद केल्या, तरी चालेल. अभिप्रायांच्या प्रतीक्षेत....

निथ साँग - निंदानालस्तीस मुक्त आणि शिवराळ एस्कीमोंची एक जुगलबंदी गायन-न्याय परंपरा

लेखक माहितगार यांनी शनिवार, 17/01/2015 14:52 या दिवशी प्रकाशित केले.
कशावरून कुणाच्या भावना दुखावल्या जातील याचा नेम नसतो म्हणून तर आपण मकर संक्रांतीला तीळगूळ घ्या गोड गोड बोला म्हणतो पण अवघ्या दिड - दोन महिन्यात धूलीवंदन आणि होळी येते आणि मग दिल्या घेतल्या शिव्यांची... मनमोकळी उधळण अधिकृतपणे करता येते. गोडगोड बोला हे कृत्रिम संस्कृतीकरण तर शिव्या देऊन मनमोकळे करणे हे अकृत्रिम आणि नैसर्गीक. हि होळीची शिवराळ परंपरा आपण होळीच्या निमीत्ताने जपतो तशीच एक वेगळी परंपरा एस्कीमो लोक जपतात त्या परंपरेला निथ साँग म्हणतात. एस्कीमोंच्या निथ साँगचे वेगळेपण ?