गोलमाल झेरॉक्स सेंटर आणि आपण
आज आलेला अत्यंत फसवा अनुभव. बाकीच्यांनीही सावध व्हावं म्हणुन लिहितोय.
आज अचानक माझ्या एका कुप्रसिद्ध सरकारी बँकेत जायला लागलं. ८०'सी खाली गुंतवणुकीचा पुरावा म्हणुन एफ.डी. सर्टीफिकेट घ्यायचं होतं. आधी म्हणल्याप्रमाणे बँक कुप्रसिद्ध आणि सरकारी असल्याने एक जन्मकुंडली सोडुन सगळी डॉक्युमेंट्स साक्षांकित करुन दिलेलीचं होती. आणि बँकेच्या अत्यंत काळजीपुर्वक धोरणाला अनुसरुन पॅन कार्डची साक्षांकित प्रत हरवली गेली (पुढच्या वर्षीपासुन रिसिव्हड चा शिक्का मारुन घेणार). ऐन वेळेला हे लक्षात आल्यावर मला परत पॅन कार्डची छायाप्रत काढायसाठी बाहेर पळायला लागलं. आपल्याला हवा तेव्हा एक झेरॉक्सवाला सापडेल तर शपथ.
भूसंपादन विधेयक
ह्या भूसंपादन विधायकाबद्दल रोज काहीतरी सतत ऐकू येते. काही जण ह्याच्या विरोधात आहेत तर काही ह्याचे समर्थन करत आहेत. ह्यात शेतकऱ्यांचे नुकसान आहे पण प्रगतीसाठी हे विधेयक फार महत्वाचे आहे. जमिनी द्यायच्या नसल्या तरी द्याव्या लागतील परंतु ह्यामुळे नवीन प्रकल्प राबवण्यासाठी आवश्यक जमिनी मिळवणे सोपे होईल. फारच गोंधळ आहे. तुमचे काय मत भूसंपादन कायदा हवा का नको????? हवे असल्यास का हवे??? नको असल्यास का नको???
सोने : गुंतवणूक की सुरक्षा ? की यापैकी काहीच नाही ?
काही दिवसांपूर्वी माझ्या गावातल्या घरी चोरी झाली. त्यात दुर्दैवाने माझ्या पत्नीचे आणि आई चे सोन्याचे दागिने चोरीला गेले. चोर सापडले पण सोनं सापडलं नाही ! असो !
माझं नुकतंच लग्न झालेलं आहे. पहिल्याच वर्षी सूनेच सोनं चोरी गेल्यामुळे माझ्या आई- वडीलांना प्रचंड मानसिक धक्का बसला आहे. ते घरी असताना चोरी झालेली असल्यामुळे त्यांना अधिकच अपराधी वाटत आहे. वस्तुस्थिती पाहता ,मी ,माझी पत्नी आणि माझे सासू-सासरे ह्या सगळ्यांनी त्यांना समजावून सांगितले की झाले गेले गंगेला मिळाले, त्याविषयी जास्त विचार करू नका. पण आता नुकसान भरपाई म्हणून ते यथाशक्ती सुनेसाठी काही सोनं घेण्याच्या विचारात आहे.
माहेरपण.....
जेव्हा दु:खच परतून येते
मायेने ते कवेत घ्यावे,
मालिश करुनी तळपायाला
हलके त्याला शांत करावे.
येणारच ते पुन्हा पुन्हा घरी
हक्कच त्याचा आपुलकीचा
सासुरवाशीण लेकीसाठी
माहेराने सज्ज रहावे.
कितीही आले ओठावर तरी
प्रश्न विचारू नये तयाला,
नशीब असते एकेकाचे
अपुले आपण मानून घ्यावे.
जाईल निघुनी उद्या सकाळी
नवीन क्षितिजे क्रांत कराया ,
करू नये पण उगीच त्रागा
तळहातावर दही वाढावे.
(लिहिल्यावर जाणवले कवी अनिल यांच्या उशिरा आलेला पाऊस या कवितेशी साम्य आहे.)
ओय! – क्षणभंगुरतेची दोन रुपे
मी पाहिलेल्या मोजक्या तेलुगु चित्रपटांपैकी हा एक चित्रपट – ओय!
वरवर पाहता एक तरल प्रेमकथा. टॉलिवूडी हाणामारी, भडक विनोदाचे केविलवाणे प्रयत्न तुलनेने कमी. ही ठळक वैशिष्ट्ये चित्रपटाला इतर टिपिकल सौदिंडियन चित्रपटांपासून वेगळे बनवतात.
कथेचा नायक उदय (सिद्धार्थ) हा अतिश्रीमंत घरातला, तर नायिका संध्या (शमिली) आई-वडिल गमावलेल्या मध्यमवर्गीय कुटुंबातील. दोघांच्या विचारसरणीत जमीन-अस्मानाचा फरक. ती अतिशय टापटिपीची, तर हा पसारा करणारा.
कथेचा नायक उदय (सिद्धार्थ) हा अतिश्रीमंत घरातला, तर नायिका संध्या (शमिली) आई-वडिल गमावलेल्या मध्यमवर्गीय कुटुंबातील. दोघांच्या विचारसरणीत जमीन-अस्मानाचा फरक. ती अतिशय टापटिपीची, तर हा पसारा करणारा.वसाहत ते महाबलाढ्य राष्ट्र - ४
यापूर्वीचे भाग - १, २, ३
व्यवसायाने पूर्णवेळ सैनिक नसणाऱ्या बंडखोरांनी ब्रिटिश सत्तेविरुद्ध युद्ध सुरू तर केले होते पण ते जिंकणे फारच अवघड होते कारण त्या काळात ब्रिटिश सैन्य जगात सर्वोच्च स्थानावर होते. तरी पण काही घटकांमुळे ब्रिटिश सैन्याला तोंड देता येईल असे सामर्थ्य निर्माण झाले होते, हिंमत, नेतृत्व, लढताना आजवर न वापरल्या गेलेल्या रणनीती अन नव्याने बनलेली अमेरिकन अस्मिता.
आमचेही कांदेपोहे – कि दारू चकणा ? एक सत्य अनुभव भाग १
इथे अनेकजण आपले “कांदे पोह्यांचे “ अनुभव सांगताना बघून मला हि २००३-२००४ सालाची आठवण झाली ..... मुली बघण्याचे काही अजब , काही विचित्र आणि काही ठीक अनुभव घेत होतो. कितीही शिकलो असलो तरी तिशीपर्यंत आल्याने स्वताची लग्न बाजारातली किंमत हि कळत होतीच. त्यात अजस्त्र देह आणि थोडी कमी उंची (५’९.५” ) आणि काळा वर्ण नसलेल्या सौंदर्यात भरच घालत होता !!
माझे सर्व प्रकारचे कार्यक्रम चालू होते – म्हणजे मुली घरी येणे / जाणे . “सर्वांनी “ बाहेर भेटणे आणि मला सर्वात आवडायचे ते म्हणजे बाहेर फक्त दोघानीच भेटणे त्यात येक मेकाला समझता तरी येते.
आग
एकटाच बसलो होतो
सागरी किनारयावरती
आकाशी नक्षत्रांच्या
मिणमिणत्या अंधुक ज्योती
फेसाळत येई किनारी
चंद्राच्या ओढीने जी
प्रत्येक लाट ती माझ्या
अंत:करणातील होती
ठेचाळत जरी आली
नदी सागरास भेटाया
परी तिला मिळाली पहिली
ती साद कोणती होती
माझ्या कवितेची झाली
ही शुष्क कोरडी पाने
जाळून तिला जी गेली
ती आग कोणती होती
मिसळपाव