ऋतु आला ऋतु गेला
लेखनविषय:
शिरशिर गारव्याचा
ऋतु आला ऋतु गेला
पानगळीने सकाळी
सडा पिवळा पडला
सूर छेडिले नभांत
नाद घुमे काळजात
श्वेत मेघांचे हे गाणे
गाती निळ्या अंबरात
हुरहुर काहीलीचा
ऋतु आला ऋतु गेला
शालू हिरव्या पाचूचा
काळ्या आईने नेसला
तुझे पाऊल पडता
अस्सा होता तो देखावा
तुजविना साहवेना
आज पुन्हा तो चांदवा
- संध्या
डिसें २०११
( पीले पत्तो का मौसम जा चुका है या जावेदसाहेबांच्या मध्यवर्ती कल्पनेवरून हा मुक्त अनुवाद ..)
वाचने
1934
वाचनखूण
प्रतिक्रिया
10
( पीले पत्तो का मौसम जा चुका
In reply to ( पीले पत्तो का मौसम जा चुका by अत्रुप्त आत्मा
बुवा, आम्ही परतीकशेत आहो.
In reply to बुवा, आम्ही परतीकशेत आहो. by यसवायजी
यसवायजी,
In reply to यसवायजी, by अत्रुप्त आत्मा
"पीले पत्तो का मौसम"
In reply to "पीले पत्तो का मौसम" by यसवायजी
कसे पाडु मी विडंबन जेंव्हा
In reply to ( पीले पत्तो का मौसम जा चुका by अत्रुप्त आत्मा
हमेशा की तरहा...सीधी गहेराइ
In reply to हमेशा की तरहा...सीधी गहेराइ by सांजसंध्या
(No subject)
आमच्याकडे सध्या कुणी लक्ष देत
मस्त
सर्व प्रतिसादकांचे मनापासून