लेखकनेताजी बोराडेयांनी गुरुवार, 26/03/2015 17:44 या दिवशी प्रकाशित केले.
अगर तुम साथ देते तो
आशियाँ हम सजा देते,
यूँ बिखरी सी ज़िन्दगी को
हम जीने की वजह देते.
समज़ ये हम को भी है की
हमारे तुम नहीं लेकिन,
समज़ दिल को भी होती तो,
हमसफर गम नही होते.
- नेता
लेखकखंडेरावयांनी गुरुवार, 26/03/2015 13:42 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार.
मागचा भाग :
माझी काझिरन्गा सफर
मागिल भाग थोडा जास्तच त्रोटक झाला. या भागाचा उद्देश ही सहल कशी करावी याची माहिती देणे आहे.
काझिरंगाला पोहोचायचे तर सुरुवात गुवाहाटीपासुन करुयात. गुवाहाटी हे आसामचे सर्वात मोठे शहर. प्रशासकिय राजधानी दिसपुर ही गुवाहाटीचाच एक भाग आहे. मला गुवाहाटी कोणत्याही शहरासारखे वाटले. भरपुर गर्दी आणि महागड्या रिक्शा.
ब्रम्हपुत्रेचे बरेच घाट शहरात आहेत. फॅन्सी बाजार/ पलटन बाजार भागात बरीच होटेल्स आहेत. तिथे रहाता येउ शकते.
लेखकगवियांनी गुरुवार, 26/03/2015 12:51 या दिवशी प्रकाशित केले.
जर्मनविंग्ज फ्लाईट नंबर फोर-यू-नाईनर फाय टू फाय या उड्डाणाच्या आल्प्समधे झालेल्या क्रॅशला फॉलो करण्यासाठी ही जागा आहे. अपडेट्स वेगाने येताहेत. काही ऑब्सोलीट होताहेत आणि काही वेगळ्याच दिशेला नेताहेत. संकलनाचा हेतू आहे.
लुफ्तांझा कंपनीची चाईल्ड कंपनी असलेली जर्मनविंग्ज १९९७ मधे सुरु झाली होती. आजरोजी कंपनीकडे जवळजवळ ऐंशी विमानं आहेत. त्यापैकी निम्मी एअरबस ए ३१९-१०० सीरीजची आहेत. उर्वरितांमधे निम्मी एअरबस ३२०-२०० सीरीज आणि निम्मी बंबार्डियर जातीची विमानं आहेत.
अपघातग्रस्त विमानाची जात: एअरबस ३२०-२११.
लेखकविदेशयांनी गुरुवार, 26/03/2015 10:05 या दिवशी प्रकाशित केले.
विचारत इकडे तिकडे आले
आज पाहुणे घरात आले
अहाहा सदन धन्य झाले ..
निवांत खुर्चीवर ते बसले
मान डोलवत जरासे हसले
रुमालाने तोंडही पुसले ..
'कसे काय तुम्ही वाट चुकला
आठव आमचा कसा जाहला ?'
- गूळपाणी देत प्रश्न विचारला ..
ओशाळवाणे पाहुणे हसले
हळूच इकडे तिकडे पाहिले
प्रश्नाचे उत्तर देणे टाळले ..
पिशवीतून मोबाईल काढला
रुमालाने स्वच्छही पुसला
माझ्या हाती तो सोपवला ..
"गनिमी कावा" त्याचा ध्यानी
आला माझ्या त्याच क्षणी
मुकाट उठलो हाती धरुनी ..
जर्जर जीव त्या पाहुण्याचा
"चार्जर" विसरला मोबाईलचा
शोधला पत्ता माझ्या घरचा .. !
.
लेखकविदेशयांनी बुधवार, 25/03/2015 23:48 या दिवशी प्रकाशित केले.
नकोस टाकू
कटाक्ष तिरपा
मोहकसा ग
पुन्हा पुन्हा -
नकोस करू
गर्व रुपाचा
ठुमकत मिरवत
पुन्हा पुन्हा -
घमेंड तुजला
रूपगर्विते
दाखवी आरसा
पुन्हा पुन्हा -
नित्य आवडे
आत्मस्तुती
मनास कशी
पुन्हा पुन्हा -
डोळे अमुचे
आहेत म्हणुनी
रुपडे बघतो
पुन्हा पुन्हा -
आम्ही नसतो
डोळेही नसते
विचार कर ग
पुन्हा पुन्हा .. !
लेखकबाप्पूयांनी बुधवार, 25/03/2015 22:37 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या उकाड्यामुळे खूप हैराण झालो आहे. आणि माझे घर अश्या ठिकाणी आहे जिथे बाहेरून भरपूर हवा येण्यासाठी विशेष अशी योजना नाहीये. खिडकी आणि दरवाजे १५ ते २० मिनिटे जरी लावून घेतले तर आतील तापमान आणि बाहेरील तापमान यामध्ये जवळपास ८-१० सेल्सिअस चा फरक पडतो. कित्येकदा घराला लॉक करून थोडा वेळ बाहेर गेलो आणि आल्यावर दरवाजा उघडला कि जणू काही भट्टी मध्ये शिरलोय असे वाटते... या गोष्टीचा सगळ्यात जास्त त्रास रात्री झोपताना होतोय. रात्रभर इतके उकडते कि झोप च येत नाही.. फ्रीज खोलून आतमध्ये स्वताला कोंडून घ्यावे असे वाटते.. ( एकदा असा प्रकार चक्क केला देखील) .
लेखकशिव कन्यायांनी बुधवार, 25/03/2015 21:06 या दिवशी प्रकाशित केले.
एका मोठ्या शहरात जत्रा भरली होती. एक अवखळ सुंदरी शेजारच्या खेड्यातून त्या जत्रेस आली.
खळाळणाऱ्या निर्झराप्रमाणे तिचे हसू होते. गालांवर गुलाबाच्या कळ्यांची लाली विलसत होती.
सूर्यास्ताची सोनेरी हुरहूर तिच्या रेशमी, भुरभुरणाऱ्या केसांत रेंगाळत होती.
उषेप्रमाणे तिचे मुखमंडल अगदी प्रसन्न होते.
सूर्याने पृथ्वीचे चुंबन घेताच, क्षितिजाचे ओठ विलग व्हावेत, त्यातून केशरी हसू निसटावे, तसे तिचे हसरे ओठ!
लेखकमूकवाचकयांनी बुधवार, 25/03/2015 20:42 या दिवशी प्रकाशित केले.
सहजसुंदर प्रेमाचे स्पंदन अनुभवत जागे व्हावे
अन निसर्गाच्या नितांत सुंदर जादूगरीशी समरस होत आरामात पहुडावे ...
चैतन्याच्या या अथांग सागरात मी काय तुम्ही काय
आपण सारेच लाटांसारखे सतत उफाळत असतो
आयुष्याच्या अनंत प्रवाहाच्या किनार्यालगत खेळताना
हाती लागलेल्या चार थेंबांचे शिंतोडे एकमेकांवर उडवत
तिथल्या सुंदर चकचकीत वाळूत ज्याने त्याने खुशाल आपापल्या स्वाक्षर्या कोरून काढाव्यात
आणि समिंदराची हाक आली की पुढल्या भरतीच्या लाटेत त्या विरूनही जाव्यात, कारण ...
रोज नव्याने त्याच किनार्याला अलगद बाहुपाशात घेणार्या
दर्याची ही अनावर ओढ असते मुळातच अनादि अनंत!
(मूळ काव्यः
लेखकएक एकटा एकटाचयांनी बुधवार, 25/03/2015 19:39 या दिवशी प्रकाशित केले.
स्थळ : दहावी अ चा वर्ग
वेळ: मधल्या सुट्टीनंतरची
त्या दिवशी शेवटचे चार पिरिअडर्स सायन्स-1 च्या प्रक्टिकल्सचे होते. दहावीला सायन्स-1 हां विषय विश्वासराव मेडम घ्यायच्या. वर्गात बेंचच्या पाच रांगा होत्या. प्रत्येक रांगेत जवळपास पंधराएक मुले बसायची. वर्गाबाहेर कधीही कुठेही जाताना मुले नेहमी ह्या बेंचच्या रांगाच्या हिशोबानेच निघायची. सगळ्यात पहिली दाराजवळची पहिली रांग, मग त्याच्या बाजूची ,मग त्याच्या बाजूची.
प्रक्टिकल्स म्हटले की आमच्यासाठी पर्वणीच असायची. मेडम तिकडे प्रयोगशाळेत बिझी असताना सगळा वर्ग 2 तासासाठी निवांत असायचा.