Skip to main content

सुगंधा - भाग २

लेखक कविता१९७८ यांनी मंगळवार, 07/04/2015 16:24 या दिवशी प्रकाशित केले.
अमोघला तातडीने इस्पितळात नेण्यात आले, पायाला फ्रॅक्चर झाले होते, ऑपरेशन करणे गरजेचे होते, तीने लगेचच फोन करुन कळवल्याने आईवडील ही कोल्हापुरला यायला निघालेच होते, तीचा मामा देखील गावाहुन निघाला. मावशी आणि तिचा मुलगा धक्क्यातुन सावरले नव्हते तरीही तिच्या बरोबरच इस्पितळात होते, तिने धावपळ करुन इस्पितळातले सोपस्कार पार पाडले. अमोघच्या ऑफीसमधे कळवुन तिने रजा वाढवुन घेतली. अमोघचे ऑपरेशन झाले, पायात रॉड बसवला गेला.

आज्जीबाईंचे लोणचे........... खलिल जिब्रान

लेखक शिव कन्या यांनी मंगळवार, 07/04/2015 07:56 या दिवशी प्रकाशित केले.
एका सरदाराच्या घरात त्याच्या आज्जीबाई राहायच्या. आज्जीबाईना आपल्या स्वैपाकघरातील ओळीने भरून ठेवलेल्या लोणच्यांच्या बरण्यांचा खूप अभिमान होता. ती लोणची आज्जीबाईंनी स्वतः घातली होती. पण त्यातल्या एका बरणीला मात्र त्या कुण्णाला म्हणून हात लावू द्यायच्या नाहीत. त्यात त्यांनी घातलेले खास लोणचे मुरत होते. ते खास लोणचे त्या खास प्रसंगालाच काढणार होत्या. पण तो ‘खास’ प्रसंग कोणता, त्यांनाच माहित! एकदा त्या सरदाराकडे, एक विद्वान परदेशी पाहुणा भोजनासाठी आला. आज्जीबाईंच्या मनात आले, ‘एका परदेशी पाहुण्या साठी वर्षानुवर्षे मुरवलेले लोणचे मी का काढू?

माय चॉईस

लेखक पॉइंट ब्लँक यांनी मंगळवार, 07/04/2015 00:37 या दिवशी प्रकाशित केले.
दिपिका काकुन "माय चॉईस" ही चित्रफित दाखवून सर्व जगात खळबळ माजवली आहे. हे औचित्य साधून मूलभुत हक्कांवर सुदृढ चर्चा घडवून आणण्याचा मानस आहे. मिपाकरांनी मनमोकळेपनाने आपले मत व्यक्त करावे अशी नम्र विनंती. अनाहितामध्ये जरी ह्या विषयाचा खिस पाडून कोशिंबर झाली असली तरिही स्त्री वर्गाने इथे भाग घेवून सर्वांच्या ज्ञानात भर घालण्याची कृपा करावी. चर्चेचा पाया मह्णून गेल्या काहि दिवसातील घडामोडी इथे संदर्भासाठी देत आहे.

अशी कशी ग तु...........

लेखक एक एकटा एकटाच यांनी सोमवार, 06/04/2015 23:29 या दिवशी प्रकाशित केले.
अशी कशी ग तु........... नेहमीच हवीहवीशी वाटतेस असतेस दिवसभर डोळ्यात अन रात्री स्वप्नांतही जागतेस........... मी पहातो तुझे प्रातिबिंब या चमचमणार्‍या नभात कधी भेटतेस होउनी चांदवा कधी चंदेरी चांदण्यात लपतेस.............. अशी कशी ग तु........... नेहमीच हवीहवीशी वाटतेस अशी कशी ग तु........... नेहमीच हवीहवीशी वाटतेस सजतेस अल्लड सरींनी अलवार ओल्या मिठीत शहारतेस मी मागतो तुझा इशारा या चिंब भिजणार्‍या पावसात कधी वेढतेस तुझ्या आवेगाने कधी अलगद ओंजळीत साठतेस अशी कशी ग तु........... नेहमीच हवीहवीशी वाटतेस अशी कशी ग तु........... नेहमीच हवीहवीशी वाटतेस मोहरतेस आसमंत अस्तित्वाने हवा तुझ्या श्वासाने

यू. के. मधे फिरण्यासारखे ठिकाण

लेखक अभिजीत अवलिया यांनी सोमवार, 06/04/2015 21:06 या दिवशी प्रकाशित केले.
मंडळी, मी सध्या यू. के. मधे आहे. आणि माझी अर्धंगिनी आणी 3 वर्षाचे सुपुत्र इकडे 2 महिन्यासाठी येत आहेत. तर ह्या 2 महिन्यात आवर्जून बघावीत अशी लंडन आणि उर्वरित यू. के. मधली ठिकाणे सांगा (शक्यतो निसर्ग सुंदर ठिकाणे. म्यूज़ियम्स बघण्यात आम्हाला इंट्रेस्ट नाही).

जायचे आहेच तर जावेस आता ..

लेखक drsunilahirrao यांनी सोमवार, 06/04/2015 20:54 या दिवशी प्रकाशित केले.
जायचे आहेच तर जावेस आता का असे वाटेत थांबावेस आता मी तुला द्यावे असे उरले न काही तू हवे तर दु:खही न्यावेस आता ही किती तलखी जिवाची होत आहे ग्रीष्म तू विझवून टाकावेस आता संपवाया अंतरे माझ्यातुझ्यातिल जवळ थोडे आणखी यावेस आता अडथळ्यांना टाळणेही ठीक नाही अडथळे मोडून काढावेस आता मी प्रतिक्षेचा पुरावा काय देऊ तू युगे चालून ठरवावेस आता - डॉ.सुनील अहिरराव

चाँदसिंग बुलू..........एक लघुकथा.

लेखक जयंत कुलकर्णी यांनी सोमवार, 06/04/2015 20:05 या दिवशी प्रकाशित केले.
चाँदसिंग बुलू........ सकाळीच अफजलचा दिल्लीहून फोन आला. ‘औलीयाभाई रामराम !’ ‘हां बोला औलियाखान सलाम !’ ‘बुरकासाब (बुरका म्हणजे प्रमुख) एलोराला येणार आहे ना संमेलनाला ?’ ‘म्हणजे काय ! येणार तर !’ ‘माझ्या मुलाला तुमच्याच हातून दिक्षा द्यायची आहे, आठवण आहे ना?’’ ‘अफजल ते तर लक्षात आहेच पण साधू बुलूला तो कसला कागद सापडला आहे त्याचे वाचनही करायचे आहे हे लक्षात ठेव.’ ‘ हो ! हो! ते तर आहेच बुलूसाब’ आमचा बुलू समाज तसा फार जूना नाही पण आहे अत्यंत सधन.

संध्याछाया..

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी सोमवार, 06/04/2015 19:38 या दिवशी प्रकाशित केले.
दिवस संपला होता होता झालि संध्याकाळ संध्येच्या त्या छायेमध्ये झोपे थकला बाळ वाट वाकडी करून दिसाला संध्या छाया आली बाळाच्या त्या चर्येवरती मावळणारि लाली तो ही थकला ती ही थकली सांज वातीला जागा उद्या पुन्हाही सकाळ होइल तोवरि कसला त्रागा? मी ही वदतो छोटी कहाणी प्रत्येका दिवसाची कुठे कुठे ती दिसे पौर्णिमा-बाकी ही अवसेची! चला गड्यांनो समजुन घेऊ रूपक हे संध्येचे जुने जाणते जे जगले ते साधे जीवन साचे ----------------------------- अतृप्त..

सये भांडतेस कशा..

लेखक कहर यांनी सोमवार, 06/04/2015 18:11 या दिवशी प्रकाशित केले.
(दूर असलेला नवरा आज बऱ्याच दिवसांनी घरी येतोय म्हणून बायकोची उडालेली त्रेधा पाहून तिच्या मैत्रिणी तिची अशी फिरकी घेतात ) सांज दाराशी गं आली, सये भांडतेस कशा.. काय लागीर लागली अशा राती येड्यापिश्या । सये भांडतेस कशा, भरे घागर पाण्याची तुझे ध्यान कोठे बाई? येळ जाहली जाण्याची । येळ जाहली जाण्याची, बिगीबिगी टाक पाय आडवाट चकव्याची.. मन लागंल वढाय । मन लागंल वढाय, या गं चांदणचाहूली भीव घाली गोरीमोरी तुझी कातर सावली । या गं चांदणचाहूली, रंग ठेव कि राखून मीठ उतरून टाक..
काव्यरस

सुगंधा - भाग १

लेखक कविता१९७८ यांनी सोमवार, 06/04/2015 17:45 या दिवशी प्रकाशित केले.
"तुने साथ जो मेरा छोडा दिवाना तेरा मर जायेगा..........." दुरवर संध्याकाळच्या कातरवेळेत अमोघच्या कानावर हे सुर पडत होते आणि तो आणखीनच भावनात्मक झाला. तिला विसरणे खरंच इतके अवघड होते? का? ती जेव्हा आपल्या आयुष्यात नव्हती तेव्हा आपण जगत नव्हतो तिच्या आधी आपल्या आयुष्यात कुणी दुसरी होती असेही नाही. मग ? आपल्याला तिची सवय लागलीये? तिचं सतत समोर राहणं आपल्याला खलायचं, तिचं वागणं , बोलणं , हसणं खिदळणं सर्वच नावडतीचं मीठ अळणी असल्यासारखं वाटायचं , मग आता असं झालय तरी काय आपल्याला, का ती सारखी डोळ्यासमोर दिसते? का तिच्या बांगड्यांचा आवाज कानात घुमतोय.