Skip to main content

बर्था बेंझ - जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने.......

लेखक सौन्दर्य यांनी रविवार, 08/03/2015 20:38 या दिवशी प्रकाशित केले.
सरदार हे जसे अकारण चेष्टेचा विषय झाले आहेत, त्याचप्रमाणे ‘स्त्रियांचे ड्रायव्हिंग’ हा सुद्धा एक चेष्टेचा, टवाळीचा विषय झाला आहे. गुगलवर सर्च केले असता असंख्य विनोदी विडीयो ह्या विषयावर दिसतील. परंतु जगातली सर्वात पहिली ऑटोमोबाईल, (स्वयंचलीत गाडी) ही एका स्त्रीने चालवली, आणि इतकेच नव्हे तर तिच्यामुळेच ‘ऑटोमोबाईल’ ही कल्पना नुसती रुजलीच नाही तर चांगलीच फोफावली, हे फारच कमी जणांना ठाऊक असेल.

गणपतीपुळेे आणि कोल्हापूरः मदत हवी आहे...!

लेखक अदि यांनी रविवार, 08/03/2015 17:58 या दिवशी प्रकाशित केले.
आमचा येत्या गुरुवार-शुक्रवार-शनिवार मशारनिल्हे (जुन्या लेखकांची पुस्तके वाचल्याचा परिणाम :D )ठिकाणी जायचा प्लॅन आहे. विचार पक्का झाला आणि सल्लागार म्हणुन मिपाकरचं नजरेसमोर आले. मिपाकर जर खालील गोष्टींबाबत मार्गदर्शन करु शकले तर त्याची मला मदत होऊ शकेल. १) गणपतीपुळेे आणि कोल्हापूरः चांगली बजेट लॉजेस/हॉटेल्स २) गणपतीपुळेे आणि कोल्हापूरः जवळपास पाहण्यासारखी ठिकाणे ३) खवय्येगिरीसाठीची ठिकाणे.

बाईपण

लेखक अनाहिता यांनी रविवार, 08/03/2015 02:10 या दिवशी प्रकाशित केले.
तो आणि ती :- सविता००१ तो: हे काय गं?आज सुद्धा हिरवी चटणी नाही केलीस तू. तुला माहित आहे ना, मला फार आवडते म्हणून? तरी? ती: अरे, कंटाळा आलाय रे. आणि लाल चटणी आहे की पानात. झालंच तर खमंग काकडी आहे. तो: पण तू हिरवी चटणी करणार म्हणाली होतीस. ती: अरे, नाही जमत एखाद्यावेळी. एवढं काय त्यात? चांगली तुला आवडते म्हणून मटार उसळ, खमंग काकडी, लसणीच तिखट, गरम पोळी अगदी तुला आवडते तशी तव्यावरून ताटात, शिवाय गाजर हलवा. तरी तरी तू नाखूषच. तो: असं म्हणालो मी? ती: अर्थ तोच ना.......... तो: आधी किती लहान सहान गोष्टी सुद्धा अगदी आठवणीत ठेवून करायचीस.
विशेष

सोल सर्फर - अ ट्रु स्टोरी ऑफ फेथ, फॅमेली, अँड फायटिंग टू गेट बॅक ऑन दी बोर्ड.

लेखक सानिकास्वप्निल यांनी रविवार, 08/03/2015 02:10 या दिवशी प्रकाशित केले.
. *छायाचित्र आंजावरून साभार बेथनी हॅम्लिटन हिचा जन्म हवाईमध्ये एका सर्फर कुटुंबात झाला. अगदी लहानपणापासून तिला सर्फबोर्डिंगची आवड होती त्यामुळे वयाच्या सातव्या-आठव्या वर्षीच ती सफाईनं सर्फींग करू लागली. तिचे सर्फर व्ह्यायचे स्वप्न होते.
विशेष

गोष्ट एका बॉम्बस्फोटाची

लेखक सविता००१ यांनी रविवार, 08/03/2015 02:09 या दिवशी प्रकाशित केले.
(डिस्क्लेमर : घटना खरी पण सुरक्षा कारणास्तव खरी नावे देता येणार नाहॆत. सग्गळी नावे-अस्मादिकांच सोडून बदलली आहेतच.) आता ही गोष्ट कुठे घडली म्हणता? तर इथेच मुंबैत. माझ्याच हपिसात. फक्त ही वाचून हसायचं नाही बै कुणी. हो म्हणजे चालतच नाही आम्हाला असलं काही ! तो अधिकार फक्त आमचाच ! तर ते असो. माझं ऑफिस हे मोठ्ठाल्या सरकारी ऑफिसेस ने वेढलेलं आहे. मधेच आमचं आपलं पिटुकल तीन मजल्यांच. एक एन. जी . ओ. बाकीची सगळी अगदी ३०-३५ मजल्यांची. त्यामुळे आमची मूर्ती लहान पण कीर्ती लैच महान. लई टरकून असतात बाकीचे ऑफिस वाले आम्हाला. आता कळेलच. तर झाल असं ! १४ ऑगस्ट ला ऑफिसमध्ये एक पत्र आलं.
विशेष

भुत्याचे मनोगत

लेखक कविता१९७८ यांनी रविवार, 08/03/2015 02:08 या दिवशी प्रकाशित केले.
अहो शुक शुक.... अ...हो... शु...क शु....क, अहो घाबरताय काय असे? मी भुत्या ... मी इथे वर आहे..अहो वर.. वर म्हणजे या पिंपळाच्या झाडावर. काय? मी दिसत नाही असं म्हणता? पण मला तर तुम्ही दिसता ! अगदी रोज या रस्त्यावरुन येता जाता, कधी तुमच्या बायको बरोबर तर कधी मुलांबरोबर.. क्काय तुम्ही मला कधी पाहीलेच नाही???? अरे बरोबर... कसे पाहणार नाही का? गेली २० वर्षे मी या पारावर भूत बनुन राहतोय मग कुणाला कसा दिसेन? अरे अरे! घाबरु नका, पळु नका हो, मी हानिकारक भूत नाहीये हो !
विशेष

पेपर फ्लॉवर..डच गुलाब

लेखक इशा१२३ यांनी रविवार, 08/03/2015 02:07 या दिवशी प्रकाशित केले.
. नमस्कार मंडळी!आपल्याला सजावटीसाठी आणि भेट देण्यासाठी नेहेमीच काहीतरी नविन हवे असते.अशावेळेस काही घरीच स्वतः बनवलेले असले तर आनंद वाढतो.
विशेष

बालमानस जपणे.

लेखक अंतरा आनंद यांनी रविवार, 08/03/2015 02:06 या दिवशी प्रकाशित केले.
कितीही सुधारलं तरी आमचं शहर अजून रेल्वेशी ईमान राखून आहे. त्यामुळे ट्रेन आली की रस्त्यांचे पाय अधिक जलद् गतीने वेगवेगळ्या घरांच्या दिशेने जायला लागतात. उशीराची वेळ असली की त्या पायांना पोळीभाजी केंद्राचा एक थांबा मिळतो. अश्याच एक पोळीभाजी केंद्राशी गर्दीतलं एक कुटुंब. नवरा-बायको आणि चार-पाच वर्षांची मुलगी. कुठली भाजी, किती पोळ्या याचा उहापोह करत केंद्रावरच्या काकांना ऑर्डर सांगत होते. ते काकाही एकटेच दोघाचौघांच्या प्रश्नांना उत्तरं देणे, हिशेब करणे, पैसे घेणे ही कामं करतच होते. त्या छोटीचं लक्ष गेलं बरणीतल्या वड्यांकडे.
विशेष

जुळ्यांचं दुखणं

लेखक प्राची अश्विनी यांनी रविवार, 08/03/2015 02:05 या दिवशी प्रकाशित केले.
विषय थोडासा वेगळा आहे, खरंय, पण यच्चयावत जुळ्या भावा बहिणींच्या मनातला आहे. विशेषतः IDENTICAL TWINS! माझ्या नवऱ्याला आणि दिराला (पूर्वी रोज आणि हल्ली कधीकधी) या प्रश्नोत्तरांच्या फैरीला सामोरं जावं लागतं. तुम्ही सुद्धा आठवून बघा , जेव्हा जेव्हा जुळ्या व्यक्ती एकत्र समोर येतात तेव्हा संभाषण या रुळांवरून चालते. "अरे वा! किंवा अरेच्च्या किंवा अय्या (हे समोरच्या व्यक्तीच्या स्त्री किवा पुरुष असण्यावर अवलंबून आहे .) तुम्ही जुळे आहात?
विशेष