जकार्ताच्या आठवणी : १ : तयारी
माझी सध्याची कंपनी अॅमडॉक्सच्या कृपेने मला माझ्या पहिल्या विदेश दौऱ्याची संधी मिळाली. प्रोजेक्टच्या काही कामासाठी मला इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथे जवळपास एक महिना जाण्यासाठी विचारलं होतं. अर्थात, मी क्षणभरही उशीर न करता होकार दिला.
माझ्या अशा संधींच्या गतेतिहासाप्रमाणेच हि संधीसुद्धा एका क्षणी गेल्यातच जमा होती. पण परत पारडं पालटलं आणि जाण्याचं नक्की झालं. याआधी माझ्या आधीच्या कंपनीमध्ये मी चीनला एक वर्षासाठी जाणार होतो. माझं वर्क परमिटसुद्धा बनलं होतं. पण ऐनवेळी आमच्या कस्टमरने तो प्लान रद्द केला आणि माझी संधी हुकली.
मिसळपाव