Skip to main content

डोळे आमचे आहेत म्हणुनी

लेखक विदेश यांनी बुधवार, 25/03/2015 23:48 या दिवशी प्रकाशित केले.
नकोस टाकू कटाक्ष तिरपा मोहकसा ग पुन्हा पुन्हा - नकोस करू गर्व रुपाचा ठुमकत मिरवत पुन्हा पुन्हा - घमेंड तुजला रूपगर्विते दाखवी आरसा पुन्हा पुन्हा - नित्य आवडे आत्मस्तुती मनास कशी पुन्हा पुन्हा - डोळे अमुचे आहेत म्हणुनी रुपडे बघतो पुन्हा पुन्हा - आम्ही नसतो डोळेही नसते विचार कर ग पुन्हा पुन्हा .. !

असह्य हा उकाडा...

लेखक बाप्पू यांनी बुधवार, 25/03/2015 22:37 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या उकाड्यामुळे खूप हैराण झालो आहे. आणि माझे घर अश्या ठिकाणी आहे जिथे बाहेरून भरपूर हवा येण्यासाठी विशेष अशी योजना नाहीये. खिडकी आणि दरवाजे १५ ते २० मिनिटे जरी लावून घेतले तर आतील तापमान आणि बाहेरील तापमान यामध्ये जवळपास ८-१० सेल्सिअस चा फरक पडतो. कित्येकदा घराला लॉक करून थोडा वेळ बाहेर गेलो आणि आल्यावर दरवाजा उघडला कि जणू काही भट्टी मध्ये शिरलोय असे वाटते... या गोष्टीचा सगळ्यात जास्त त्रास रात्री झोपताना होतोय. रात्रभर इतके उकडते कि झोप च येत नाही.. फ्रीज खोलून आतमध्ये स्वताला कोंडून घ्यावे असे वाटते.. ( एकदा असा प्रकार चक्क केला देखील) .

सुंदरी आणि जत्रा ...... खलील जिब्रान

लेखक शिव कन्या यांनी बुधवार, 25/03/2015 21:06 या दिवशी प्रकाशित केले.
एका मोठ्या शहरात जत्रा भरली होती. एक अवखळ सुंदरी शेजारच्या खेड्यातून त्या जत्रेस आली. खळाळणाऱ्या निर्झराप्रमाणे तिचे हसू होते. गालांवर गुलाबाच्या कळ्यांची लाली विलसत होती. सूर्यास्ताची सोनेरी हुरहूर तिच्या रेशमी, भुरभुरणाऱ्या केसांत रेंगाळत होती. उषेप्रमाणे तिचे मुखमंडल अगदी प्रसन्न होते. सूर्याने पृथ्वीचे चुंबन घेताच, क्षितिजाचे ओठ विलग व्हावेत, त्यातून केशरी हसू निसटावे, तसे तिचे हसरे ओठ!

चिद्विलास (स्वैर भावानुवाद)

लेखक मूकवाचक यांनी बुधवार, 25/03/2015 20:42 या दिवशी प्रकाशित केले.
सहजसुंदर प्रेमाचे स्पंदन अनुभवत जागे व्हावे अन निसर्गाच्या नितांत सुंदर जादूगरीशी समरस होत आरामात पहुडावे ... चैतन्याच्या या अथांग सागरात मी काय तुम्ही काय आपण सारेच लाटांसारखे सतत उफाळत असतो आयुष्याच्या अनंत प्रवाहाच्या किनार्‍यालगत खेळताना हाती लागलेल्या चार थेंबांचे शिंतोडे एकमेकांवर उडवत तिथल्या सुंदर चकचकीत वाळूत ज्याने त्याने खुशाल आपापल्या स्वाक्षर्‍या कोरून काढाव्यात आणि समिंदराची हाक आली की पुढल्या भरतीच्या लाटेत त्या विरूनही जाव्यात, कारण ... रोज नव्याने त्याच किनार्‍याला अलगद बाहुपाशात घेणार्‍या दर्याची ही अनावर ओढ असते मुळातच अनादि अनंत! (मूळ काव्यः
काव्यरस

आठवणींच्या वहीतून

लेखक एक एकटा एकटाच यांनी बुधवार, 25/03/2015 19:39 या दिवशी प्रकाशित केले.
स्थळ : दहावी अ चा वर्ग वेळ: मधल्या सुट्टीनंतरची त्या दिवशी शेवटचे चार पिरिअडर्स सायन्स-1 च्या प्रक्टिकल्सचे होते. दहावीला सायन्स-1 हां विषय विश्वासराव मेडम घ्यायच्या. वर्गात बेंचच्या पाच रांगा होत्या. प्रत्येक रांगेत जवळपास पंधराएक मुले बसायची. वर्गाबाहेर कधीही कुठेही जाताना मुले नेहमी ह्या बेंचच्या रांगाच्या हिशोबानेच निघायची. सगळ्यात पहिली दाराजवळची पहिली रांग, मग त्याच्या बाजूची ,मग त्याच्या बाजूची. प्रक्टिकल्स म्हटले की आमच्यासाठी पर्वणीच असायची. मेडम तिकडे प्रयोगशाळेत बिझी असताना सगळा वर्ग 2 तासासाठी निवांत असायचा.

आधुनिक संगीत - एक चिंतन !

लेखक चिनार यांनी बुधवार, 25/03/2015 16:01 या दिवशी प्रकाशित केले.
बप्पी लहिरी पासून सुरु झालेली आधुनिक संगीतातली क्रांती आता हनी सिंगपर्यन्त येउन स्थिरावली आहे. आधुनिक संगीत म्हणजे नवसंगीत नव्हे. संगीत आणि आधुनिक संगीत हे सर्वस्वी भिन्न विषय आहेत. संगीताची निर्मिती ही शब्द,सूर,लय,ताल, वाद्य ह्यांच्या अभ्यासपूर्ण एकत्रीकरणातून होते. शब्द कसे असावेत, ते ताल,सूर,लय यांचा वापर करून कसे वापरावेत या सगळ्या गोष्टींना संगीतामध्ये नियम आखून दिलेले आहेत. आधुनिक संगीत या असल्या प्रकारांना मानत नाही. शब्द आणि वाद्य ह्यापासून ध्वनीनिर्मीती हा आधुनिक संगीताचा एकमेव उद्देश आहे! त्यातही शब्द एकाच भाषेतले असले पाहिजेत असं काही नाही.

कर्मयोगी ली कुआन यू

लेखक अरुण मनोहर यांनी बुधवार, 25/03/2015 13:17 या दिवशी प्रकाशित केले.
ब्रिटीशांनी मलाया म्हणून एक राष्ट्र स्वतंत्र करून दिले होते. त्यांत सिंगापूर देखील होते. भारत पाकिस्थानच्या पेक्षा अगदी वेगळे घडले येथे. पाकिस्थान ला फुटून वेगळे व्हायचे होते. पण इथे, त्यावेळचे पंतप्रधान टुंकू अब्दूल रहमान ह्यांना अशी भिती होती की चायनिजपुढे मलेय लोकांचा निभाव लागणे कठीण आहे. भविष्यात कदाचित हे लोक आपल्याला दाबून टाकतील. म्हणून स्वतंत्र मलायाने चायनिजला सांगितले की सिंगापूर हा तुमचा देश वेगळा करून तुम्ही -हावा ! टुंकूला वाटले होते की हा टिचभर देश काय टिकतोय! हा आपलाच आश्रित बनेल! ली यांना मुळीच वेगळे व्हायचे नव्ह्ते. त्यांनी एकत्र रहाण्यासाठी खूप समजावले.

उचलता वजन हे - Lifting Technique

लेखक वेल्लाभट यांनी बुधवार, 25/03/2015 13:02 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या रोजच्या धावपळीचा कळत नकळत आपल्या शरीरावर परिणाम होत असतो. सद्ध्या एक वारंवार ऐकू येणारी तक्रार म्हणजे 'मला बॅकचा प्रॉब्लेम आहे रे' 'लोवर बॅकचा प्रॉब्लेम आहे'. आपल्या संपूर्ण शरीराला नियंत्रित करणारा हा अतिशय महत्वाचा अवयव अनेकदा आपल्याकडून दुर्लक्षित राहतो, आणि त्याचे परिणाम या अशा दुखण्यात दिसतात. पाठीवर किंवा कण्याला अपाय करणा-या अनेक गोष्टींपैकी एक नेहमी होणारी गोष्ट इथे नमूद करू इच्छितो. आपण रोजच्या व्यवहारात अनेकदा कमी अधिक वजन उचलतो. उचलून वर ठेवतो, वरून काढून खाली ठेवतो, सरकवतो, ढकलतो इत्यादी. या सगळ्या हालचाली करताना आपल्या पाठीची कमालीची इन्व्हॉल्व्हमेंट असते.

वाचता वाचता वाढे -भाग २

लेखक जेपी यांनी बुधवार, 25/03/2015 10:06 या दिवशी प्रकाशित केले.
वाचता वाचता वाढे भाग १ सध्या ऑफलाईन वाचन चालु आहे.बरीचशी पुस्तके वाचली, त्यातील काही निवडक पुस्तकाबद्दल थोडक्यात ओळख. १) द्रोहपर्व- लेखक- अजेय झणेकर. एक पेशवाईकालावर आधारीत कादंबरी.