निबंध मोठ्या मुलांचा – माजी बाईल
माझी बाईल माझी खूप लाडकी आहे.
इतकी, की तिच्याशिवाय जगणे देखील अशक्य वाटते!
ती सारखी जवळ हवी असते.
म्हणजे, शक्य असेल तर दिवसाचे चोवीस तास देखील.
अगदी हातात हात धरून ठेवण्याचे शक्य झाले नाही तर
जवळपासच असली पाहिजे,
पाहिजे तेव्हा जवळ करता आली पाहिजे!
तिचा सहवास इतका असून देखील कमीच भासतो!
आणखी आणखी हवा असतो.
त्यामुळे मी तिला लाडाने मो..बाईल,
म्हणजे, गीव मी मोअर मोअर माय बाईल...
किंवा संक्षिप्त मोबाईल पुकारतो.
खरंच, आजकालचा जमानाच असा आहे. माझ्यासारखा.
किंवा मी जमान्यासारखा आहे असे म्हणा!
सगळेच पुरुष, बाया, मुले, मुली, आजी, आजोबां, अगदी लहान बाळे देखील!
मिसळपाव