अंजनेरीची भग्न मंदिरे
अंजनेरी, नाशिकपासून जेमतेम वीसएक किमी असलेले गाव. त्र्यंबकेश्वराला जवळजवळ खेटूनच असलेले. गावापाठीमागेच असलेल्या अंजनेरी -ब्रह्मगिरीच्या सणसणीत कातळीभिंतींमुळे अतिशय लक्ष्यवेधी. अंजनेरी किल्ला आणि कातळकोरीव जैन लेणी ह्याच डोंगरावर. हनुमानाचे जन्मस्थान म्हणून अंजनेरी प्रसिद्ध. ह्याच लहानशा गावात भारतातील एक प्रसिद्ध संस्था आहे ती म्हणजे भारतीय नाणेशोध संस्थान अर्थात 'इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ रिसर्च इन न्यूमिस्मॅटिक स्टडीज'. लोकप्रभेच्या गेल्या पर्यटन विशेषांकात प्रा. पद्माकर प्रभुणे सर जे स्वत:ही नाणकशास्त्राचे उत्कृष्ट संशोधक आहेत ह्यांनी ह्या संस्थेवर एक उत्तम माहितीपूर्ण लेख लिहिला होता.
ह्याच अंजनेरीत यादवकालीन बांधकामाचा उत्कृष्ट नमुना असलेली तब्बल १६ मंदिरे विखुरलेली आहेत. यातली बहुसंख्य मंदिरे ही जैन असून उर्वरित ४ हिंदू मंदिरे आहेत. आज ही सर्वच मंदिरे बहुतांशी भग्नावस्थेत आहेत.
ही सगळी मंदिरे यादवकालीन. साधारण ११ व्या, १२ व्या शतकात ही बांधली गेली तेव्हा देवगिरीचे यादव हे सार्वभौम नव्हते. ते कधी राष्ट्रकूट तर कधी चालुक्यांचे महाअमात्य होते. तेव्हा यादवांची राजधानी नाशिकजवळचे सिंदिनेर अर्थात सिन्नर ही होती. तर अंजनेरी येथे यादवांचीच एक शाखा अधिष्ठित होती. सेऊणचंद्र यादव (तिसरा) जो यादवांचा एक महासामंत असावा हा मुख्य यादवांपैकी नाही कारण हेमाद्रीचे राजप्रशस्तीत किंवा यादवांचे इतर लेखांतही ह्याचा उल्लेख आढळत नाही. ह्या सेऊणचंद्राचा एक शिलालेख मात्र इकडे आहे. यादवांची इकडील शाखा जैन धर्माचे पालन करत असावी किंवा ह्यांच्या घरामधील एक महाल जैन घराण्यातील असावा त्यामुळे इथे जैन मंदिरांची संख्या जास्त आहे.
इथे नागर, फांसना आणि भूमिज अशा विभिन्न शैलीची मंदिरे आहेत. त्यामुळे मंदिरशैलीचा अभ्यास करणार्यांना इथे पर्वणीच आहे.
प्रसिद्ध ब्रिटिश संशोधक हेन्री कसिन्स यांच्या (Henry cousins- Medieval Temples of Dakhan) ह्या पुस्तकांत ह्या मंदिरांविषयीचा उल्लेख पुढीलप्रमाणे येतो.
The village of Anjaneri picturesquely situated on the eastern slope of the northern spur of Anjaneri or Anjaneri hill, about fourteen miles west of Nashik. Just below the village, in the plain, scattered over an area about half a square mile, there have been innumerable small shrines, of which sixteen now stand in whole or in part, while rest are represented by mounds upon which lie heap of their material- columns, images,beams, and other carved stones. The most striking feature about these remains is that they all appear to have built upon a small scale, and they are independent temples and not satellites to a larger one. They all seem to rest upon a brick foundations, and have been dedicated to various deities, the most important being Jaina, Two Vaishnava and the rest Shiva. They face all four points of the compass.
नाशिकहून एकदा वैतरणा धरणावर फेरफटका मारायला जाणार होतो तेव्हा तेथील एक डोंगरभटका मित्र हेमंत पोखरणकर त्याने वाटेतील अंजनेरी गावात काही जुनी मंदिरे आणि शिलालेख आहेत त्यांना अवश्य भेटी दे असे आग्रहाने सांगितले होते. तेव्हा मंदिरे बघण्यात काडीचाही रस नसलेल्या भावंडांबरोबर वैतरण्यावर फेरफटका मारून परत येताना गाडी अंजनेरीत गावातून आत वळवली. गाडी कच्च्या रस्त्याला लगेचच एक डावीकडे लहानसे मंदिर दिसते.
नागर शैलीत बांधलेले हे लहानसे मंदिर. ह्याला सभामंडप नसून मुखमंडप आहे. जो दोन नक्षीदार स्तंभांवर तोललेला आहे. प्रवेशद्वारातील नकसदार चौकट आहे. द्वारपट्टीकेवरील गोमटेश्वर आदी जैन प्रतिमांवरुन हे मंदिर जैन आहे हे अगदी सहजच ओळखू येते. गर्भगृह मूर्तीरहित आहे.
१. मंदिराचा दर्शनी भाग
२. नागर शैलीतील शिखर
मुखमंडपातील उजवीकडच्या स्तंभाच्या जंघेखालती एक देवनागरी शिलालेख आहे. "रवंळरनाथ जोगी". हा बहुधा एखादा जैन योगी असावा.
३. देवनागरी शिलालेख
४. द्वारपट्टीकेवरील जैन मूर्ती
५. जळमटांमध्ये विखुरलेल्या गोमटेश्वर प्रतिमा
६. प्रवेशद्वारांवरील प्रतिहारी
हे मंदिर पाहून पुढे सरकलो. थोडे पुढे जाऊन सरळ गेल्यास दोन हिंदू मंदिरे तर डावीकडे वळल्यास ३ मंदिरे आणि २ मठांचे एक संकुल दृष्टीस पडते तर संकुलाच्या समोरच अजून एक भग्न मंदिर आहे.
सर्वप्रथम हे मंदिरसंकुल पाहूयात.
तीन मंदिरे व दोन मठांचे असे हे जैन संकुल पैकी एका मंदिरात सेऊणचंद्र यादव (तृतीय) ह्याचा स्पष्ट असा देवनागरी भाषेतील शिलालेख. संकुल बहुतांशी भग्नावस्थेत असून वीरगळ, मूर्ती, मंदिराचे तुटलेले स्तंभ्, आमलक असे जागोजागी विखुरलेले आहेत.
७. मंदिरसंकुल
८. मंदिरसकुल पाठीमागच्या बाजूने
संकुलाच्या प्रवेशद्वारातून आत येताच अवशेषांमधून वाट काढत काढतच आपले मंदिर दर्शन सुरु होते. डावीकडच्या मठात कित्येक मूर्ती तशाच ठेवलेल्या आहेत. मग त्यात कधी गणपती दिसतो, कधी महावीर, कधी सरस्वती, कधी यक्ष, कधी वीरगळ तर कधी इतर जैन देवता.
९. मठात विखुरलेल्या मूर्ती -गणपती
१०. मठात विखुरलेल्या मूर्ती
११. मठात विखुरलेल्या मूर्ती- महावीर
https://lh5.googleusercontent.com/-1UuDKesPgtA/UZM_kKWdFkI/AAAAAAAAYms/kOFjDpNw4KA/s720/DSCN3411.JPG
१२. मठात विखुरलेल्या मूर्ती- हिंदू देवता
१३. ह्या मठासमोरच कित्येक वीरगळ हारीने मांडून ठेवलेले आहेत आणि ह्यातले काही वैशिष्ट्यपूर्ण आहेत.
१४. काही वीरगळ
१५. काही वीरगळ
१६. ह्या वीरगळाचे खालचे बाजूच्या चौकटीत एक सैनिक दुसर्या सैनिकाचे केस धरुन त्याला ओढताना दाखवला आहे.
१७. तर ह्या वीरगळात दोन वीर धराशायी झालेले दिसत आहेत.
ह्या इथेच अजून एक आगळावेगळी शिळा आहे. प्रथमदर्शनी तो वीरगळ वाटत असला तो वीरगळ नाही. ती आहे चौमुखी. जैन धर्मात संम्लेखन व्रताला फार महत्व आहे. स्व ओळखणे. अर्थात स्वतःच्या आत्म्याला शारीरबंंधनातून मुक्त करणे. म्हणाजेच उपोषण करुन प्राणत्याग करणे. साधकाच्या ह्या व्रताच्या स्मरणार्थ येथे अशा प्रकारची एक शिळा कोरलेली आहे.
ह्यात दोन चौकटी असून वरच्या चौकटीत भगवान महावीर आहेत तर खालचे चौकटीत जैन साधक अन्नपाण्याचा त्याग करुन व्रताचे पालन करताना दाखवला आहे. साधकाचे खालचे बाजूस पूर्णपणे खराब झालेला असा अतिशय अस्पष्टसा शिलालेख आहे.
१८. वीरगळ (डावीकडे) आणि चौमुखी(उजवीकडे)
१९. चौमुखी (जवळून)
२०. ह्याचबरोबर मंदिराचे मागचे बाजूसही अनेक भग्न मूर्ती ओळीने मांडून ठेवल्या आहेत.
इथल्या मंदिरांना सभामंडप दिसत नाहीत. ती जागा येथे मुखमंडपांनी व्य्यापली आहे. ह्या संकुलातील तिन्ही मंदिरे जवळपास सारखीच आहे. नक्षीदार स्तंभ, प्रवेशद्वाराची चौकट, द्वारपट्टिकेवरील जैन तीर्थकर, देवतांच्या मूर्ती. आणि सर्वच गाभार्यांमध्ये आज मूर्ती नाहीत.
२१. मंदिराचा दर्शनी भाग
२२. द्वारपट्टीकेवरील भगवान पार्श्वनाथांची मूर्ती. मस्तकाभोवतीचा नाग हा धरणेंद्र यक्ष आहे.
२३. गाभार्यात दगडी पीठासन आहे मात्र रिकामेच
दुसरे मध्यभागातील मंदिर सर्वात मोठे आहे. ह्यात सभामंडपही असून द्वारपट्टीकेवर पार्श्वनाथांची आणि जैन देवतांच्या मूर्ती आहेत. सभामंडपात एका भिंतीत सेऊणचंद्र (तृतीय) ह्याचा भलामोठा शिलालेख असून तिथेच जवळाच सरस्वतीचीदेखील मूर्ती आहे.
२४. द्वारपट्टीका
२५. सभामंडप
२६. सभामंडपाचे कमळाच्या आकृतीसारखे नक्षीदार छत
सेऊणचंद्राचा शिलालेख
मंदिराच्या सभामंडपातील एका भिंतीत सेऊणचंद्र (तिसरा) ह्याचा शिलालेख आता आपण पाहूयात.
शिलालेखाची सुरुवात
ओ पंच परमेष्ठिभ्यो नमः | स्वस्ति श्री शक संवत १०६३ दुदुंभिनाम संवत्सरांतग्गत ज्येष्ठ सुदि पंचदश्यां सोमे अनु
राधानक्षत्रे सिद्धियोगे अस्यां संवत्सरमासप़षदिवसपूर्व्वायां तिथौ समाधिगताशेषपंचशब्द....
अशी होऊन शेवट
...श्रीकोलेश्वरपण्डितसुतेन दुष्टगणकगजकंठीरवेण साधुगणकचरणावृंद मकरंदलुब्धषट्पदेन श्री दिवाकरपण्डितेन हट्टशासनं सै शैलपट्टे लिखिटमितिं...मंगल महाश्री|
अशी होते.
शिलालेखाची सुरुवात "ओ पंच परमेष्ठिभ्यो नमः" म्हणजे अर्हत, सिद्ध, आचार्य, उपाध्याय आणि साधू ह्या पाच परमश्रेष्ठींना वंदन करुन होते.
ह्या शिलालेखात सेऊणचंद्र आणि त्याचा अमात्य पाणुमडऊरी यांची प्रशस्ती गायली असून शके १०६३ साली ह्या दोघांनी विचारविनिमय करून दोन हाटगृहे (दुकाने) श्री चंद्रप्रभ स्वामी (८वे जैन तीर्थंकर) ह्यांचे मंदिरासाठी करमुक्त करुन दान केली. लाहड साधुम वत्सराज साधू व दशरथ सांधू यांनी पण श्री चंद्रप्रभ तीर्थंकर व य्थील एक शिवालयास दान केले (चंद्रप्रभाय देवाय कंदर्पदहनाय च) व हे शासन कोलेश्वर पंडिताचा पुत्र दिवाकर पंडित ह्याने एका शिळेच्या पट्टावर अंंकित केले.
ह्या सेऊणचंद्राचा उल्लेख हेमाद्रीचे राजप्रशस्तीत किंवा यादवांचे मुख्य शाखेच्या इतर कुठल्याही शिलालेखांतील अथवा ताम्रपटातील वंशावळीतील नाही. मात्र त्याचवेळी हा सेऊणचंद्र स्वतःला ह्या शिलालेखाद्वारे द्वारावतीपुरपरमेश्वर, विष्णुवंशोद्भव, यादवकुलकमलिका, विकासभास्कर, यादवनारायण अशी बिरुदे धारण करतो. ह्याचाच अर्थ तो मूळ यादवांपासून विभक्त होऊन अंजनेरीत स्थलांतरीत झालेल्या यादवांच्या एका शाखेपैकी असावा.
२७. सेऊणचंद्र (तृतीय ) ह्याचा हा शिलालेख
इथले तिसरे मंदिर जवळपास निम्मेअधिक जमिनीत गाडले गेले आहे. रचना किंचित वेगळी आहे.
२८. संकुलातील तिसरे मंदिर
२९. संकुलातील पडझड
३०. संकुलातील पडझड
संकुलातून बाहेर आल्यावर समोरील बाजूस असेच एक नागर शैलीतील लहानसे मंदिर आहे. शैली आधीच्या मंदिरांसारखीच
३१. अजून एक भग्न मंदिर
३२. नागर शैलीतील जैन मंदिर दर्शनी भाग (पाठीमागे अंजनेरी नवरा सुळका)
ह्यांनंतर येतात ती एकाशेजारी एक असणारी हिंदू मंदिरे. ही वैष्णव मंदिरे असून ही जैन मंदिरांनंतर (साधारण बारावे शतक) बांधली गेली असावीत. ह्यांचीसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात पडझड झालेली आहे.
३३. पडझड झालेले मंदिर
हे मंदिर भूमिज शैलीतील आहे. मंदिराच्या पार्श्वभागी वर वर चढत जाणारे मजले अगदी स्पष्टपणे दिसतात.
३४. भूमिज शैलीतील शिखर
मंदिराच्या बाह्यभिंतींवर त्रिविक्रम विष्णू (वामनावतार), विदारण नरसिंह आणि पूर्णरुपातील विष्णू अशा प्रतिमा कोरलेल्या आहेत.
३५. त्रिविक्रम विष्णू
३६. विदारण नरसिंह
३७. विदारण नरसिंहाचीच अजून एक मूर्ती
३८. विष्णू
द्वारपट्टीकेवर लक्ष्मी अधिष्ठित असून गाभार्यातही पूर्वी भिंतींवर असलेल्या नृसिंहाचीच मूर्ती सध्या आणून ठेवलेली दिसते.
३९. द्वारपट्टीका
४०. प्रवेशद्वारावरील चौकट व गाभार्यातील पीठासनाचे खालचे बाजूस असलेला गरुड
ह्याचे शेजारचे मंदिर जवळपास संपूर्ण भग्न झालेले असून द्वारचौकटींशिवाय काहीही शिल्लक नाही.
४१. पूर्ण भग्नावस्थेतील शेजारचे मंदिर
४२. शिल्लक राहिलेली द्वारचौकट. मध्यभागी लक्ष्मी अआणि शेजारी गणेश
४३. भग्न मंदिर
४४. भग्नावस्थेतील मंदिर व त्याशेजारील अंजनेरी नवरा सुळका
अंजनेरीसारख्या इतक्या लहान खेडेगावात इतके भग्न सौंदर्य असेल असे वाटले नव्हते.
वेळेअभावी फक्त इतकीच मंदिरे पाहता आली इतर मंदिरे थोड्याश्या आतल्या भागात आहेत नाईलाजाने ती न पाहताच निघावे लागले. मात्र ती पुढच्या खेपेस पाहिली जातीलच ह्याची खात्री आहे.
* सेऊणचंद्र तृतीय ह्याचे विषयीची माहिती व शिलालेखातील वाचन याकरिता डॉ. ब्रह्मानंद देशपांडे लिखित 'देवगिरीचे यादव' ह्या पुस्तकातून संदर्भ घेतलेले आहेत.
हे मंदिर भूमिज शैलीतील आहे. मंदिराच्या पार्श्वभागी वर वर चढत जाणारे मजले अगदी स्पष्टपणे दिसतात.
३४. भूमिज शैलीतील शिखर
मंदिराच्या बाह्यभिंतींवर त्रिविक्रम विष्णू (वामनावतार), विदारण नरसिंह आणि पूर्णरुपातील विष्णू अशा प्रतिमा कोरलेल्या आहेत.
३५. त्रिविक्रम विष्णू
३६. विदारण नरसिंह
३७. विदारण नरसिंहाचीच अजून एक मूर्ती
३८. विष्णू
द्वारपट्टीकेवर लक्ष्मी अधिष्ठित असून गाभार्यातही पूर्वी भिंतींवर असलेल्या नृसिंहाचीच मूर्ती सध्या आणून ठेवलेली दिसते.
३९. द्वारपट्टीका
४०. प्रवेशद्वारावरील चौकट व गाभार्यातील पीठासनाचे खालचे बाजूस असलेला गरुड
ह्याचे शेजारचे मंदिर जवळपास संपूर्ण भग्न झालेले असून द्वारचौकटींशिवाय काहीही शिल्लक नाही.
४१. पूर्ण भग्नावस्थेतील शेजारचे मंदिर
वाचने
21859
वाचनखूण
प्रतिक्रिया
64
क्या बात है वल्ली साहेब
नेहमीप्रमाणेच 'वल्लीशैली'तील
_/|\_ _/|\_ _/|\_
In reply to _/|\_ _/|\_ _/|\_ by सुहास झेले
+११११११
In reply to _/|\_ _/|\_ _/|\_ by सुहास झेले
अगदी हेच बोलतो रे सुझे
In reply to अगदी हेच बोलतो रे सुझे by किसन शिंदे
आणि या +११११११ देणार्याला
छान माहिती दिली आहे आणि
In reply to छान माहिती दिली आहे आणि by पॉइंट ब्लँक
हो.
In reply to हो. by प्रचेतस
तारेचे कुंपण घालण्यापलीकडे
In reply to हो. by प्रचेतस
हम्म. थोडं निराशाजनक आहे कारण
In reply to हम्म. थोडं निराशाजनक आहे कारण by पॉइंट ब्लँक
+१
In reply to +१ by पैसा
ह्या माहितीबद्दल धन्यवाद :)
सुरेख माहिती आणि मस्त फोटो...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- चला राया घेउन चला मला राया... ;)मस्त
मस्त माहीती, एकदा जायला हवे
"रवंळरनाथ जोगी"
In reply to "रवंळरनाथ जोगी" by सतीश कुडतरकर
कोकणच्या रवळनाथाचा इकडील
In reply to कोकणच्या रवळनाथाचा इकडील by प्रचेतस
पोथी/पुराण या ग्रामदैवताना
अप्रतिम माहिती पुन्हा एकदा ..
अप्रतिम माहिती. विशेषतः तो
In reply to अप्रतिम माहिती. विशेषतः तो by बॅटमॅन
एकदा गेलेच पाहिजे!
In reply to एकदा गेलेच पाहिजे! by नाखु
+७८६
वा...सुंदर
व्वा वल्लीशेठ वा.
वाह
In reply to वाह by सस्नेह
शिलालेखाची सुरुवात, अंत आणि
In reply to शिलालेखाची सुरुवात, अंत आणि by प्रचेतस
अर्र
व्वाह!
सुंदर माहिती आणि प्रचि... आणि
फोटो नेहेमीप्रमाणेचं मस्तं.
शिलालेख कोरणार्याचं अक्षर
जबरदस्त !
सुंदर
एक एकए फोटो पहात पहात इतका
मस्त! खल्लास फोटो.
अप्रतिम!
वा! छायाचित्रकारांसाठी
In reply to वा! छायाचित्रकारांसाठी by एस
अगदी.
शिखरांच्या भूमिज आणि नागर या
In reply to शिखरांच्या भूमिज आणि नागर या by अन्या दातार
भूमी म्हणजे मजला.
In reply to भूमी म्हणजे मजला. by प्रचेतस
वा! उपयुक्त माहिती.. आता ते
In reply to वा! उपयुक्त माहिती.. आता ते by एस
आमलक इज़ संस्कृत फॉर आवळा.
In reply to आमलक इज़ संस्कृत फॉर आवळा. by बॅटमॅन
येक्झेक्टली.
In reply to येक्झेक्टली. by प्रचेतस
धन्यवाद
In reply to येक्झेक्टली. by प्रचेतस
वा वा...
In reply to वा वा... by योगविवेक
धन्यवाद योगविवेक.
In reply to भूमी म्हणजे मजला. by प्रचेतस
भूमिज शैली.
In reply to भूमिज शैली. by भटकंती अनलिमिटेड
हो. तीच.
In reply to भूमी म्हणजे मजला. by प्रचेतस
दक्षिणेकडची गोपुरं
In reply to दक्षिणेकडची गोपुरं by बोका-ए-आझम
अंजनेरीची मंदिरे वेगवेगळ्या
मस्त वल्ली
मस्त वल्ली
मस्त !
वल्ल्या दंडवत घ रे बाबा __
वा: सागर! संदर्भलेख म्हणून
छान लेख
अंजनेरीच्या मंदिरात मला एक
In reply to अंजनेरीच्या मंदिरात मला एक by भटकंती अनलिमिटेड
सरस्वती आहे ती.
सुंदर आणि माहितीपूर्ण लेख.ः
In reply to सुंदर आणि माहितीपूर्ण लेख.ः by बोका-ए-आझम
हेन्री कझिन्सने सौंदर्यावर
In reply to हेन्री कझिन्सने सौंदर्यावर by प्रचेतस
व्वा! याची फोटोकॉपी बाड होते
सुंदर माहितीपुर्ण लेख.अवशेष
सुंदर छायाचित्रे आणि माहिती ..!
In reply to सुंदर छायाचित्रे आणि माहिती ..! by दत्ता जोशी
उम्म्म..तसं अधून मधून लिहितो