प्रिय पु ल काका
प्रिय पु ल काका ,
लहानपणी ,मला रोज रात्री गोष्टी ऐकत झोपायची सवय होती , मग मी हळू हळू मोठी झाले , गोष्ट ऐकायची सवय मात्र कायम राहिली , पण तो जादू करणारा आवाज आता बदलला होता , तो होता तुमचा … पुलकीत आवाज . माणूस लिखाणानी आणि आपल्या आवाजांनी कायम अमर आणि चिरंजीवी राहू शकतो हे तुम्हीच दाखवून दिले . आयुष्यात असे किती पण अवघड, उदास प्रसंग आले , आणि असे वाटले कि आज तरी काय झोप लागणार नाही आणि वाचायचा मूड पण नाहीये तर तुमचे कोणतही कथाकथन किंवा एकपात्री निवडावे आणि ऐकावे , मन प्रसन्न होते , आणि माणूस नावाच्या प्राण्यात पुन्हा एकदा प्रेमात पडते .
मिसळपाव