मात
" दिन्या पटकन सांग रे जेम्स बाँडचा लेखक कोण ? " शब्दकोडं सोडवता सोडवता कमलेशनं मागं वळून न पाहता विचारलं.
" मलाही नांव आठवत नाहीये रे ! पण एकच मिनिट, जय गूगल बाबा, घे इयान फ्लेमिंग " दिनेशनं मांडीवरच्या लॅपटॉपला डिवचलं.
" दिन्या लेका , कधीतरी डोकं चालव रे, उठसूठ गूगल काय ? " कमलेश वैतागून म्हणाला, या शब्दकोड्याचं वेड असलेल्या माणसांचं असंच असतं, स्व:तला उत्तर येत नसेल तर एकवेळ दुसर्याला विचारतील, पण गूगल करू , कुठे पुस्तकात पाहू म्हटलं की चिडतात ते.
" कशाला डोकं चालवायचं ?
मिसळपाव