Skip to main content

लवंगी काव्यचोर

लेखक खटासि खट यांनी मंगळवार, 10/11/2015 21:06 या दिवशी प्रकाशित केले.
काव्यचोर ======== वृत्त : चौर्यकर्म चाल : बिघडलेली सदर कविता चोरीला जाऊ नये या उद्देशाने लिहीलेली असल्याने तीत आशय पाहण्याचे करू नये. नवीन वाहनचालक वाहन चोरीला गेल्यावर ज्याप्रमाने काळजी घेईल तशीच ही कविता समजावी. सज्जन आनि सभ्य वाचकांना दिवाळीच्या हार्दीक शुभेच्छा !
काव्यरस

किल्ला

लेखक भीमराव यांनी मंगळवार, 10/11/2015 12:26 या दिवशी प्रकाशित केले.
सर्वांन्न दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा, दिवाळीच्या मुहुर्तावर आमचा पहिलावहीला लेख.कृपया चुकलं माकलं सांगा. दिवाळीमधे किल्ला बनवन्याची प्रथा नेमकी कधी सुरु झाली हे माहीत नाही, परंतु किल्ला हा प्रत्येक लहान मुलाची कल्पना शक्ती फुलवनारा नक्कीच आहे, दिवाळीची सुट्टी ही नवे कपडे, चिवडा, लाडु, फटाकडे या सर्वांपेक्षा या किल्ल्यामुळेच अधिक हवीहवी वाटायची. परीक्षा कधी संपतेय न कधी किल्ला बनवायला लागतोय असच होऊन जायचं. दिवाळीच्या आधीच बरेच दिवस साहित्याची जुळवाजुळव सुरु व्हायची.

बापट काका

लेखक अज्ञात यांनी मंगळवार, 10/11/2015 11:56 या दिवशी प्रकाशित केले.
बापट काका आमच्या आक्षीच्या घराच्या पुढेच ५मिनिटावर एक शंकराचं मंदिर होतं, घरालाच जोडलेलं असं आणि घरातच पुढचा भाग दुकानात 'एडजस्ट' केलेला... म्हणजे बघा घर-मंदिर-दूकान... हे सगळं एकाच वास्तुत, कमाले नई! इंदुताइंच दूकान म्हणून प्रसिद्ध होतं ते, असो... त्याच वास्तू समोर एक वाडी होती, बहुतेक सर्वांची घरं रस्त्याच्या जवळ होती, पण त्या वाडीतलं घर जरा रस्त्यापेक्षा लांब, आणि जुने ही नव्हते... म्हणजे ८०सालात वगैरे बांधलेले...

बाला

लेखक चांदणे संदीप यांनी सोमवार, 09/11/2015 21:25 या दिवशी प्रकाशित केले.
एका रणरणत्या दुपारी काळ्या रंगाचे कपडे घालून (जे की त्या रंगाचे उन्हात वापरू नयेत!) एक मुलगी रस्त्यावरून जाताना पाहिली आणि फक्त तिच्या त्या काळ्या कपड्यांच्या निवडीला पाहून ही पहिली कविता स्फुरली! अर्थात त्यात इतरही काही गोष्टींचा अंतर्भाव हा ओघाने आलाच!
काव्यरस

तिथली दिवाळी.....

लेखक शिव कन्या यांनी सोमवार, 09/11/2015 19:18 या दिवशी प्रकाशित केले.
तिथली दिवाळी..... तीरकामठा रंगीत कागद चिखलमाती अर्धा किल्ला.... शिवाजीच्या मावळ्यांहाती, परत फराळ ठेवशील का? पहाट झोपेत हळूच उठवून घमघमणारी आंघोळ घालून, फुलबाजांची हजार फुले परत हातात ठेवशील का? रांगोळीतील हुकले ठिपके रेषांमधील नाजूक वळणे, तुळशीमाईचे लगीन लटके परत दणक्यात लावशील का? किणकिण बांगड्या काचेच्या घिरघीर झालरी पोरींच्या! सुरसूर बत्त्या, चुटक्या टिकल्या परत उडवण्या येशील का? तिथली दिवाळी धमाल मजा इथली दिवाळी शांत सजा!! आठवणींचे व्याकुळ दिवे परत घरी पोचतील का?

रसमाधुरी

लेखक सानिकास्वप्निल यांनी सोमवार, 09/11/2015 16:50 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकरांनो !! तुम्हा सर्वांना दिपावलीच्या अनेक-अनेक शुभेच्छा!!

अजंठा लेणी सहल माहिती हवी आहे

लेखक फिलोकॅलिस्ट यांनी सोमवार, 09/11/2015 16:32 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, मला अजंठा लेणी बघायला जायचं आहे पण तिथे राहण्याची-जेवणाची काय सोय आहे याची माहिती नाही, तरी त्याबद्दल काही माहिती दिलीत तर खूप मदत होईल. तसेच अजून कोणती ठिकाणं बघता येतील. धन्यवाद...

वरंधा घाटातले मनुष्यस्पर्श नसलेले बॅक वॉटर

लेखक नितीनचंद्र यांनी सोमवार, 09/11/2015 14:59 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्रात निसर्ग भरभरुन आहे. याची कल्पना जबाबदार सत्ताधारी किंवा महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ कधी घेईल तो दिवस तमाम जनतेचा सोन्याचा दिवस. मध्यंतरी एक आकडेवारी जमाकरुन मी चकीत झालो. अवघ्या २० वर्षात अनेक पर्यटन विषयक प्रकल्प राबवुन केरळ राज्याने त्यांच्या राज्यातील तरुण परराज्यात जाणे थांबवले आहे. केरळ मधील आयुर्वेदीक उपचार पर्यटन असो की बॅक वॉटरवर आधारीत पर्यटन असो.

वॅली ऑफ फ्लॉवर्स : २ : बंद घाटातुन गोविंदघाटापर्यंत

लेखक आकाश खोत यांनी सोमवार, 09/11/2015 14:44 या दिवशी प्रकाशित केले.
मागील लेखात सांगितल्याप्रमाणे माझी पुणे दिल्ली ट्रेन रद्द झाली आणि मला मुंबई ते दिल्ली विमानाचे तिकीट काढणे भाग पडले. त्यामुळे माझ्या प्रवासाची सुरुवात पुणे ते मुंबई ट्रेनने झाली. बाहेर मस्त पावसाळी वातावरण होते. ट्रेन जेव्हा लोणावळ्या खंडाळ्याजवळुन जात होती, तेव्हा खूपच छान दृश्य दिसत होते. हिरवेगार डोंगर, धबधबे, तळी असे सर्व पाहताना छान उत्साह येत होता. डोंगरदऱ्या, काही ओळखु येणारे किल्ले पाहुन वाटत होते आत्ता इथेच उतरून ट्रेकला जावे. मुंबईला पोहचुन विमान पकडले, दिल्लीला गेलो. दिल्लीला सगळे भेटलो, मग हरिद्वारची ट्रेन पकडली. हरिद्वारपर्यंत संध्याकाळी पोहोचलो. आधीच अंधार पडलेला होता.

हमारी... अधुरी...... नव्वदोत्तरी..............................

लेखक मारवा यांनी सोमवार, 09/11/2015 14:21 या दिवशी प्रकाशित केले.
समुहगान आमचा कळप, आमचा झुंड ,आमचा गण अन आमचीच शिरगणती. अगणीत आम्ही तुझी गणना नाही कशात, तु नाहीच आमच्या खिजगणती. आमचा झेंडा , आमचाच अजेंडा, आमची चळवळ आमची तळमळ,अन आमचीच मळमळ. आमची कुलीन घराणी, आमच्या बांधलेल्या बंदिशी, अन आमच्याच तालावर नाचणारे ताल. आमच्याच समेवर आमचेच आदिम अभेद्य अविनाशी आवर्तन सहनाववतु ! सहनौभुनक्तु ! सहवीर्यम करवावहै ! आमच्या नाजुक भावना, आमच्या घाऊक संवेदना, अन आमच्याच भावुक संघटना. साथी हाथ बढाना एक अकेला थक जाये तो..... ..वा वा वा वा वा वा रे वा चल अकेला चल अकेला चल अकेला................
काव्यरस