Skip to main content

गोठान (वर्‍हाडी) (मराठी भाषा दिन २०१६)

लेखक ऊध्दव गावंडे यांनी शुक्रवार, 26/02/2016 07:59 या दिवशी प्रकाशित केले.
माया गावाचं गोठानं हाये किती शानदारं मोठ्ठं झाळं पिपयाचं त्याची सावली भर्दारं माया गावाचं गोठानं थंड हवेचं ठिकानं ढोरं, मान्सं उनायातं झोपं घेतातं सुखानं माया गावाचं गोठानं हौदं भरला पान्यानं ढोरं, वासरं पेतातं पानी मोकाट मनानं माया गावाचं गोठानं काई लोकाचं मायेरं ऊभा दिवसं तथीसा सारे हायेतं तयारं उनं चित्याले कोनाचं नाई दुसरं ठिकानं मनं मोकयं पनानं माया गावाचं गोठानं खोळ्या कर्याले कोनाच्या नाई दुसरं ठिकानं चिट्या चिकोर्या कर्याले माया गावाचं गोठानं तंटे भांडन कर्याले नाई दुसरं ठिकानं मायं बहिनं काळ्याले माया गावाचं गोठानं माया गावाचं गोठान आक्क्या बनलं मोकाटं सज्जनाईले ते आता नाई टोचू

खेळे (मालवणी) (मराठी भाषा दिन २०१६)

लेखक नूतन सावंत यांनी शुक्रवार, 26/02/2016 07:45 या दिवशी प्रकाशित केले.
खेळे कणकवलेच्या बाजाराक जावच्यासाटी वाडीतसून फुडे हायवेक मेळणाऱ्या कच्च्या रस्त्याच्या तिठ्यावर गावकरी झादाबुडी बसची वाट बघीत हुबे होते. मोहन नि बाबल, मोहन्याच्या कोऱ्या मोटरसायकलीवरून फेरे मारीत होते.भावबंदांच्या झगड्यात एका घराची दोन घरा झाली नि एकत्र वाढलेले चुलतभाव वेगवेगळ्या घरात ऱ्हवाक लागले.मोहन बाबलपेक्षा दोन वरसान व्हडलो.त्याचो बाबल्यावर लय जीव. दोघांच्या आवशीच काय पण बापाशींमधूनय विस्तू जात नसायचो. हे दोघय त्या भांडणापासून लांब,वाडीपासून लांब भेटून गजाली,गमती करीत.घरी समाजला की शिव्या खात.पण पैले पाढे पंचावन्न.

क्रिकेट शौकीन ग्राहकाचा ग्राहक न्यायालयातील षटकार !

लेखक पुणे मुंग्रापं यांनी शुक्रवार, 26/02/2016 07:01 या दिवशी प्रकाशित केले.
कसोटी सामन्यात फलंदाजाने एखादा टोलेजंग षटकार लगावल्यावर प्रेक्षक उत्स्फुर्तपणे टाळ्या वाजवून त्यांचे कौतुक करतात. पण एखादा क्रिकेट शौकीन चक्क ग्राहक न्यायालयात जाऊन षटकार ठोकतो त्यावेळी आपण सर्व ग्राहकांनीही त्याचं असंच भरघोस कौतुक करायला हवं.  त्याचं असं झालं, दिल्लीच्या फिरोजशाह कोटला मैदानावर ३१ जानेवारी २००२ रोजी भारत वि. ऑस्ट्रेलिया असा एक दिवसाचा क्रिकेट सामना होणार होता. हरसिमरनसिंग संधू हा क्रिकेटचा जबरदस्त शौकीन! त्यामुळे त्याने लांबच लांब रांगेत उभं राहून प्रत्येकी दोन हजार रुपयांची चार तिकिटे स्वतः व आपले तीन मित्र यांच्यासाठी खरेदी केली.

समान संधीच महत्व

लेखक माहितगार यांनी शुक्रवार, 26/02/2016 00:29 या दिवशी प्रकाशित केले.
जेव्हा एखाद्या बाबतीत/ठिकाणी समान संधीच तत्व पाळल जात नाही तेव्हा सहसा जे संधी पासून मुकले ज्यांना संधी नाकारली गेली त्यांचाच विचार आपण सहसा करतो, समान संधीच्या तत्वाकडे दुर्लक्ष करणार्‍यांना खरेतर त्यांचे अथवा त्यांच्या संस्थेचे जे काही उद्दीष्ट आहे त्या उद्दीष्टाचीच संधी नाकारली जाती आहे हे लक्षात येत नसते, कदाचित कामास सर्वोत्कृष्ट न्याय देऊ शकणार्‍या व्यक्तिपासून नकळत तुमच्या उद्दीष्टाची संधी गेली असू शकते -शेवटी नुकसान कशाचे तुमच्याच उद्दीष्टाचे.

भारतीय राष्ट्रवाद, जे एन यु, भारतविरोधी घोषणा आणि देशद्रोह (भाग ५)

लेखक Anand More यांनी शुक्रवार, 26/02/2016 00:20 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ | भाग २ | भाग ३ |भाग ४ ----------------------------- कोणी देश अखंड रहावा म्हणून झटत होते. तर कोणी आपले संस्थान टिकावे म्हणून. कोणी स्वार्थाने अंध झाले होते तर कोणी परमार्थाने धुंद झाले होते. कोणी हक्क टिकवून ठेवण्याची पराकाष्ठा करत होते तर कोणी कर्तव्यपूर्तीसाठी झटत होते.

तपोवन / झुरळे / प्रभु धावुनी आले

लेखक मदनबाण यांनी शुक्रवार, 26/02/2016 00:06 या दिवशी प्रकाशित केले.
माझी संभाजीनगर {औरंगाबाद} - जालना दौरा काही कारणामुळे बदलुन नव्या दिवशी ठरवावा लागला होता. माझ्या तिर्थरुपांनीच सर्व आरक्षण केले होते, व परत नविन तारखे नुसार येण्या-जाण्याचे आरक्षण त्यांनीच केले. आत्ताच घरी परतलो आहे आणि आज मला अनुभवता आलेला आणि तो कायअप्पावर मिपाकर मंडळी बरोबर लाईव्ह शेअर केला त्या बद्धल हा धागा आहे. प्रवास सुरु झाला तसे मी कायअप्पावर जसे जमेल तसे त्या त्या वेळीचे अपडेट्स टाकत होतो, आज {२५-०२-२०१६} परतीच्या प्रवासात तसे करण्याचा काही विचार नव्हता.

ते... (तेवीस वर्षांपूर्वी!) भाग-२

लेखक सटक यांनी गुरुवार, 25/02/2016 21:57 या दिवशी प्रकाशित केले.
देगल्याच्या बापाला काळी विद्या वश होती! जारण-मारण, मूठ-करणी, वशीकरण, भानामती, स्मशानविद्या...सगळे येत होते त्याला. हाताशी चार दोन पिशाच्चेही होती. सतत तांबारलेल्या डोळ्यानी आणि दारूचा दर्प असणार्‍या तोंडानी वावरणारा देगल्याचा बाप बगलुआईचा भक्त होता. जागल्याच्या ताब्यात अख्खे रुसाळे होते! रुसाळे गाव तसे सधन! गावाचे नाव रुसाळे कसे पडले ह्याचीही एक गंमत होती, गावची देवी येजाई म्हसोबावर रुसून दूर एका तळ्यापाशी जाऊन राहिल्याची आख्यायिका होती. रूसलेल्या देवीचा गाव म्हणून हे रूसाळे! देवीच्या तळ्याला सगळे जाईची कोंड म्हणत. तिथे येजाईचे मंदिर होते.

मुद्देसूदपणे आणि सबळ पुराव्यांसह आपली बाजू कशी मांडावी ?

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी गुरुवार, 25/02/2016 21:34 या दिवशी प्रकाशित केले.
स्मृती इराणींचे संसदेतले कालचे भाषण यूट्यूबवर पाहिले. ते खाली पाहता येईल... हे इथे टाकण्यामागे दोन उद्देश आहेत... १. या भाषणातून सध्या गरमागरम चर्चा चालू असलेल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, हैदराबादमधील विद्यापीठ आणि मध्यवर्ती सरकारच्या अखत्यारीत येणार्‍या इतर सर्व विद्यापीठांसंबंधी अनेक सत्य गोष्टी (ऐकीव किंवा राजकीय हेतूने रंगवलेली चित्रे नाही) सबळ पुराव्यांसह माहीत होतील. २.

वॅली ऑफ फ्लॉवर्स : ८ : बद्रीनाथ आणि हरिद्वार

लेखक आकाश खोत यांनी गुरुवार, 25/02/2016 20:44 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ | भाग २ | भाग ३ | भाग ४ | भाग ५ | भाग ६ | भाग ७ मागच्या पोस्टमध्ये मी बद्रीनाथ आणि जवळचे भारतीय सीमेवरचे अंतिम गाव माना येथे जाऊन आल्याचे वर्णन केले आहे.

कथा ( भाग ४ )

लेखक अँन्ड्रोमेडा यांनी गुरुवार, 25/02/2016 20:03 या दिवशी प्रकाशित केले.
"अहो सर कशाला विषाची परीक्षा घ्यायला निघाला आहात तुम्ही ? आणि बाकी फक्त तुम्ही तुमच्यापुरता निर्णय घेत असता तर माझा काही अधिकारही नव्हता तुम्हाला विरोध करायचा पण तुम्ही इतक्या मुलांना सोबत घेऊन जायचं म्हणत आहात मी कशी परवानगी देऊ ? आणि ज्यांना घेऊन जाणार आहात त्या मुलांच्या पालकांची परवानगी नको का ? आणि एकदा का त्यांना समजलं की मुलांना कुठे घेऊन जायचं म्हणत आहात तर शाळेवरची कौलच काय पण आपल्या डोक्यावरचे केसही शिल्लक राहणार नाहीत . " " ते का सर ? " " अहो इतके जोडे पडल्यानंतर केस राहतील का ? " " ते नाही सर मी म्हणतोय ते लोक अस का करतील ?