Skip to main content

मनावरील ते शूर्प ओरखडे १ : (ईस्टेटीची परात)

लेखक माहितगार यांनी शुक्रवार, 26/02/2016 20:14 या दिवशी प्रकाशित केले.
आज सकाळीच भारतीय स्त्रीचे सुवर्ण प्रेम ! हा लेख लिहिण्याचा योग आला, भारतीय स्त्रीच्या या आकर्षणा मागे पुर्वार्जीत मालमत्तेत स्त्रीयांना सहसा वाटा मिळत नसे -आता कायदा बदलला आहे- त्यामुळे कदाचित जिवन लढ्याच्या स्पर्धेतून येणारा पण ज्या संपत्तीवर तुमचा तांत्रिक-नैतिक दृष्ट्या अधिकार असणे अभिप्रेत नाही तिचा मोह करणारी स्त्री कुठे दृष्टीस पडली की स्त्री आदर्श असते टाईप मनात तयार झालेल्या प्रतिमांना तडे जाऊन मनावर क्वचित शूर्प ओरखडे उमटतात.

मी सुखाची भेट घेणे टाळतो ..

लेखक drsunilahirrao यांनी शुक्रवार, 26/02/2016 19:36 या दिवशी प्रकाशित केले.
वेळ दु:खाला दिलेली पाळतो मी सुखाची भेट घेणे टाळतो फारसे घडले नसावे कालही मी उगाचच रात सारी चाळतो ही फुलांची वाट आहे पण इथे ऱोज एखादातरी ठेचाळतो कोणते असते हवेमध्ये जहर रंग प्रेमाचा कसा डागाळतो केवढी जडशीळ दुनिया वाटते देव जाणे कोण ही सांभाळतो चालला असता तुझा साधेपणा मी कुठे रंगारुपावर भाळतो डॉ. सुनील अहिरराव
काव्यरस

वॅली ऑफ फ्लॉवर्स : ९ : माहिती आणि समाप्त

लेखक आकाश खोत यांनी शुक्रवार, 26/02/2016 17:41 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ | भाग २ | भाग ३ | भाग ४ | भाग ५ | भाग ६ | भाग ७ | भाग ८ वॅली ऑफ फ्लॉवर्सची आमची ट्रिप खूपच छान आणि संस्मरणीय झाली

महेश कोठारे कि एकता कपूर??

लेखक खालीमुंडी पाताळधुंडी यांनी शुक्रवार, 26/02/2016 16:07 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्ते, मराठी चित्रपटसृष्टीतील एक मोठं नाव म्हणजे महेश कोठारे.अभिनेता+निर्माता+दिग्दर्शक अशा तिन्ही आघाड्यांवर कार्यरत राहून स्वतःच मोठं अस्तित्व निर्माण केलय. त्यांचे ते पाचअक्षरी धमाल चित्रपट अजूनही पहावेसे वाटतात. पण हल्ली त्यांना नेमकं काय झालय तेच कळेना! झी मराठीवर जय मल्हार ही त्यांचीच देण.त्यामध्ये कथानकाची पार वाट लावून टाकली आहे,आणि नारदाचं आख्यान महिना झालं तरी संपेना.इतकच नव्हे तर त्यांना अजून एक अचाट कल्पना सुचली,कलर्स मराठीवर "गणपती बाप्पा मोरया" म्हणून गणपतीची सिरियल चालू केली आहे,त्यामध्येसुद्धा कथानकाची पार वाट लावून टाकली आहे.हेवेदावे काय?टोमणे काय?वाद काय?

सायकलीशी जडले नाते १५: औंढा नागनाथकडे चौथे शतक

लेखक मार्गी यांनी शुक्रवार, 26/02/2016 13:54 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व मान्यवरांना नमस्कार. सायकल नव्याने शिकताना आणि सायकलीशी मैत्री करताना आलेले सोलो सायकलिंगचे गमतीदार अनुभव शेअर करत आहे. सायकलिंगचे वेगवेगळे टप्पे, सायकल चालवताना केलेला वेडेपणा आणि चित्रविचित्र अनुभव इथे लिहित आहे. त्यातून मिळालेला आनंद सर्वांसोबत वाटून घ्यावा, ही इच्छा. धन्यवाद.

बालपण

लेखक मीनादि यांनी शुक्रवार, 26/02/2016 12:25 या दिवशी प्रकाशित केले.
रम्य ते बालपण , रम्य ते सोहळे रम्य तो काळ अन दिवस ते कोवळे नवी भरारी नव आकाश अज्ञानाचे डोह अन मोहाचे पाश सावरावे किती अन कसे जीवाला, लागते ओढ ही किती मनाला. वास्तवाची झळ नसे पुसटशी. इवलाश्या त्या बालमनाला अखंड असावे हे दिवस निरंतर, प्रत्येकाच्या नशिबाला
काव्यरस

काही परकीय अमराठी भाषेतील शब्द आणिक त्याचा मराठी अर्थ

लेखक मूखदूर्बळ यांनी शुक्रवार, 26/02/2016 11:32 या दिवशी प्रकाशित केले.
खर तर सदर विषय हा लेखनाचा स्वतन्त्र विषय होऊ शकतो का ? हा खरोखरच सन्शोधनाचा विषय आहे. मला खर तर ह्या विषयाचा स्वतन्त्र ध्हगाच काढायचा होता पण ते जमल नाही त्यामुळे हा लेखन प्रपन्च. माझ्या अमराठी भाषान्च्या कुतुहला पोटी म्हणा किन्वा नको तीथे लुडबूड करण्याच्या खोडीमूळे म्हणा (कॉलेज शब्द किड्यान्मूळे) मी काही अमराठी शब्द आत्मसात करण्याचा प्रयत्न केला. माझ्या पर्देशातील काही काळाच्या वास्तव्यामधे मला काही अमराठी आणिक काही परकीय भाशीकान्शी सन्वाद साधण्याची सन्धी मिळाली.

बार्बारोसा अर्थात रशियन आघाडीवरचे युद्ध... भाग - ३

लेखक जयंत कुलकर्णी यांनी शुक्रवार, 26/02/2016 11:02 या दिवशी प्रकाशित केले.
बार्बारोसा अर्थात रशियन आघाडीवरचे युद्ध... भाग - १ बार्बारोसा अर्थात रशियन आघाडीवरचे युद्ध... भाग - २ Simple, Free Image and File Hosting at MediaFire .......स्टॅलिन कधीच त्याच्या भाषणासाठी प्रसिद्ध नव्हता पण प्रसंगच असा होता की रशियन त्या साध्यासुध्या शब्दांनी पेटून उठली.

मराठमोळे पॉकेट सँडविच

लेखक पूर्वाविवेक यांनी शुक्रवार, 26/02/2016 10:31 या दिवशी प्रकाशित केले.
नाव जरी विदेशी असलं तरी साहित्य आणि कृती एकदम देशी. या विदेशी पदार्थाला भारतीय मसाल्यांची जोड देवून जास्त रुचकर बनवण्याचा प्रयत्न केला आहे. फक्त दिसायला विदेशी. तर झाल असं की मला पिटा पॉकेट सँडविच खूप आवडतं. पण तो पिटा ब्रेड आमच्याकडे मिळत नाही. मग विचार केला टम्म फुगणारी, पापुत्रा सोडणारी आपली भाकरी आणि पिटात काय फरक आहे. हिवाळ्यात पौष्टिक म्हणून ज्वारी-बाजरी खायची पद्धत आमच्याकडे आहे. कोवळा ताजा पालक आणि ग्रीन लेट्युस मध्ये चवीत फारसा फरक मला जाणवत नाही. आणि हे आहे भाकरी पॉकेट सँडविच………चला हव तर भरलेली भाकरी म्हणा. आपली शेतकरी मंडळी भाकरीवर झुणका, कांदा घेऊन हातावरच खातात की.

भारतीय स्त्रीचे सुवर्ण प्रेम !

लेखक माहितगार यांनी शुक्रवार, 26/02/2016 10:09 या दिवशी प्रकाशित केले.
वस्तुतः मानवजातीला सोने जड जवाहीर्‍यांसारख्या चकाकत्या वस्तुंच्या आकर्षणाचे रहस्य मानववंशास्त्राला अद्यापी पुर्णतया उलगडले नसावे. बाकी जगातल्या लोकांना सोन्याचे वेड नसतेच असे नाही पण त्यात संपत्ती प्रेम अधिक आहे, भारतीयांच्या सुवर्ण प्रेमाचे स्वरुप आभूषण प्रेमाचे असावे.