महिला बसमधील पुरुष कंडक्टर - अर्थात, जंबिया मधातला!
लेखकशिव कन्यायांनी शनिवार, 31/10/2015 12:36 या दिवशी प्रकाशित केले.
मंदमंद पावडरी, लाडिकलाडिक लिपष्टिका
छंदीफंदी अत्तरं, हलक्याहलक्या टवाळ्या
तिन्ही ऋतू सातही वार, सगळ्या ड्युटया मारतो,
एकपण खाडा करत नाही,
महिला बसची ड्युटी मी कधी चुकवत नाही!
नाजुकनाजुक पर्सा, मखमली पिशव्या
झुळझुळीत साड्या, झिरझिरीत ओढण्या
त्यांच्या रुमालातली नाजुक चिल्लर
मी कधी मोजत नाही,
महिला बसची ड्युटी मी कधी चुकवत नाही!
गरोदर बाईला, ऐंशीच्या म्हातारीला
शाळकरी पोरीला, कॉलेजच्या ताईला
सगळ्यांना जागा मिळते, फुल्ल्ल असली बस तरी
मी ष्टॉपला कट मारत नाही,
महिला बसची ड्युटी मी कधी चुकवत नाही!
सगळ्या मला दादा म्हणतात,
मीही सगळ्यांना ताईच म्हणतो,
पण पाचव्या शीटच्या, अबोलीच्या गजर्याला
मी तिकीट कधी विचारीत नाही,
महिला बसची ड्युटी मी कधी चुकवत नाही!
प्रतिक्रिया
;)
असा कंडक्टर तुमच्या पहाण्यात
चांगली ड्युटी आहे
:)
आवडली!
तुमच्या त्या बसप्रवासाची आठवण
In reply to आवडली! by पैसा
झणझणीत शेवटामुळे नीट समजली
कसे का असेना.... आवडली तर!
In reply to झणझणीत शेवटामुळे नीट समजली by जव्हेरगंज
छान आहे
मापे काढत बसला असेल
In reply to छान आहे by तिमा
आम्च्या एका मिपाकर
In reply to छान आहे by तिमा
आमच्या एका मित्राची इच्छा
In reply to आम्च्या एका मिपाकर by टवाळ कार्टा
सहिय
छंदीफंदी अत्तरं
छान..छान..
=))
In reply to छान..छान.. by प्रभाकर पेठकर
मज़्ज़ा मज़्ज़ा आली वाचताना!