Skip to main content

पुण्यात...

लेखक जव्हेरगंज यांनी रविवार, 28/02/2016 20:09 या दिवशी प्रकाशित केले.
पुण्यात शनिवारवाड्यासमोर जो पुल आहे ना तिथे खुप गर्दी असते, गोंगाट असतो डुप्लिकेट पीनांचे चार्जर तिथे मिळतात ते अगदीच टाकाऊ असतात मला तो भाग आवडत नाही स्वारगेटला तुडुंब भरलेल्या पीएमटी बघितल्यावर मला भोवळ येते चिंचवडला प्रशस्त महामार्गावरील हॉटेलात पावाबरोबर फरसाण्याची भाजी खाल्ल्यावर मला अशीच भोवळ आली होती तेव्हापासून मिसळपाव हा पदार्थ मी व्यर्ज केलाय बाकरवड्या खाल्ल्यावर नेहमी पोट दुखते मग तीही मी कधी खात नाही दगडूशेटला जाता जाता जोशी वडेवाल्याकडे मी ढुंकुनही कधी पाहत नाही येरवड्याला एकदा बाईक पलटी झाली होती मग तिकडे मी कधी गेलोच नाही कोथरुडला जायचा मात्र प्रसंगच कधी आलाच नाही रॅडीसनमध्य

तू

लेखक आनंदमयी यांनी रविवार, 28/02/2016 19:50 या दिवशी प्रकाशित केले.
तू मेघ सावळासा घनदाट गर्द ओला तू चांदवा निशेच्या केसात माळलेला तू सूर बासरीचा दूरात गुंजणारा पहिल्याच पावसाच्या तू स्वैर धुंद धारा तू साद अंतरीची देहा सुखावणारी तू शीत शांत छाया ह्या पेटत्या दुपारी तू गंध रंगलेला दारातल्या कळीचा तू नाद गुंजणाऱ्या ह्या सोनसाखळीचा रे मी समूर्त आज सजले तुझ्याचसठी हळुवार लाघवी हे हासू तुझेच ओठी हा गंध चंदनाचा पुरता तुझ्या हवाली विरहार्त आसवेही सगळी तुझीच झाली मी एकली धरेशी तू स्तब्ध ध्रूव दूर तुजवीण मी तुझ्यात विणते सशब्द सूर जग हे जरी न माने असणे तुझे सख्या रे देहात ह्या वसे जो, तो प्राणही तुझा रे © अदिती जोशी
काव्यरस

किचन मॅनेजमेंट कसे करता/करावे ?

लेखक माहितगार यांनी रविवार, 28/02/2016 16:31 या दिवशी प्रकाशित केले.
हा धागा लेख तसा केवळ अनाहितांसाठी मर्यादीत ठेवलेला नाही. या आठवड्या भरात 'कौटुंबीक टिमवर्क आणि नवर्‍यांचे जोखीम व्यवस्थापन' असा काहीसा कडबोळे विषय चर्चेस टाकण्याचा मानस आहे :). पण तत्पुर्वी किचन मॅनेजमेंट ! , म्हणजे कसे आहे ज्या घरी किचनची जबाबदारी पुरुषांची असते तेथेही बहुधा किचन रचना आणि व्यवस्थापनाचा अंतीम निर्णय घरातील स्त्रीकडेच असण्याची शक्यता अधिक (घरजावयांना किचन व्यवस्थापनात किती से मिळतो माहित नाही ;) असो). आणि बरे स्त्रियांचा से का असु नये ?

वीरगळांच्या शोधात

लेखक प्रचेतस यांनी रविवार, 28/02/2016 16:04 या दिवशी प्रकाशित केले.
a २००२ सालचा साधारण मार्चचा महिना. आता नक्की आठवत नाही, पण तेव्हा नासिकवरुन रतनगडला निघालो होतो. घोटीनंतर एक घाट चढून कळसूबाईच्या पायथ्याचं गाव बारी गाठलं. तिथून शेंडी. शेंडी हे भंडारदरा धरणालगतचं गाव. तिथून रतनवाडी साधारण २० किमी. २००२ साली हा भाग फारच दुर्गम होता. वाहतुकीची साधनं अत्यल्प होती, रस्ताही खूप खराब आणि बराचसा कच्चा होता. शेंडीवरुन तेव्हा जवळपास पाऊण तास लागला होता रतनवाडीला पोहोचायला. वाडीच्या सुरुवातीलाच अमृतेश्वर मंदिर.

कुण्या देशीचे पाखरू

लेखक शरद यांनी रविवार, 28/02/2016 15:32 या दिवशी प्रकाशित केले.
कुण्या देशीचे पाखरू तारुण्यात पदार्पण करतांना युवतीच्या मनांत एक नवी हुरहुर सुरू होते. शालेय मैत्रीणींच्या सोबतीतले रम्य दिवस आता थोडे मागे जात असतात. नवीन काय मिळणार आहे, आपला शोध काय ? याचाही पुरता अंदाज आलेला नसतो. नवीन मित्र जोडलेले नसतात. पण त्यांच्याबद्दल, प्रेम.... नाही प्रेम म्हणता येणार नाही, ओढ म्हणावी कां ? तसच काही तरी म्हणा पाहिजे तर. " जायेंगे कहॉ सुझता नही ! चल पडे मगर रास्ता नही ! क्या तलाश है, कुछ पता नही !! अशा विभ्रमावस्थेतली अस्फुट मनोवस्था कवी सुधीर मोघे यांनी पुढील कवितेत अतिशय तरल, हळुवार शब्दात पकडली आहे.

|| बिर्याणीस्तोत्रम् ||

लेखक बॅटमॅन यांनी रविवार, 28/02/2016 14:16 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार लोकहो, मराठी दिन आणि बोलीभाषा सप्ताहादि सुंदर उपक्रमांच्या पार्श्वभूमीवर हे संस्कृतचे शेपूट जरा विचित्र वाटण्याची शक्यता आहे. पण पुच्छवक्रतान्यायास मिपाकर समजून घेतीलशी आशा आहे.

शृंगार ५

लेखक अनाहूत यांनी रविवार, 28/02/2016 12:26 या दिवशी प्रकाशित केले.
एका नाजुक विषयावर लिहिण्याचा हा प्रयत्न आहे . शक्यतो उघडपणे न बोलला जाणारा पण सर्वांच्या जिव्हाळ्याचा . आपण आपल्याला याबद्दल वाटणाऱ्या भावना फारशा व्यक्तही करु शकत नाही .व्यक्त करू शकत नाही ते अनोळखी लोकांमधे पण ओळखीच्या [ limited ] लोकांमधील सर्वात आवडता विषय . या विषयावर लिखाण तस विपूल आहे पण अशा मंचावर लिखाण करताना बराच विचार करावा लागला . या विषयावर लिहिण्यामधील महत्त्वाची समस्या म्हणजे लोकांची range . एका बाजूला हे फारच सपक किंवा बेचव वाटू शकत तर दुसरीकडे अगदीच उथळ सवंग किंवा बिभत्स वाटू शकत . म्हणून एका मध्यम मार्गाने जाण्याचा हा प्रयत्न .

जोश्यांचा कमळां आणि भावड्या मालवणकरांची तेतेबाय

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी रविवार, 28/02/2016 11:10 या दिवशी प्रकाशित केले.
"काय झालां तेतेबाय?" "अगो! काय सांगतलंय कमळ्या? हेनी माकां खूपच वैताग आणलोसा.रोजचो उच्छाद. भांडाक काय तरी तेंका निमित्त लागता झालां." "भावडो आता म्हातारो झालो.लहान पोरा सारखो भांडतां कित्या? मोठ्ठ्या मोठ्ठ्यान सकाळी तुमच्या घरातून आवाज येय होते." "कमळ्या,अगो ऐक तर खरां, काल गुंडू जोश्यांचा बायजा आपल्या घोवांक घेओन आमच्याकडे इला.

सारे मिळूनी खाऊ

लेखक Dinesh Satpute यांनी रविवार, 28/02/2016 08:32 या दिवशी प्रकाशित केले.
बिल्डिंग च्या गेटमधून बाहेर पडताना आमच्या सोसायटीचा गार्ड तिवारीनं मला आवाज देत सलाम ठोकला. हाडकुळया तिवारीला पाहून याच्या कोणत्या गुणाकडे पाहून याला नोकरीस घेतला असेल हा प्रश्न मला नेहेमी पडतो. साहेब मी असं ऐकलं कि तुमच्या ड्रायबाल्कनी चा प्रोब्लेम अजून तसाच आहे,पुन्हा पाहू का प्रयत्न करून. मी म्हटलं, होतं कधी कधी चोक अप. ठीक आहे , कर पुन्हा एकदा प्रयत्न असं मी म्हणताच...साहेब ,चला तुम्ही पुढे , मी आलोच असं म्हणून तिवारीनं आपल्या सामानाची शोधा शोध सुरु केली. बायकोला तिवारी काय म्हणाला हे सांगताच.