माझा हात अलगद सोडवून
तू जायला निघतेस
उन्हं डोक्यावर येतात
सावल्या ...
फेर धरून गोळा होतात
माझ्याभोवती !
वेशीपाशी तू थबकतेस
मनमोर नाचायला लागतो
"सावली मागेच राहिली रे"
तू कसंबसं हसून सांगतेस
सावलीचा हात धरून
पुन्हा चालायला लागतेस
तिच्या पदराचा शेव...
माझ्या छातीपाशी अडकलेला
तू तशीच....
नेटाने चालत राहतेस
कशाचं कौतुक करू ?
तिच्या ओढीचं ...
किं...
तुझ्या नेटाचं .... ?
विशाल
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3436
प्रतिक्रिया
18
मिसळपाव
प्रतिक्रिया
_/\_
_/\_
__/\__
__/\__
वा! तरल!!!!
वा! तरल!!!!
कौतुक सगळ्याचंच. सुंदर.
कौतुक सगळ्याचंच.
सुंदर.
गूढ वाटते मला. खूप वेळा
गूढ वाटते मला. खूप वेळा वाचूनही पूर्ण कळली असं वाटत नाहीये. पण भाव छान उतरला आहे कवितेत. :)
ती आणि तिची सावली असं प्रकरण आहे ते
In reply to गूढ वाटते मला. खूप वेळा by रातराणी
मला पण नव्ह्ती झेपली पहिल्यांदा वाचुन.
गुढ उकलुन दाखवल्याने रसभंग होत असेल तर कृपया संमंने माझा प्रतिसाद उडवुन टाकावा. आणि अजुन काही दुसराच अर्थ निघत असेल तर विशालदांनी तो उलघडुन दाखवावा ही विनंती.
ओह म्हणजे सावली त्याच्यात
In reply to ती आणि तिची सावली असं प्रकरण आहे ते by इडली डोसा
ओह म्हणजे सावली त्याच्यात गुंतलीय आणि ती लांब चाललीये असं आहे का? मस्त !
ओह ..नितांत सुंदर
पहिल्या वाचनात कळलीचं नाही ...पुन्हा वाचल्यावर गुढ उकललं.
अवांतरः तुम्हाला सगळं असं मिस्टेरिअरचं आवडतं का? स्पर्धेतला फोटो पण तसाचं आहे तळ्याचा.
फारच छान!
फारच छान!
सुंदर!
सुंदर! आवडली!
सगळ्यांचे मनःपूर्वक आभार !
सगळ्यांचे मनःपूर्वक आभार !
मिस्टेरियस असं काही नाहीये त्यात. सावली हे गतकाळातील आठवणींचे, त्यांच्या पडछायांचे , गुंतलेल्या भावनांचे प्रतिक मानले जाते. ती सोडून तर चाललीय खरे, पण त्याच्यात गुंतलेल्या तिच्या भावना, त्या सगळ्या गतकाळातील जुन्या आठवणी अजुनही त्याच्याभोवतीच रेंगाळताहेत. देहाने ती दूर जातेय पण मन अजुन तिथेच घुटमळतेय....
सुरेख. आता अर्थ लागतोय. फारच
In reply to सगळ्यांचे मनःपूर्वक आभार ! by विशाल कुलकर्णी
सुरेख. आता अर्थ लागतोय. फारच सुंदर.
वा! आता अजून आवडली!
In reply to सगळ्यांचे मनःपूर्वक आभार ! by विशाल कुलकर्णी
वा! आता अजून आवडली!
छान !
छान !
कशाचं कौतुक करू ?
कशाचं कौतुक करू ?
तिच्या ओढीचं ...
किं...
तुझ्या नेटाचं .... ?
-------------------
दंडवत .... _/\_
धन्यवाद दोस्लोग्स _/\_
धन्यवाद दोस्लोग्स _/\_
कोण कुलकर्णी का?
कोण कुलकर्णी का?
आले का राजकुमार परतोनी ?
In reply to कोण कुलकर्णी का? by परिकथेतील राजकुमार
आले का राजकुमार परतोनी ?