Skip to main content

Elementary, my dear Watson!

लेखक केडी यांनी मंगळवार, 23/02/2016 16:46 या दिवशी प्रकाशित केले.
शेरलॉक होल्म्स साठी जरी काही गोष्टी इतक्या elementary असायच्या तरीही माझ्या आयुष्यात मात्र "elementary exam" हि काही इतकी elementary गोष्ट न्हवती. त्या काळी, म्हणजे अस्मादिक जेंव्हा आठवीत होते, तेव्हा आमच्या पालकांना कोणी सांगितला कोणास ठाऊक, कि बुवा elementary आणि Intermediate ह्या २ चित्रकला परीक्षा पास झाल्या कि दाहावीच्या परीक्षेत अर्धा का एक टक्का बोनस मिळतो म्हणे! तसेही, आमची अभ्यासातली एकंदर गती बघता ,आमची drawing च्या क्लास ला रवानगी न झाली तरच नवल! आणि त्या काळी, मी हे करणार नाही, किंवा मला जमणार नाही असे ऐकून घेणारे समजूतदार पालक जन्माला यायचे होते.

आम्हाला इंग्लिश येतंय

लेखक वेल्लाभट यांनी मंगळवार, 23/02/2016 12:59 या दिवशी प्रकाशित केले.
ब्लॉग दुवा हा मराठी, इंग्रजी, भाषेबद्दलचं प्रेम, इंग्रजीत वाटणारा उच्चभ्रूपणा, मराठी बोलण्यातला न्यूनगंड, हे आणि संबंधित सगळे विषय काही नवीन नव्हेत. पण कधी जुने होणारेही नव्हेत. मराठी भाषा सप्ताह सुरू आहे.

बार्बारोसा अर्थात रशियन आघाडीवरचे युद्ध... भाग - २

लेखक जयंत कुलकर्णी यांनी मंगळवार, 23/02/2016 09:00 या दिवशी प्रकाशित केले.
बार्बारोसा अर्थात रशियन आघाडीवरचे युद्ध... भाग - १ .....या सर्व कारणाने जर्मनीने ऑपरेशन बार्बारोसा आखले आणि अमलात आणले.... Simple, Free Image and File Hosting at MediaFire जाता जाता या मोहिमेचे नाव हिटलरने बार्बारोसा का ठेवले हे पाहणे मनोरंजक ठरेल. बार्बारोसा या जर्मन शब्दाचा अर्थ होतो लाल दाढीचा किंवा लाल केसांचा (रानटी ?) माणूस.

ते...

लेखक सटक यांनी मंगळवार, 23/02/2016 03:14 या दिवशी प्रकाशित केले.
शेवटी तो गावी पोचला होता. बरोब्बर २३ वर्षांनी. त्याच्या मनातला ध्यास आता पूर्णत्वाकडे जाण्याची चिन्हे त्याला स्पष्ट दिसू लागली होती. तेरा वर्षात अफ्रिकेच्या जंगलातून त्याने जी विद्या घासून पुसून आणली तिच्या वापराने त्याचा सूड पूर्ण होणार होता. लहान चणीचा तो तरूण आपल्याच विचारात हरवून वेशीपर्यंत पोहोचला. त्याच्या लहानपणी चांगली धडधाकट असणारी वेस आता मोडकळीला आली होती. पण अजून होती. वाटेतल्या बर्‍याच गावातल्या वेशींसारखी पार पुसली गेली नव्हती. त्याने शांतपणे जवळच्या थैलीतून राख काढली आणि वेस बांधून घेतली. मग त्या राखेचे दोन फटकारे दोन दिशांना मारून तो तेथून निघाला. अजून बरेच अंतर कापायचे होते.

गोजल

लेखक अद्द्या यांनी सोमवार, 22/02/2016 22:22 या दिवशी प्रकाशित केले.
ज्या कोणा राक्षसाने "अलार्म" हा प्रकार तयार केला न. देव करो आणि दर १५ मिनिटाने अलार्म वाजात राहो त्याच्या कानात. आणि सुट्टीच्या दिवशी कशाला वाजतो हा मूर्खपणा. रविवारचा दिवस आणि ६ वाजता उठणे म्हणजे पाप आहे पाप. पण नाही, हा वाजलाच . म्हणजे मला काही फरक पडत नाही , मला ऐकूही येत नाही. माझ्या खोलीत (माझ्या उश्याशी म्हणू )वाजत असलेला अलार्म ऐकून वरच्या खोलीतून आई / बाबा / बहिण कोणी तरी येउन ते बंद करतं आणि मला उठवतं. पण चूक त्यांची नाही . अलार्म वाजलाच नाही तर ते येणारच नाही माझी झोपमोड करायला. आता तुम्ही म्हणाल कि "अरे मुर्ख माणसा , लावतोच कशाला अलार्म ? " लोकहो, तोच तर प्रोब्लेम अहे.

पांढरा दिवस

लेखक सुरवंट यांनी सोमवार, 22/02/2016 21:00 या दिवशी प्रकाशित केले.
बशीतून चहा पिताना फार बरे वाटते हातात घेतलेल्या कपाला मग बाजूला ठेवावे लागते नाष्ट्याला पोहे असल्यास तोंडाला पाणी सुटते चटणीवर दही घेऊन मग लोणचं खाऊ वाटते बुट घालून झाल्यावर गाडीला किक बसते कितीही हॉर्न वाजवला तरी एखादी कार मध्येच घुसते दिवस डोक्यावर येतो सुर्यनारायणाची भट्टी तापते वेगळ्या अँगल मधून पाहिल्यास दुपारची काशी होते घरी आल्यावर मला माझी कविता म्हणते मालक बशी फुटली, तसं कपातून चहा पितानाही फार बरे वाटते
काव्यरस

संपादकीय! - स्वाती दिनेश - मधुरा देशपांडे

लेखक स्वाती दिनेश यांनी सोमवार, 22/02/2016 20:48 या दिवशी प्रकाशित केले.
sampadakiy body { background-image: url("https://lh3.googleusercontent.com/-4IV7c0ur4aU/VtIMF96j2AI/AAAAAAAAATs/xqn2GqLx4B8/s200-Ic42/BhatkantiBgPatrn.png"); background-repeat: repeat; } .inwrap { border: 0.5em solid transparent; -webkit-border-image: url("https://lh3.googleusercontent.com/-_wyGcMw9TLs/VtMIiDZ_UDI/AAAAAAAAAYI/pkuBjbfWrnc/s512-Ic42/Border.png") 10 round; /* Safari 3.1-5 */ -o-border-image: url("https://lh3.googleu

गणू शाळेतून हरवतो. (मराठी भाषा दिन २०१६) (पुणे जिल्ह्यातील ग्रामीण बोली)

लेखक बबन ताम्बे यांनी सोमवार, 22/02/2016 18:01 या दिवशी प्रकाशित केले.
संध्याकाळचे सहा वाजून गेले तरी गणूचा घरी पत्ता नव्हता. शाळा सुटून एक तास झाला होता. गणूच्या आईने तायडीला विचारले तुला त्याने काय सांगीतले का तर ती "नाय" म्हणाली. जसजसा वेळ जाऊ लागला तसतशी गणूच्या आईला काळजी वाटायला लागली. ती आणि तायडी गणूची दारातच वाट बघत उभी राहीली. गणूची आई बराच वेळ दारात चिंताग्रस्त चेह-याने उभी असल्याचे पाहुन शेजारपाजारच्या बायकां विचारपूस करायला आल्या. तायडीने त्यांना सांगीतले की शाळा सुटून दीड तास झालाय पण गणू अजून घरी आला नाही. गणूच्या आईचा आता धीर सुटू लागला. तिला नाही नाही त्या शंका येऊ लागल्या.

श्रावणसर

लेखक रातराणी यांनी सोमवार, 22/02/2016 18:00 या दिवशी प्रकाशित केले.
मिटल्या डोळ्यांत माझ्या स्वप्न तुझे जागते घे मिठीत गुंफुन सख्या ही रात्र आहे सरते कसा संपेल अबोला मी शब्द जोगवा मागते तुझ्यापाशी सख्या का माझे हे वैभव हरते हुरहूर ही असे मनी तरी का शांत शांत वाटते तप्त धरेवर जशी अचानक श्रावणसर कोसळते उमजले ना नाते तरीही जन्मांची ओळख पटते तळहाताची रेषा माझी तुझ्या हाती का उमटते
काव्यरस

मावशी... मीनल मावशी

लेखक अज्ञात यांनी सोमवार, 22/02/2016 17:08 या दिवशी प्रकाशित केले.
आईची बालमैत्रीण... पूर्ण नाव मीनल कवळे. लग्ना आधीचं मीनल राउत. मुळची आक्षीची... आई आणि ती खुप धमाल करायचे म्हणे, कबड्डी चैंप होती म्हणे! नेशनल लेवल पर्यन्त मजल!... आई आणि मावशी आणि ग्रुप सायकल चालवायचे आक्षिच्या अरुंद रास्त्यांवरून आणि मी त्यांना बघुन घराच्या फाटकावर रडरड रडायचो... हा सीन अगदी नीट आठवतो मला, एकूणच सॉलिड मैत्री! लकीली लग्न होऊन मावशी बोरिवलीत आली... आम्ही ही बोरिवलीतच राहायचो, शाळेच्या ५मिनट अंतरावर मावशी आणि १५मिंटावर आमचं, त्यामुळे शाळा झाली की आई मावशी कडून मला घ्यायला यायची... आई माझ्या 'प्रगती'पुस्तकावर खुश नसायची म्हणून माझी शिकवणी मावशी कड़े...