गाव दत्तक देणे आहे !!
फार जुन्या काळा पासून दत्तक घेणे हा प्रकार आहे. राजे, सरदार किंवा अन्य तत्सम मंडळी ज्यांना मुलबाळ नाही किंवा मुलगा नाही(वंश किंवा गादी पुढे चालवन्यासाठी) ऎसे लोक दत्तक पुत्र घेत. त्याचा सांभाळ करत. पुढे जावून हेच दत्तकपुत्र मालक किंवा राजा होत...
सध्याच्या युगात मात्र एक नविन फैशन आली आहे ती म्हणजे गाव दत्तक घेण्याची, आणि ती हिंदी चित्रपट सृष्टीत जरा जास्तच आहे..
एखादा चित्रपट येणार असेल तर त्याला नजरेसमोर ठेवून गाव दत्तक घेतले, श्रमदान केले ऎसे इवेंट केले जातात आणि मीडिया ही त्याला भरपूर प्रसिद्धि देतो. चला चांगले आहे, की लोक अजूनही समाजकार्य करत आहेत.
मिसळपाव