Skip to main content

दृष्टीकोन

लेखक ज्योति अळवणी यांनी रविवार, 18/09/2016 21:02 या दिवशी प्रकाशित केले.
आयुष्य सोपं असत.. तुझ्यासाठी अवघड का करू? मला नाही बदलायच; तुझ्याकडून अपेक्षा का ठेऊ? तो तसा... ही अशी... तक्रारीचा सुर नको... आपल मत आपल्यापाशी... त्याची कुठे चर्चा नको! सर्वांचच् आयुष्य सुंदर असत... प्रत्येकजण आपल्यापुरत जगत असत; एकमेकांशिवाय अडत नसत.. म्हणूनच.. अध्यात-मध्यात पडायच नसत!!!
काव्यरस

विद्युत उपकरणे

लेखक उपयोजक यांनी रविवार, 18/09/2016 19:50 या दिवशी प्रकाशित केले.
'विद्युत उपकरणे' या विषयावर व्हॉटस्अप समुह सुरु करायचा आहे. एसी आणि डीसी विद्युत उपकरणांची रचना, कार्य, वापर, त्यांची देखभाल,दुरुस्ती, त्यांना लागणारी सॉफ्टवेअर्स, उपकरणांची खरेदी, वीजबचत,इ - कचरा,त्यांची योग्य ती विल्हेवाट याबद्दल माहितीची देवाणघेवाण,चर्चा, शंका,मार्गदर्शन, तसेच बाजारात आलेली नवीन विद्युत उपकरणे, त्यांची वैशिष्ट्ये,या विषयावरची पुस्तके,नियतकालिके,लेख याबद्दल येथे बोलता येईल. त्याचबरोबर अभियांत्रिकी तसेच विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना शिवाय या विषयाचा छंद असणार्यांना विद्युतविषयक शंका तसेच प्रोजेक्टस् बनवताना येणार्या विद्युतविषयक समस्या,शंका याबद्दलही येथे विचारता

खेलन आयो रे...ब्रजराज कुंवर...अबीर-गुलाल उडावत, गात-वसंतराव देशपांडे

लेखक महामाया यांनी रविवार, 18/09/2016 19:38 या दिवशी प्रकाशित केले.
‘ख्याल गायन का प्रस्तुतीकरण’ या विषयावर इथे बिलासपुर ला वसंतराव देशपांडे यांचे शिष्य पं. प्रभाकरराव देशकरांनी कार्यशाळा घेतली होती...त्या निमित्ताने त्यांच्या भेटीचा योग आला...धागा एकच-वसंतराव देशपांडे...कार्यशाळे नंतर मी पंडित देशकरांना सविस्तर पत्र लिहिलं होतं...हेच ते पत्र- रा.रा. प्रभाकर रावांना माझा स.न. त्या दिवशी कार्यक्रमानंतर मी खरंच आनंदून गेलो होतो. एकाच दिवशी यमन, अल्हैया बिलावल, मुल्तानी, मधुवंती, शंकरा...ऐकायला मिळणं...सगळंच कसं कल्पनातीत होतं. काफी मधील टप्प्याच्या चार ओळी (हा टप्पा मी मालिनी राजुरकरांचा ऐकलाय, इथल्या कार्यक्रमांत त्यांनी म्हटला होता.

का एवढे धप्पा धापा पोलिसांच्या मागे लागलेत लोक ?

लेखक वाल्मिक यांनी रविवार, 18/09/2016 17:55 या दिवशी प्रकाशित केले.
मला 2013 चा जानेवारी महिना आठवतो ,निर्भया प्रकरण आणि मेणबत्ती नुकतेच झाले होते ,कोणतेही वर्तमान पात्र उघड फक्त बलात्कार बातम्या ,जणू भारतात लोक दुसरे काही काम करतच नाहीत आता पण सध्या गणपतीभर पोलिसांना मारणेच चालू आहे ,ते पण दर वेळी नवीन MO आता माझा प्रश्न 2012 ला जेव्हा रजा अकॅडेमिच्या वेळी गर्भवती पोलीस कॉन्स्टेबल महिलाना मारहाण झाली ,हाच मीडिया आणि हेच पक्ष का गॅप होते ? मी राज ठाकरे यांचा पाठीराखा नाहीये पण फक्त त्यांनहीच आवाज उठवला होता सौजन्य सप्ताह पळून पण लोक पोलिसांबद्दल अढी बाळगून आहेत ,पण अचानक एवढा उद्रेक कसा ?

पुस्तकपरिचय: 'भय इथले...' - आतिवास सविता.

लेखक एस यांनी रविवार, 18/09/2016 15:13 या दिवशी प्रकाशित केले.
‘भय इथले... तालिबानी सावट : प्रत्यक्ष अनुभव’ लेखिका – आतिवास सविता. आतिवास यांच्या या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर नजर जाताच वाचकाला आतील शब्दानुभवांमध्ये भरलेल्या ताणाचे दडपण जाणवायला सुरूवात होते, इतके हे मुखपृष्ठ भेदक झाले आहे. आणि याचे श्रेय अर्थातच ‘रविमुकुल’ यांना आहे. एका भिंतीवर गोळीबाराच्या असंख्य खुणा आणि शेजारी एक बंद खिडकी. सेपिया रंगसंगतीवर खरवडल्यासारखं शुभ्र रंगातील शीर्षक. जणू भीतीचं सावट पुसण्याचा, जिवंत राहण्याच्या अनिवार ओढीतून केला गेलेला आकांत.

... असंही होतं ना कधी कधी....

लेखक शिव कन्या यांनी शनिवार, 17/09/2016 10:32 या दिवशी प्रकाशित केले.
... असंही होतं ना कधी कधी.... अंगणातलं सुखाचं बी बहरातली पाखरांची गाणी हरवून जातात कुठंकुठं.... पण मनाचा सर्च कायम असतो दिसलं जरी एखादं पातं हिरवंगार मनातलं मांजर हसतंच कि मजेदार! ... असंही होतं ना कधी कधी.... बियांना कोंब येईपर्यंत आपलाच नसतो पेशन्स ! दु:खाच्या माजणार्या ताणावर आपलाच नसतो कंट्रोल! वैफल्याने सगळंच उकरून फेकून देतो, पण तशा वैराण रानातही एखादे रानफुल हसून बोलतंच कि एखादा निळा पक्षी गिरक्या घेतोच कि! ...

पण नाही होत ना असं!

लेखक रातराणी यांनी शुक्रवार, 16/09/2016 22:54 या दिवशी प्रकाशित केले.
पण नाही होत ना असं! आपण म्हणावं, अंगणात जरा सुखाचं बी टाकून बघू, फुलांच्या बहरात पाखरांची गाणी ऐकू, मऊ गवतावर पडून राहू, डोळे मिटून. पण नाही होत ना असं, जमिनीतच होतं अदृश्य सगळं सुख कुठेतरी एखाद्या बीला येतो कोंब पण तोवर दुःखाचं तण माजलेलं असतं मग आपणच खुरपणी करून नकळत काढून टाकतो तो कोंब न जाणो हेही असेल तणच! आपण म्हणावं, देण्यासारखं आहे काय?