Skip to main content

तुलपा - हादरवून टाकणारा योगिक अनुभव

लेखक साहना यांनी शनिवार, 31/12/2016 05:33 या दिवशी प्रकाशित केले.
मागील काही महिन्या पासून आमच्या नास्तिक ग्रुप चा अभ्यास योगी, ध्यान इत्यादी विषयावर सुरु आहे. मला विशेष रस नसला तरी स्लेन्डरमन मर्डर्स ह्या विषयावर अभ्यास करणाऱ्या एका महिलेशी ओळख झाली आणि त्यानंतर काही दिवसांनी एक तिबेटियन लामाशी भेट झाली. तिबेटियन लामाने मला तुलपा विषयी माहिती दिली आणि तुलपा ह्याचा सीलेंडरमॅन शी काही संबंध असावा असे समजून मी तुलपा चा अभ्यास सुरु केला. स्लेन्डरमन मर्डरस : जास्त खोलांत जात नाही. अमेरिकेत विविध ठिकाणी आणि विविध काळांत पौंगडावस्थेतील मुली अचानक आपल्या मैत्रिणींचा खून करू लागतात.

पांढरे हत्ती

लेखक आशु जोग यांनी शनिवार, 31/12/2016 00:41 या दिवशी प्रकाशित केले.
पांढरे हत्ती आमच्या देशात शेतीच्या क्षेत्रात अनेक पांढरे हत्ती उभे राहीलेले आहेत. त्यांचा नेमका उपयोग काय हा प्रश्न सामान्य शेतकर्‍याला नेहमी पडतो. या संस्थांना सरकारची आर्थिक मदत मिळते. चतुर्थ श्रेणी कर्मचार्‍यापासून अति उच्च पी. एचडी झालेले अधिकारी मिळतात. त्यांना सरकारकडून भरपूर पगार मिळतो. नोकरीनंतर पेन्शन मिळते. गाड्या बंगले याचाही खर्च सरकार करते. निरनिराळ्या परिसंवादांमधे देश विदेशात हे लोक भाग घेतात.

भारतातल्या दोन क्रांतीकारक आर्थिक कारवाया : एक विश्लेषण

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी शुक्रवार, 30/12/2016 23:50 या दिवशी प्रकाशित केले.
स्वतःचा व पक्षाचा स्वार्थ बाजूला सारून देशाला पुढे नेणारा खंबीरपणा दाखविणे जगभरच्या भल्या भल्या नेत्यांना जमलेले नाही. मात्र, स्वतंत्र भारताच्या सात दशकांच्या इतिहासात हे दोनदा घडले आहे. सन १९९१ मध्ये उदार वित्तव्यवस्थेची पायाभरणी केली गेली तेव्हा आणि सद्य निश्चलनीकरणाच्या कारवाईच्या वेळी. मात्र, या दोन्ही कारवायांत "स्वतःचा व पक्षाचा स्वार्थ बाजूला सारून देशाला पुढे नेणारा खंबीरपणा दाखविणे" हा मूळ मुद्दा असला तरी या दोन कारवायांत जमीन-अस्मानाचा फरक आहे. त्यामुळे, या दोन वेळांच्या परिस्थितीचे तुलनात्मक विश्लेषण करण्याचा मोह झाला आहे.

नोटबंदीचे अभंग

लेखक भारी समर्थ यांनी शुक्रवार, 30/12/2016 20:07 या दिवशी प्रकाशित केले.
एटीयमचिये द्वारी। उभा क्षणभरी। तेणे पाचशेच्या चारी। मिळतीया।। कार्ड चार हाती। स्लॉटमधे घासी। निकडीची रोकड मग। निघतीया।। रांगेत बहु जन। स्वतःचेच धन। घामेजलेले तन। ताटकळ्या।। ब्यांकेतही तेच। होई खेचाखेच। शिव्या कचाकच। निघतीया।। ऐसे शूराभिमानी। न देखिले कोणी। तयांसी देशाभिमानी। म्हणतीया।। एकच दिला धक्का। गुर्जर तो पक्का। 'मित्रों' ऐसी हाक। मारतोया।। सुका म्हणे बास। किती रोखावे श्वास। काय ३१ डिसेंबरास। करतोया??? - भारी समर्थ!

सत्व

लेखक psajid यांनी शुक्रवार, 30/12/2016 15:17 या दिवशी प्रकाशित केले.
सूर्याकडून तांबूस सोनेरी किरणं उसनी घेऊन उल्हासित झालेली पहाट श्री.दिक्षीत यांच्या दारावर हळुवार थाप मारू लागली होती परंतु उशिराच्या जागरणामुळे असेल किंवा रात्रीच्या पार दुसऱ्या प्रहरी लागलेल्या झोप यांमुळे असेल श्री.दिक्षीत तिच्या गोड हाकेला प्रत्युत्तर देत नव्हते. आपल्या सोनेरी रूपावर भाळून स्वागताला येणाऱ्या दिक्षीत यांची तिला अगदी सवयच होऊन गेलेली होती. परंतु आज ते बाहेर येत नाहीसं पाहून तिला अचंबा वाटला. थोडावेळ वाट पाहून थकलेली पहाट मोत्यासारख्या शुभ्ररुपात त्यांच्या दरवाजात अवतरली. अगदीच नाईलाज झाला तसे श्री. दिक्षीतानी दरवाजा उघडला.......

पेन्स

लेखक आकाश खोत यांनी शुक्रवार, 30/12/2016 13:05 या दिवशी प्रकाशित केले.
आज खूप वर्षांनी रेनॉल्ड्सचा पेन लिहायला मिळाला. हा पेन माझ्या लहानपणी फार चालायचा. माझे बाबा तेव्हा हाच पेन वापरायचे आणि सुरुवातीला हा सोडून दुसरा कुठला पेन आम्हाला माहितसुद्धा नव्हता. प्राथमिक शाळेत २-३ वर्षे आम्हाला पेन वापरायला चालत नव्हतं. पेन्सिलच वापरावी लागायची. लहान मुलं चुका खूप करतात, आणि त्यांना त्या खोडून सुधारता याव्यात म्हणुन पेन्सिल वापरावी असं सांगायचे. म्हणजे वहीत आणि परीक्षेच्या उत्तरपत्रिकेत खाडाखोड जास्त दिसणार नाही.

२०१६ आणि सिक्स वर्ड्स स्टोरी

लेखक महासंग्राम यांनी शुक्रवार, 30/12/2016 10:37 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी, बघता बघता २०१६ संपायला फक्त ०२ दिवस उरले आहेत. सरत्या वर्षात बऱ्याच घडामोडी घडल्या आहे ज्या आठवणीत राहतील. माझ्यसाठी म्हणाल अर्नेस्ट हेमिंग्वेची ट्रेंड मध्ये आलेली ' सिक्स वर्ड्स स्टोरी' हि चांगलीच लक्षात राहिली.त्याची हि स्टोरी होती "For sale: baby shoes, never worn," या सिक्स वर्ड्स स्टोरीच्या ट्रेंडने जगात भरपूर धुमाकूळ घातला. नेमक्या सहा शब्दांत व्यक्त होणं जरा कठीणच काम. पण अनेका जण हि कसरत साधत अगदी सहा शब्दांत व्यक्त झाले. तर याच सिक्स वर्ड्स स्टोरी आणि सरत्या वर्षाच्या निमित्ताने तुमचं २०१६ कसं गेलं हे सहा शब्दांत सांगा....

जंटलमन्स गेम - १० - स्टीव्ह बकनरच्या लीला

लेखक स्पार्टाकस यांनी शुक्रवार, 30/12/2016 06:31 या दिवशी प्रकाशित केले.
स्टीव्ह बकनरच्या लीला १९९२ च्या नोव्हेंबर महिना... अझरुद्दीनचा भारतीय संघ दक्षिण आफ्रीकेच्या दौर्‍यावर आला होता. दर्बानची पहिली टेस्ट ड्रॉ झाली होती. या टेस्टमध्ये आपल्या पहिल्याच इनिंग्जमध्ये प्रवीण आमरेने सेंच्युरी ठोकली होती, पण ही टेस्ट सर्वात जास्तं लक्षात राहीली ती एका वेगळ्या कारणाने. टेस्ट क्रिकेटच्या इतिहासात टीव्ही रिप्ले पाहून निर्णय देणार्‍या थर्ड अंपायचा या टेस्टमध्ये सर्वप्रथम वापर करण्यात आला. दक्षिण आफ्रीकेत थर्ड अंपायरच्या निर्णयासाठी आजच्याप्रमाणेच लाल आणि हिरव्या रंगाची लाईट सिस्टीम त्यावेळीही अस्तित्वात होती, परंतु आजच्या बरोबर उलट लाईट्सचा वापर होत असे.