लेखकवृंदा१यांनी मंगळवार, 27/12/2016 23:10 या दिवशी प्रकाशित केले.
आपण सगळेच जाणतो की आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात आपल्या आईवडिलांची भूमिका फार फार महत्वाची असते. आयुष्य चालत राहतं,काळ वाहत राहतो आणि एक दिवस आपल्याला आई किंवा वडिलांचा कायमचा वियोग सहन करावा लागतो.
लेखकआर्या१२३यांनी मंगळवार, 27/12/2016 17:06 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार,
फेब्रुवारीमधे कन्याकुमारी येथे जाणार आहोत. तर सोबत मदुराई, रामेश्वरम ही करावे असा मानस आहे.
बरोबर ज्येष्ठ नागरिक आहेत. लेडीज फक्त. तीर्थाटनाचाच उद्देश आहे. ट्रेन व बसनेच प्रवास करणार आहोत. शक्य झाले तर एका बाजुने विमानप्रवास होउ शकतो.
कुणाला या स्थळांचा म्हणजे मदुराई, रामेश्वरचा काही अनुभव, तसेच राहण्या/खाण्यापिण्याची व्यवस्था, जवळपासची मन्दिरे, कुठ्ला रुट सोपा पडेल इ माहिती असल्यास मार्गदर्शन करावे.
धन्यवाद!
लेखकवन्दना सपकालयांनी मंगळवार, 27/12/2016 16:07 या दिवशी प्रकाशित केले.
बेडसे लेणी म्हणजे खरच कलंदर कलाकारांच्या दुर्दम्य इच्छाशक्तीचा रसरशीत अविष्कार. अतिशय सुंदर आणि रेखीव लेणी बघुन मनाला खुप छान वाटत।
पुणे- मुंबई महामार्गावरील कामशेतहून पवना धरणाकडे बेडसे हे छोटे गाव लागते. नेहमीच्या सहलींच्या वर्दळीपासून दूर एकांतात पहूडलेलं हे बौध्दकालीन लेणं कामशेतपासून जवळच ८-१० कि.मी. अंतरावर आहे. कामशेत रेल्वे स्टेशनपासून पुणे-मुंबई रस्त्यावर आल्यावर एस.टी. किंवा खाजगी वाहनाने पवनानगर(काळे कॉलनी) येथे जाणार्या रस्त्याने राऊतवाडी येथे उतरावे.
डोंगराच्या मध्यावर असलेली बेडसे लेणी लक्ष वेधून घेतात. अत्यंत शांत सुरम्य निवांत असं हे ठिकाण.
लेखकरानवेडा सचिनयांनी मंगळवार, 27/12/2016 14:16 या दिवशी प्रकाशित केले.
दरवर्षी बुद्धपोर्णिमेदरम्यान वनविभागातर्फे घेतली जाणारी वन्यजीवगणना वन्यजीव प्रेमींसाठी पर्वणीचं असते. वर्षभर वन्यजीवप्रेमी ह्या गणनेची आतुरतेने वाट पाहत असतात. मी देखील त्याला अपवाद नाही. ह्या गणनेमुळे वन्यजीव प्रेमींना खरया अर्थाने जंगल जवळुन बघायला व अनुभवायला मिळते.
ह्या वर्षी 15 मे ते 22 मे दरम्यान वन्यजीव गणनेसाठी स्वयंसेवक म्हणुन मी व माझा मित्र इम्रान मलिक राधानगरी वन्यजीव अभयारण्यात गेलो होतो. कोल्हापुर जिल्ह्यातील पश्चिम घाटाच्या डोंगररांगांमधे राधानगरी अभयारण्य वसलेलं आहे. राधानगरी अभयारण्य म्हणजे जणु जैवविविधतेचा खजिनाच आहे.
लेखकश्रीरंग_जोशीयांनी मंगळवार, 27/12/2016 09:58 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी,
माननीय पंतप्रधानांनी ८ नोव्हेंबर रोजी सरकारच्या निश्चलनीकरणाच्या निर्णयाची घोषणा केली. प्राथमिक प्रतिक्रियांनंतर परदेशात राहणाऱ्या भारतीयांमध्ये त्यांच्याजवळ असणाऱ्या ₹५०० व ₹१००० च्या जुन्या नोटांचे काय करावे याची काळजीयुक्त चर्चा सुरू झाली. सरकारने जाहिर केलेल्या माहितीनुसार परदेशात राहणाऱ्यांनी ३० डिसेंबर २०१६ किंवा ३१ मार्च २०१७ पर्यंत प्रत्यक्ष भारतात येऊनच स्वतःजवळच्या जुन्या नोटा बदलून घ्यायचा किंवा स्वतःच्या एनआरओ खात्यात जमा करण्याचा पर्याय उपलब्ध होता.
लेखकश्रीकृष्ण सामंतयांनी मंगळवार, 27/12/2016 08:23 या दिवशी प्रकाशित केले.
सुम्याच्या पश्चात येणार्या आठवणी
गुरूनाथ आपले दिवस असेच घालवीत होता.सकाळी उठून सोनचाफ्याची फुलं प्रत्येकाच्या फोटो समोर ठेवायची.आता त्यात सुम्याच्या फोटोची भर पडली होती.पहिले काही दिवस तिच्या फोटोला फुलं वहाताना गुरूनाथ खूपच भावनावश व्हायचा.फुलं वहाण्याच्या निमीत्ताने रोज सकाळी त्याला सुम्याचा चेहरा दिसायचा आणि तो पाहून घळघळा रडायचा.कधी कधी तिच्या फोटोसमोर ठाण मारून बसायचा.
लेखकअमिता राउतयांनी सोमवार, 26/12/2016 23:04 या दिवशी प्रकाशित केले.
मी न माझे राहिले
शब्द कंठी दाटले,
सुक्या पापण्यांचे पाते
ओले भासले.
काय सांगु मनाला या
बुद्धीची अगतिकता.
स्वच्छंदी अंतरंग रंगले
नकळत हसु उमटले ,
जुन्या आठवणींचे मनी
गीत गुंजले .
अंतरंगाची वेडी माया
स्वप्नांची पाठ सोडेना,
बिलगुनी तू मज येता
अंगी रोमांच उठले.
बेधुंद मुक्त मनाने
वेध घेत करी आसमंती विहार.
आसवांना चुकवत करी
धाव जीवलागाचा.
ऊन सावलीचा खेळ आयुष्याचा,
गोडासाठी साथ खार्याची …
लेखकवेल्लाभटयांनी सोमवार, 26/12/2016 17:12 या दिवशी प्रकाशित केले.
ब्लॉग दुवा
नव्वदीच्या दशकात जी व्यक्ती इंग्रजी गाणी ऐकत असेल तिला जॉर्ज मायकल हे नाव अपरिचित असणं शक्य नाही. काहीसा पॉप, डान्स किंवा डिस्कोचा बाज असलेली या गायकाची गाणी अतिशय प्रसिद्ध झाली.
१९८७ ला आलेला त्याचा पहिला म्यूझिक अल्बम फेथ. याच्या २ अब्जाहून अधिक प्रती विकल्या गेल्या. तिथपासून अनेकवेळा आपल्या गाण्यांमुळे किंवा इतर वैयक्तिक गोष्टींमुळे चर्चेत राहिला. २५ जून १९६३ रोजी लंडनमधे जन्मलेला, ३० वर्षाची सांगितिक वाटचाल केलेला हा कलाकार काल म्हणजेच २५ डिसेंबर २०१६ रोजी काळाच्या पडद्याआड गेला.