Skip to main content

जाणता राजा

लेखक महासंग्राम यांनी सोमवार, 26/12/2016 12:55 या दिवशी प्रकाशित केले.
गाव : विदर्भातलं एक खेड वेळ : सकाळची , स्थळ : गावाची चावडी पात्र : रामराव आणि शामराव, वय : ५५-६० च्या आसपास. रामराव : "राम राम ओ शामभौ कुटी चालले इतक्या घाई मदी." शामराव : "राम राम, ते शेतात गेल्तो जरा सोयाबीन ले पानी द्याचं व्हतं, तुमाले मालूम नाई का रातीची इज देतात ना ते MSEB वाले." "न आता जरा उमरावातीले जाऊन येतो, ते मावा पडलाय सोआयबीन वर त्यासाठी कीटकनाशक घेऊन येतो जरा.

It's a Tie !!

लेखक स्पार्टाकस यांनी सोमवार, 26/12/2016 12:31 या दिवशी प्रकाशित केले.
१९६० सालचा डिसेंबर महिना... फ्रँक वॉरेलचा वेस्ट इंडी़जचा क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियाच्या दौर्‍यावर आला होता. फ्रँक वॉरेल हा वेस्ट इंडीजचा पहिला कृष्णवर्णीय कॅप्टन! गोर्‍या ब्रिटीशांचा पगडा असलेल्या वेस्ट इंडी़जचे पूर्वीचे सर्व कॅप्टन्स गोरे होते. वॉरेलच्या संघात वेस्ट इंडीजचा शेवटचा गौरवर्णीय कॅप्टन आणि विकेटकीपर जेरी अलेक्झांडरचाही समावेश होता! अलेक्झांडर व्यतिरिक्त कॉनरेड हंट, सेमूर नर्स, रोहन कन्हाय, जो सॉलोमन आणि गारफिल्ड सोबर्स असे एकापेक्षा एक बॅट्समन वॉरेलच्या संघात होते.

आठवणी दाटतातः आठवणीतली गाणी

लेखक अफगाण जलेबी यांनी सोमवार, 26/12/2016 11:31 या दिवशी प्रकाशित केले.
.inwrap { background: url(https://lh3.googleusercontent.com/Lp_d4i7_2MsOm0urqKpCOtvWkKCpcWUtKx9R26oyRLUdsXVNFLWI9fchPBYuB1tDK0x-MqG1Ew=w320-h331-no); background-size: 100%; background-repeat: repeat; } माझ्या घरी गाण्याचे शौकीन जरी कोणी नसले तरी रेडिओच्या कृपेने दिवसाची सुरुवात आणि शेवट संगीतमय व्हायचा. आमच्या चाळीत तेव्हा जेमतेम एका बि-हाडात टीव्ही असेल. तोही आजच्यासारखा २४ तास नव्हता. शिवाय तो बघायचा म्हणजे त्याच्यासमोर बसावं लागे. त्यापेक्षा रेडिओ छान वाटायचा. समोर नसला तरी ऐकू येणाऱ्या गाण्यांमुळे त्याचं अस्तित्व जाणवायचं.

मन्याची नोटबंदी !

लेखक चिनार यांनी सोमवार, 26/12/2016 10:54 या दिवशी प्रकाशित केले.
८ नोव्हेंबरला पंतप्रधानांनी नोटबंदीची घोषणा केली. त्यावर बऱ्यावाईट प्रतिक्रिया येणं सुरु झालं.काळ्या पैशेवाल्यांचे चेहरे पांढरे पडले अन प्रामाणिक लोकांचे चेहरे खुलले. पण काळे नं पांढरे ह्यातल्या कश्याशीही संबंध नसलेला आमचा मन्या मात्र नोटबंदीच्या निर्णयानंतर परेशान झाला होता. आता अर्थातच हे आमच्या ध्यानात आलं नव्हतं. साहजिकच आहे म्हणा, नोटबंदी नंतरच्या गदारोळात मन्याची आठवण येणे शक्यंच नव्हते. पण त्यादिवशी बँकेच्या लायनीत उभा असताना, दूर झाडाखाली मन्या दिसला. मी त्याच्याजवळ गेलो. "काय मन्या? इकडे कोणीकडे?" "काही नाही रे", मन्या हताशपणे म्हणाला. "काय झालंय तुला?

तीन किस्से

लेखक सुबोध खरे यांनी सोमवार, 26/12/2016 10:52 या दिवशी प्रकाशित केले.
तीन किस्से शनिवारी माझ्या दवाखान्यात जरा गर्दीच होती. त्यातीलच हे तीन किस्से. नावे काल्पनिक आहेत पण घटना सत्य आहेत. १)- एक ३६ वयाचा तरुण (रुपेश भोईर) आला होता. पोटदुखी साठी. सोनोग्राफी केल्यावर लक्षात आले कि बाहेर खाल्ल्यामुळे त्याचे पोट बिघडले होते आतड्याला सूज अली होती अन्न विषबाधा सारखा प्रकार. मी त्याला म्हणालो कि साहेब तुमचे बहुधा बाहेरच्या खाण्यामुळे किंवा बाहेरच्या पाण्यामुळे पोट बिघडले आहे. त्यावर रुपेश म्हणाला डॉक्टर आमच्या कंपनीचे कॅन्टीन चांगले नाही म्हणून मग रोज बाहेर खावे लागते. मी त्या विचारले कि मग तुम्ही घरचा डबा का घेऊन जात नाही.

कासव

लेखक अभ्या.. यांनी सोमवार, 26/12/2016 00:57 या दिवशी प्रकाशित केले.
"ए बामणा, मुत्त्या बोलावतंय बघ आमचं तुला. बघ काय म्हणतंय येड्या भोकाचं" "तुझैला तुझ्या तीन एकर. बापंय कीबे तुझा" "बाप नाय डोस्क्याला ताप हाय" आप्पा कोरे म्हणजे अ‍ॅक्चुअली डोस्क्याला ताप कॅटेगरीतलाच. पण त्याच्या पध्दतीने विचार केला तर ताप. नायतर मुत्त्या वागायला सरळ. दिवसभर बारक्या दुकानात गोळ्या चॉकलेटं अन कुरकुरे विकायचा. खरा धंदा व्ह्यायचा पुड्या सिगरेटीवर पण पाटी यल्लम्मा किराणा दुकान अशीच. सकाळी कपाळाला फासलेली इबित्ती घामाच्या ओघळात वाहून जाईपर्यंत धंदा व्ह्यायचा. जसा दिवस बुडायला लागायचा तसं दुकान आप्पाच्या मित्रांनी भरायचं.

काश्मीर धोरणलकवा, शोकांतिका कि आणखी काही, भाग१

लेखक आदित्य कोरडे यांनी रविवार, 25/12/2016 22:12 या दिवशी प्रकाशित केले.
काश्मीर धोरणलकवा, शोकांतिका कि आणखी काही, भाग2 भाग१ (प्रा. शेषराव मोरे ह्यांच्या ‘ काश्मीर एक शापित नंदनवन’ ह्या पुस्तकावरून. इतर संदर्भ – १.Freedom at Midnight- Dominique Lapiere, २. Kashmir- Tragedy of errors- Tavleen Singh, ३. भारतीय मुसलमान – शोध आणि बोध- सेतू माधव राव पगडी, जंग ए काश्मीर- कर्नल शाम चव्हाण) वैधानिक इशारा – लेखातील काही किंवा बरेच मुद्दे तुम्हाला पटणार नाहीत, आवडणार नाहीत पण जे सत्य आहे ते समजून घेणे आणि स्वीकारणे हि समस्या सोडवण्यासाठी अत्यंत आवश्यक बाब असते.

आठवणी दाटतातः माझी मुंबई

लेखक नूतन सावंत यांनी रविवार, 25/12/2016 10:14 या दिवशी प्रकाशित केले.
.inwrap { background: url(https://lh3.googleusercontent.com/Lp_d4i7_2MsOm0urqKpCOtvWkKCpcWUtKx9R26oyRLUdsXVNFLWI9fchPBYuB1tDK0x-MqG1Ew=w320-h331-no); background-size: 100%; background-repeat: repeat; } माझी मुंबई जगात कुठेही फिरायला गेलं तरी काही दिवसांनी मुंबईची आठवण यायला लागते..आद्य मुंबई बनली ती माहीम, परळ, माझगाव, वरळी, बॉम्बे कुलाबा आणि छोटा कुलबा या सात बेटांनी मिळून, मुंबादेवी या ग्रामदैवातावरूनमुंबईचं नाव पडलं. मुंबा,मुंबाय,मुंबैमुंबई,मुंबापुरी,Bombaim,बॉम्बे,बंबई,अशी कितीतरी नावं.

(मुलिंनी धरु नये अबोला)

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी रविवार, 25/12/2016 09:39 या दिवशी प्रकाशित केले.
आमचे परम मित्र व मिपावरचे जगप्रसिध्द कवीवर्य मा रा रा संदिपचंद्र रावजी चांदणे साहेब यांची क्षमा मागुन माझे हे काव्य पुशप रसिक वाचकांच्या चरणी सविनय सादर करतो. पेरणा अर्थातच (मुलिंनी धरु नये अबोला) मुलिंनी मुलांशी अबोला धरुन बिचार्‍यांना अडचणीत आणू नये त्यांच्या मनात विराटच्या झंजावाती खेळी बद्दल विचार चालू असतो आपली आधाशी नजर दुकानात दिसणार्‍या (आणि न दिसणार्‍या) प्रत्येक वस्तूवरुन फिरवू नये मुलांच्या खिशात असलेल्या एकमेव शंभराच्या नोटेचे हिशेब ढासळू लागतात मोबाईलची रिंग वाजली की आपली जागा