बन्दे की मेहनत को किस्मतका सादर परनाम है प्यारे.. दंगल दंगल!
दंगल पाहिला. आवडलाच..
अगदी शतकोत्तर कलाकृती नसली तरी पिक्चर उत्तमच आहे. आणि मला आमीर खान देशद्रोही वाटत नाही, म्हणुन मला त्याचं कौतुक करायलाही काही त्रास नाही.
दंगल मध्ये आमिर, फातिमा, सान्या, सांक्षी तंवर आणि अपारशक्ति खुराणा म्हणजेच ओंकार.. सगळ्यांचेच काम उत्तम आहे. त्यांनी त्यांच्या लुक्सवर घेतलेली मेहनत, त्यासाठी केलेला व्यायाम.. हे तर महत्वाचं आहेच. पण खास करुन आमीरने वजन वाढवुन, ते पुन्हा कमी केलंय.देशाचा अपमान
"बाबा, जन-गण-मन केव्हाही म्हटलं की देशाचा अपमान होतो ना?" तन्मय, आमची थोरली पाती.
"इकडे ये, मला नीट ऐकू नाही आलं." अस्मादिक.
.
.
"बाबा, जन-गण-मन केव्हाही म्हटलं की देशाचा अपमान होतो ना?" अॅक्शन रिप्ले.
"तुला कोणी सांगितलं? कुठे ऐकलं" (प्रश्नाचे सरळ उत्तर देतील तर पालक म्हणवून घेण्यावर बट्टा लागेल नै?)
"असंच, मला माहिती आहे." थोरली पाती.
"अरे, म्हणजे कुठं ऐकलं, कोणी सांगितलं, कोणी बोलत होतं का असं?"
"गौरव म्हणाला. केव्हापण जन-गण-मन म्हटलं तर देशाचा अपमान होतो."
.
.
वय वर्षे सहा, वर्ग पहिला. शाळेतल्या गप्पांमधे झालेला विषय घरी चर्चिला जाणे रोजचंच.
भारत-तैवान-चीन - एक सुवर्णसंधी
गेल्या आठवड्यात ट्रंपने तैवानच्या अध्यक्षाला फोन केल्याची बातमी वाचली. त्यावरुन चिनने केलेला थयथयाट पण पाहिला. खरतर ही भारतासाठी असलेली सुवर्णसंधी आहे.
आजपर्यंत तैवान हा चिनचा भाग आहे ही दिलेली मान्यता आपण आता काढुन घ्यायला हवी. तैवानला एक स्वतंत्र राष्ट्र म्हणुन मान्यता द्यायला हवी.
खरतर चिनचा ग्वादार बंदर आणी एकुणच CPEC योजनेला भारताची ही भुमिका जबर धक्का ठरेल. विशेषतः अमेरिका+ भारत अशा दोघांनीही ही घोषणा केली तर जगाचा याकडे बघायचा द्रुष्टीकोनच बदलेल. आणी ते योग्यच आहे.
दुसरे ट्विटर मराठी भाषा संमेलन २०१७ :: ३ ते ६ फेब्रूवारी २०१७ रोजी वापरा #ट्विटरसंमेलन
" प्रकट व्हा, अभिव्यक्त व्हा !! "
ट्विटर हे एक जागतिक व्यासपीठ आहे.ह्या व्यासपीठावर रोज करोडो लोक आपले मत आपल्या भाषेत नोंदवत असतात.एकेकाळी फक्त इंग्रजी भाषेचा बोलबाला असणारे ट्विटर आज जगातील प्रत्येक लिपी असणारी भाषा सामावून घेत आहे.मग अशा ह्या ट्विटरवर मराठीचे अस्तित्व किती आहे ? असा तुम्हाला प्रश्न पडेल.सध्या मराठीचे ट्विटरविश्व जरी उगमावस्थेत असले तरी त्याचे भविष्य उज्जवल आहे.
कलात्मक कोपेश्वर
नावारूपाला आलेली ठिकाणे प्रेक्षणीय स्थळे म्हणून पाहण्यास आपण कायमच उत्सुक असतो.गतवर्षाचा शेवट किव्वा नववर्षाची सुरुवात साजरी करण्याच्या हेतूने अनेक जण अशा विविध ठिकाणांना भेट देत असतातच.पण यंदा हा धोपट मार्ग सोडून थोडा वेगळा विचार डोक्यात आला.'कट्यार काळजात घुसली' या चित्रपटातील 'शिव भोला भंडारी' या गाण्याच्या निमित्ताने ते शिवमंदिर पडद्यावर पाहण्याचा योग्य आला आणि तेव्हाच इथे जाऊन यायचे पक्के झाले.सिनेमाचे छायाचित्रण झाल्याने हे मंदिर देखील प्रकाशझोतात येईल असे वाटले होते पण वास्तविकता थोडी वेगळी आहे.
कोल्हापूर पासून साधारण साठ किलोमीटरवर खिद्रापूर नावाचे छोटेसे गाव आहे.अर्थात हे गाव माहित
राग (अर्थातच सान्गितिक)
आशयाच्या अंबरांनी शब्द माझा टंच व्हावा
कोरडा माझा उमाळा रोज माधुर्यात न्हावा ..
स्वर टिपेचा बरसुदे त्या भीमसेनी मार्दवाने
सूर शब्दांच्या द्वयाने जीव माझा धन्य व्हावा
सोहिनीच्या आर्जवांनी जीव स्वप्नाळून जावा
जोगिया वा भैरवाने सूर्य गगनी अवतरावा
विभासाच्या त्या सुरांनी नूर दिवसाचा ठरावा
कलिंगडाच्या भैरवाने अंतरात्मा शुद्ध व्हावा ..
मारावा अन सारंगाच्या साक्षीने दिन सार्थ व्हावा
श्री मधुवंती पूर्वी संगे मध्यांन्होत्तर वेळ जावा ...
यमन येऊदे संध्याकाळी साथ घेऊन शंकऱ्याला
हंसध्वनी वा कल्याणाने दिवस रोजचा अंत व्हावा..
रात्रीला मग नंदसंगे मल्हाराने फेर घ्यावा
रागेश्री अन कलावतीने केदाराचा
काव्यरस
मिसळपाव