गुलजार!
महान कवी, गीतकार गुलजार यांचा १८ ऑगस्ट हा वाढदिवस! गुलजार यांच्या प्रतिभेबद्दल आणि शब्दप्रभूत्त्वाबद्दल मी काय लिहिणार? पण त्यांच्याबद्दल आधी धागा येऊन गेला की कसे याबद्दल माहिती नाही. म्हणून त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या गीतांबद्दल, त्यांच्या काही आठवणी प्रतिसादांमधूनही वाचायला मिळतील म्हणून हा धागा काढत आहे.
खरे तर माझ्या बालपणातली बरीच वर्षे मी फक्त त्याच काळातली गाणी ऐकणे, पाठ करणे यातच रमले होते. आईबाबांना जुन्या गाण्यांची आवड असली तरी ठराविकच गाणी ऐकण्यात आली. केबल तर आमच्याकडे नव्हतीच, रेडिओही फार काही चालू नसायचा. नगरच्या साहित्य संमेलनात गुलजार प्रमुख पाहुणे म्हणून आले होते - मला वाटते बहुतेक समारोपाच्या कार्यक्रमात. तेव्हाही मला त्यांच्या गाण्यांपेक्षा फक्त गुलजार हे खूप ख्यातनाम गीतकार म्हणूनच माहीत होते. त्यावेळी आम्हां मैत्रिणींमध्ये ऑटोग्राफ बूकचे चांगलेच फॅड आले होते. साहित्य संमेलनाच्या तीनही दिवशी आम्ही तिकडेच पडीक तर होतोच, पण साहित्यिक काय सांगत आहेत हे जाणून घेण्यापेक्षा त्या वहीत सही मिळवायचीच आम्हांला उत्सुकता असायची. मला आठवते त्याप्रमाणे समारोपाचा कार्यक्रम संपण्याआधीच गुलजारांना निघावे लागले. स्टेजच्या मागच्या बाजूने ते बाहेर पडत होते. कुठून कुठून वाट काढून, जोरात पळत जाऊन एकदाचे मी आणि मैत्रिणीने त्यांना गाठले आणि सही मागितली. बर्यापैकी वैतागून त्यांनी "I don't give it... I don't give it" असे म्हटले, आम्ही "प्लीज,प्लीज" म्हणत आहोत, ते "नो नो" म्हणत पुढे जात आहेत असा काही वेळ आम्ही त्यांचा पाठलाग केला. बघणार्यांनाही गंमत वाटत होती. शेवटी ते गाडीत बसून निघाले आणि सही नाहीच दिली. हिरमोड होऊन मी पुन्हा माझ्या जागी जाऊन बसले. त्या वयातले माझे तुटपुंजे ज्ञान आणि (अ)समज यांना अनुसरुन मी त्यांना "शिष्ट" लोकांच्या यादीत बसवून टाकले.
तर अशी ही माझी त्यांच्याबरोबरचे प्रत्यक्ष भेट. त्यानंतरही त्यांच्या गाण्यांपासून मी दूरच. म्हणजे, गाणी माहीत असली तरी फक्त ते गाण्यापुरतेच बोल माहीत करुन घ्यायचे. त्यातला अर्थ-बिर्थ समजून घ्यायचा काही प्रयत्न केला नाही. हळूहळू डायरीत गाणी लिहून काढणे, सिनेमाचे नाव, गायक, गायिका, त्यानंतर संगीतकार माहीत करुन ते लिहिणे हे सुरु झाले. पण एकंदरीत गाण्याच्या बोलांचा, अर्थाचा, त्यामागच्या घटना, प्रसंग आणि गीतकारांचा विचार असा बरीच वर्षे कधी केला नाही.
इंजिनीअरिंगला असताना गाणी जमा करण्याचा सपाटाच लावला होता आणि जुन्या सिनेमांतली गाणी सरसकट "ओल्डीज" म्हणून जमवण्यात यायची. पण पुढे लग्न झाल्यावर नवर्याकडे असलेली गाणी शोधताना एकदा गुलजारांची गाणी असलेले एक फोल्डर सापडले. गीतकाराच्या नावाने बनवलेले हे पहिलेच फोल्डर पाहिले आणि तेव्हा पहिल्यांदाच एका वेगळ्याच दृष्टीकोनातून ही गीते समजून घ्यायला सुरुवात केली, आणि मग मी हरखूनच गेले. नंतर परदेशात वर्षभर राहायची संधी मिळाली. तिथली लायब्ररी - त्यातले भारतीय भाषांमधले साहित्य सिनेमे गाणी यांचा संग्रह, घरच्या इंटरनेटचेही भारताच्या मानाने असलेले प्रचंड स्पीड आणि माझ्याकडे हाताशी वेळ असणे या गोष्टी माझ्या चांगल्याच पथ्यावर पडल्या. मग अशी जुनी वेगवेगळी गाणी, त्यांचे बोल समजून घेणे, त्यावर चर्चा करणे यात माझा बराच वेळ सत्कारणी लागला. नंतर ऑर्कुटवर त्या कम्युनिटीज असायच्या त्यात गुलजारांची जॉइन केली, मग इतर लोकांबरोबर त्याबद्दल चर्चा "जिहाले-मस्की" गाण्याचा अर्थ समजून घेतला होता, "एकसो सोलह चांद की रांते.." मागची कल्पना समजली होती. "नाम गुम जायेगा", "मेरा कुछ सामान" अशी कितीतरी गाणी किती वेळा ऐकली त्याची गणतीच नाही. मुलांना आता "टप टप टोपी टोपी" आणि "टकबक टकबक" शिकताना तर काय मजा येते! त्यांच्या गाण्यांबद्दल मी इथे वेगळं काय लिहिणार, या सगळ्या बाबतींत मला अजूनही फार काही गती नाही. पण गुलजारांबद्दल आणखी माहिती शोधताना, वाचताना, त्यांच्याबद्दलचा आदर वाढतच गेला. त्यांना मी "शिष्ट" म्हणून लावलेले लेबल किती बालिश होते आणि माझा राग किती पोकळ होता हेही समजून गेले.
काही वर्षांपूर्वी एकदा इथल्या भारतीय सामानाच्या दुकानातून बाहेर पडताना, माईक, कॅमेरा लावून एका ग्रुपमधले काहीजण येणार्या जाणार्या काही लोकांची मुलाखत घेत होते. चौकशी केल्यावर कळले की गुलजारांच्या वाढदिवसानिमित्त एक व्हिडिओ बनवणार आहेत, आणि या मुलाखती त्यात असतील. मग नवर्यानेही मला प्रोत्साहित केले. मुलाखत घेणार्याला बहुतेक मी लहानपणी कशी होती ते माहीत असावे, कारण तो आम्हांला गुलजारांची ओळख सांगू लागला आणि त्यात फक्त "बिडी जलाईले", "कजरारे" याच गाण्यांबद्दल सांगू लागला. मग आम्ही त्याला आमच्याकडची जास्तीत जास्त माहिती त्या दोन मिनिटांत द्यायचा प्रयत्न केला. तोही प्रभावित झाला असेल. याचा व्हिडीओ १८ ऑगस्टला अमुकअमुक वेबसाईटवर टाकण्यात येईल अशी माहिती त्याने आम्हांला दिली. १८ तारखेला आठवणीने मी व्हिडिओ पाहायला लिंक उघडली. व्हिडीओ होता, पण इथल्या एका हिंदू मंदिराबाहेर घेतलेल्या मुलाखतींचा. त्यांनी दोन ठिकाणी मुलाखती घेतल्या होत्या, पण व्हिडिओ बहुतेक एकाच ठिकाणच्या मुलाखतींचा बनवला! गुलजारांचा विषय निघाला की ही आठवण येते आणि त्याचे हसूही येते.
त्या साहित्य संमेलनाला आता दोन दशके होत आली. आता कधी संधी मिळाली तर मी सही मागण्याआधी गुलजारांना नमस्कार करेन. कशीही असो, त्यांची प्रत्यक्ष भेट झाली याचा आनंद आहेच, आणि त्यांची जादू मनावर जी आहे ती कमी होण्याऐवजी वाढतच जात आहे. या असाधारण गीतकाराला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
वाचने
17728
वाचनखूण
प्रतिक्रिया
64
छान लेख
गुलजार आणि आर.डी. हे माझं
In reply to गुलजार आणि आर.डी. हे माझं by बोका-ए-आझम
राह पे रहते है!
In reply to राह पे रहते है! by पिलीयन रायडर
मस्तच पिरातै!
आणखी एक मिपावरचा धागा होता
खूप सुंदर लेख. गुलझार साब _^_
यही है ज़िंदगी!
In reply to यही है ज़िंदगी! by बहुगुणी
निशब्द!!!!!! केवळ आणि केवळ _^
In reply to निशब्द!!!!!! केवळ आणि केवळ _^ by पद्मावति
अगदी खरंय निःशब्दच
बहुगुणी साहेब, दुव्यांसाठी
तुमच्या लेखाच्या निमित्ताने
वा, वा! मस्त धागा!
मस्त धागा आणि प्रतिक्रिया!!
वा
आठवतात तशा ओळी..
रुपी, ह्या धाग्यामुळे खूप
अतिशय आवडत्या
बड़े दिनोंके के बाद ख़ुशी मिली
आवडला लेख.
माझी आवडती गुलजार गीतं - १
In reply to माझी आवडती गुलजार गीतं - १ by बोका-ए-आझम
छान.
वावा!
.......
माझी आवडती गुलजार गीतं - २
In reply to माझी आवडती गुलजार गीतं - २ by बोका-ए-आझम
मस्त हो साहेब. लय भारी
मस्त धागा या निमित्ताने
(No subject)
खूप छान छान रचना या
In reply to खूप छान छान रचना या by रुपी
रेनकोटची सगळीच गाणी अप्रतिम
गुलजार. एक अ प्र ति म फाईन
In reply to गुलजार. एक अ प्र ति म फाईन by संदीप डांगे
मस्त!
In reply to गुलजार. एक अ प्र ति म फाईन by संदीप डांगे
सुंदर
In reply to गुलजार. एक अ प्र ति म फाईन by संदीप डांगे
गुलजार माझ्यासाठी समुद्र आहे,
In reply to गुलजार. एक अ प्र ति म फाईन by संदीप डांगे
लय भारी प्रतिसाद डांगेअण्णा
त्यांची त्रिवेणी नेहमीच भुरळ
छान लेख!
माझी आवडती गुलजार गीतं - ३
सुंदर लिहिलंस
गुलझार....
https://www.bobhata.com
In reply to https://www.bobhata.com by अनुप ढेरे
सुंदर लिंक, फक्त ते गाणं,
In reply to https://www.bobhata.com by अनुप ढेरे
लेख रामदासकाकांनी लिहिला आहे
वाह वाह
In reply to वाह वाह by मैत्र
वाह वाह वाह! उत्कट!
In reply to वाह वाह by मैत्र
जबराट मैत्रभौ!
In reply to जबराट मैत्रभौ! by बोका-ए-आझम
अरे वा! त्या मुलाखतीबद्दल
In reply to अरे वा! त्या मुलाखतीबद्दल by रुपी
अर्थात बोकेशांनी लिहावेच
In reply to अर्थात बोकेशांनी लिहावेच by नाखु
"मोरा गोरा अंग लै ले " - खरे
In reply to "मोरा गोरा अंग लै ले " - खरे by रुपी
आहा.....पिंजर.
In reply to आहा.....पिंजर. by पद्मावति
या चित्रपटाबद्दल सर्वच अतिशय
In reply to या चित्रपटाबद्दल सर्वच अतिशय by रुपी
या चित्रपटाबद्दल सर्वच अतिशय
लेख तर भारीच, आणि प्रतिसाद
मस्त...
छान लेख. आम्हीसुद्धा गुलझार
मस्त लेख, सुरेख प्रतिसाद...
In reply to मस्त लेख, सुरेख प्रतिसाद... by माधुरी विनायक
वाचताना सुद्धा आशाचा आवाज ऐकू
In reply to मस्त लेख, सुरेख प्रतिसाद... by माधुरी विनायक
पाके भी तुम्हारी आरज़ू है
In reply to पाके भी तुम्हारी आरज़ू है by सानझरी
क्षमस्व सानझरी...
In reply to क्षमस्व सानझरी... by माधुरी विनायक
अगदी खरं.. जीने के लिये सोचा
गुलजारजींचं हे गीत माझं अतिशय आवडतं आहे.
In reply to गुलजारजींचं हे गीत माझं अतिशय आवडतं आहे. by बोका-ए-आझम
ओहोहो.. आज जीव घ्यायचा दिवस
शिकोड़
एखादी मालीका किमान फाळणीवरील्/सम्कालीन विषयावर करायला पाहिजे होती असे राहून राहून वाटते.फाळणीवर आधारित मालिका गुलज़ारांनी दिग्दर्शित करावी या इच्छेला +१. त्यांनी दूरदर्शनसाठी दिग्दर्शित केलेल्या 'किरदार' या कथामालिकेतील 'शिकोड़' (मूळं) ही पश्चिम बंगाल आणि पूर्व पाकिस्तान यांत रहाणार्या मित्रांची कथा आठवली. खास गुल़ज़ार टच!अरे आओ ना, की जां गयी
In reply to अरे आओ ना, की जां गयी by जव्हेरगंज
हे तर एक नंबर आहे!!