मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

रॉय !!!

किल्लेदार ·
घर सोडून आता तब्बल अठ्ठावीस तास उलटले होते. तीन लांबलचक विमानप्रवास आणि वीट आणणारे त्यातले स्टॉप ओव्हर्स सोसून हातपाय दगड झाले होते. अडीच-तीन तासांचा बस प्रवास अजूनही शिल्लक होता. पुराणकाळात नारद-मुनिंना अवगत असलेल्या टेलीपोर्टेशनचा शोध अजून का बरं कुणाला लावता येऊ नये. “नारायण-नारायण!!!” म्हणत अगदी तिन्ही लोकांत नाही तरी निदान पृथ्वीलोकांत कुठेही लीलया जाऊ शकण्याची किमया विज्ञानाला लवकरच साधता यायला हवी. तिकिटाच्या रांगेत माझ्या मागे उभा असलेला एक मोरक्कन आणि त्याच्यामागच्या दोन जॅपनीज तरुणी यांचीही गत माझ्यापेक्षा फार काही वेगळी नाही हे त्यांचेही थकले भागले चेहरे स्पष्टच सांगत होते.

केरळ कन्याकुमारी लेखमाला : पूर्वतयारी

श्वेता२४ ·

     नमस्कार. खूप दिवसांनी मिसळ पाववरती येत आहे. निमित्त आहे आमच्या केरळ-कन्याकुमारी भटकंती लेखमालेचे....... खूप दिवसापासून केरळ माझ्या बकेट लिस्ट मध्ये होते. मिपावर केरळ वरती अनेक लेख आहेत. तसेच युट्युब वरती सुद्धा केरळ बद्दल बरीच माहिती उपलब्ध आहे. माझ्या सासूबाई वर्षभरापूर्वी सेवानिवृत्त झाल्या. त्यांना कुठेतरी फिरायला जायचे होते. आपण सर्वजण कुठल्यातरी निसर्गरम्य ठिकाणी फिरायला जाऊयात याबाबतचे तू नियोजन कर असे सासूबाईंनी मला सप्टेंबर मध्ये सांगितल्यामुळे माझा आधीच तयार असलेला केरळ प्लान त्यांना सांगितला आणि आमचे दिवाळीनंतर केरळला जायचे निश्चित झाले.

२०१४ आधी आणी नंतर

पॅट्रीक जेड ·
पडले पूल, पडले छत, २०१४ आधी पडत नव्हते का? मेले लोक चेंगराचेंगरीत, २०१४ आधी मरत नव्हते का? समस्या जुनी, पण आवाज नवा, कोण बदललं, कोण विचारेल का? चुकीच्या हातात सत्ता दिली, कळलं नाही, कोण भुललं का? नवीन वाद, जुने प्रश्न, उत्तरं मात्र राहिली तशीच. स्वप्न दाखवून, फसवणूक झाली, झाली चूक, जनता न शिकली. विचार करावा आपण, मंथन करावे, काय फरक, काय बदल घडले? दोष देऊन संपत नाही काही, दोष काढून, काम चालले. पडले पूल, पडले छत, २०१४ आधी पडत नव्हते का? सर्व मिळून शोधू उत्तर, की बदल खरोखर घडले का?

मंडपेश्वर लेणी, दहिसर

गोरगावलेकर ·
मुंबईच्या मध्यवर्ती भागात असूनही थोड्याश्या अपरिचित असलेल्या दोन लेण्यांना गेल्या वर्षी भेट दिली होती. आंबोली लेणी आणि कोंडिविते लेणी (जोगेश्वरी लेणी आणि महाकाली लेणी) अशाच एका तिसऱ्या लेणीला गेल्या आठवड्यात भेट दिली ती म्हणजे दहिसर (प) येथे असलेली मंडपेश्वर लेणी. सहाव्या शतकात निर्माण झालेले हे एक बौद्ध लेणे.

हाथरस (उ.प्र.)सत्संग

बाजीगर ·
Hathras Stampede:बस अन् टेम्पोमध्ये भरुन मृतदेह रुग्णालयात, मृतांचा खच पाहून शिपायाला हार्ट अटॅक https://marathi.indiatimes.com/india-news/up-hathras-stampede-constable-dies-by-heart-attack-after-seeing-dead-bodies-in-hospital-bhole-baba-satsang/articleshow/111446441.cms बाबा नारायण साकार, बाबा हा कारण फरार।। सत्संग @ हाथरस, 121 मेले बेवारस।। पाहून प्रेतांचा ढीग विक्राळ, एक पुलीस मेला तात्काळ ।। भयंकर चीख नंतर श्मशानशांतता, भक्तांची भीख नंतर, जिवनअंतता।। बाबा ची चरण-धूळ, घेण्यासाठी भगदड, हेच कारण मरण-मूळ, 121 चिरडूनी मूरदड।। 80,000 ची परवानगी, अडीच लाखांचा सत्संग, पूर्

साथ.

भागो ·
लेखनविषय:
त्याला सकाळी लवकर उठायची सवय होती. पण आज सकाळी त्याला नेहमीसारखे प्रसन्न वाटत नव्हते. काय कारण असावे? त्याचे नाव होते राजे. अनंत राजे. जिम मध्ये जाऊन कमावलेले शरीर. धडधाकट प्रकृती. कधी दवाखान्याची पायरी चढलेला नाही. सकाळची भरभक्कम न्याहारी. न्याहारी न खावीशी वाटावी असं काही नव्हतं. जगण्यासाठी खाणे का खाण्यासाठी जगणे असले तात्विक विचार यायचं वय नव्हते. बाजूच्या टेबलावर दोन तरुणी बसल्या होत्या. पैकी एक ती किंचित काळ्या रंगावर गेली होती. पण तिचा आवाज म्हणजे स्वरांची तान. सिंग-सॉंग. तो तिला नेहमी पहात असे. तिच्या मैत्रिणीसह ती ब्रेकफास्ट करायला येत असे. ओके. ऑर्डर द्यायची वेळ झाली.

सात-आठ महिन्यांपासून स्टॉक मार्केटमध्ये महिना ८० हजार कमावलेत

कांदा लिंबू ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
इशारा: १. शेअर बाजारातील गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन असते. २. सदर धागा लेखक गुंतवणूक तज्ज्ञ वा बाजार सल्लागार नाही. हा लेख आणि त्यावरील प्रतिसाद वाचून कुणी गुंतवणूक केल्यास सदर धागालेखक वा हे संस्थळ जबाबदार असणार नाहीत. --- नमस्कार मिपाकर्स मित्र मैत्रिणींनो. खरडफळ्यावर झालेल्या संक्षिप्त चर्चेतून हा धागा काढत आहे. लिखाण विस्कळीत वाटू शकेल याची कल्पना आहे पण भावार्थ समजून घ्यावा ही अपेक्षा आहे. आपण नवीन वर्षाचे अनेक संकल्प करतो. त्यातले अगदी थोडे पूर्ण होतात तर बरेचसे काही अपूर्ण राहतात.

स्वप्नपूर्ती..!!

सुजित जाधव ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
जेव्हा एखादी गोष्ट मिळवण्यासाठी तुम्हाला बराच वेळ वाट पहावी लागते, कित्येक वेळा तुम्ही ती मिळवण्याच्या अगदी समीप जाता पण ती प्राप्त करनं तुम्हाला शक्य होत नाही. अशी गोष्ट जेव्हा तुम्हाला मिळते तेव्हा जो आनंद होतो तो अवर्णनीय असतो, माऊंट एव्हरेस्ट सर केल्याच्या feeling पेक्षा तो कमी नसतो. सेम feeling व आनंद शनिवारी भारतीय खेळाडू, क्रिकेटरसिक व संपूर्ण भारतवर्षाने अनुभवला..!! ११ वर्षांनंतर भारताने आयसीसी ट्रॉफी जिंकली..!

Boys Played well..!

kool.amol ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
हुश्श्श..शेवटी एकदाचा भारताने विश्वकप जिंकला! सामना कसा थरारक होता, कोण कसं खेळलं, कोणामुळे जिंकलो ही सगळी चर्चा बऱ्यापैकी करून झालीय, चालू सुद्धा आहे. थोड्या वेळासाठी असं वाटून सुद्धा गेलं की..झालं, खाल्ली माती ह्या संघाने परत एकदा. पण नंतर अगदी उलट झालं. क्रिकेट हा प्रचंड शक्यता असणारा खेळ आहे आणि अगदी क्षणाक्षणाला बदलत जाणारा खेळाचा balance ह्यात प्रचंड थरार निर्माण करतो. 20-20 फॉरमॅट मध्ये तर अजूनच जास्त! ग्रामपंचायत निवडणुका जास्त चुरशीच्या असतात म्हणे त्यासारखच काहीस म्हणता येईल. मला काही गोष्टी विशेषत्वाने जाणवल्या.