Skip to main content

"माझी मदतनीस"च्या निमित्ताने

लेखक आजी यांनी शनिवार, 22/03/2025 09:08 या दिवशी प्रकाशित केले.
मी मिपावर लिहिलेल्या "माझी मदतनीस" या लेखावर खूपच मस्त चर्चा रंगली. या लेखावर जवळपास पंचेचाळीस प्रतिसाद आले आणि अडीच हजार वाचने झाली. मी सहज सुचलं म्हणून , मनात हा विषय काही दिवस घोळत होता म्हणून, हा लेख लिहिला. त्यावर इतकी चर्चा झालेली पाहून मला आनंद झाला. या प्रतिसादांमध्ये काही डाव्या तर काही उजव्या विचारसरणीचे, तर काही मध्यममार्गी,तर काही तटस्थ मतप्रवाह होते. मी हिंदू आहे. हिंदू म्हणून जन्माला आले. हिंदू म्हणून लहानाची मोठी झाले. मला अर्थातच माझ्या धर्माचा अभिमान आहे. माझा धर्म मी बदलणार नाही.

आग व संशयाचा धुर

लेखक बाजीगर यांनी शनिवार, 22/03/2025 09:00 या दिवशी प्रकाशित केले.
दिल्ली न्यायाधीशाच्या घरी लागली आग, अग्निशमन कर्मचाऱ्यांना, घरात दिसली नोटांची थप्पी, काढता आगीचा माग ।। होते म्हणे 15 कोटी घबाड, तरीही नाही धरला लबाड ।। वर्मावर बोट आल्यावर, केली त्यांनी रदबदली, राजीनामा न घेता, त्यांची फक्त केली बदली ।। दिल्ली न्यायाधीशाच्या घरी लागली आग, पैशाचा पूर, संशयाचा धुर तरीही न्यायाला आली नाही जाग ।।

पुणे जिल्ह्यातील प्राचीन मंदिरे

लेखक vcdatrange यांनी शुक्रवार, 21/03/2025 16:58 या दिवशी प्रकाशित केले.
१. बाणेश्वर गुहा मंदिर बाणेर गाव, बाणेर हिंदू लोककथेनुसार, ही गुहा पांडवांसाठी लपण्याची जागा होती. काही इतिहासकारांच्या मते हे मंदिर ८ व्या शतकात राष्ट्रकुटांच्या काळात बांधले गेले होते. हे गुहा मंदिर पुण्यातील सर्वोत्तम प्राचीन मंदिरांपैकी एक आहे जे भगवान शिव यांना समर्पित आहे. https://maps.app.goo.gl/B7J4R9P3pxg1mNyk9 २. पाताळेश्वर गुहा मंदिर या मंदिराची खासियत म्हणजे ते पूर्णपणे बेसाल्ट खडकापासून कोरलेले आहे. ८ व्या शतकात बांधलेले, या मंदिराच्या गर्भगृहात शिवलिंग आहे.

निघा निघा चिऊताई

लेखक अनन्त्_यात्री यांनी शुक्रवार, 21/03/2025 11:12 या दिवशी प्रकाशित केले.
निघा निघा चिऊताई सारीकडे काँक्रीटले दाणा पाणी हरवले शहरी ह्या विषारी धुरके आले घरट्याच्या दारापाशी डोळ्यावर झोप कशी अजूनही उरलेली पाखरे ही भयसूचनांचे गाणे गाऊनी टिपती दाणे अखेरचे झोपू नका अशा तुम्ही वाचविण्या मृत्युक्षणी येईल का मग कोणी बाळाला ह्या बाळाचे मी घेता नाव जागी झाली चिऊताई बाळासकट ती जाई कायमची!
काव्यरस

मस्त जुळतं आमचं!

लेखक अमरेंद्र बाहुबली यांनी गुरुवार, 20/03/2025 23:44 या दिवशी प्रकाशित केले.
मस्त जुळतं आमचं! तीच ते नाजूक हसने… ब्रेकफास्टवेळी टेबलावर हसून चांदणे सांडणे, सगळं काही नजरेत साठवले मी! तिची ती उंची, गोरापान रंग, बोलण्याचा ढंग— अप्सराच जणू! फिदा झालो मी तिच्यावर… तिचे ते मोकळे केस, स्टायलिश राहणे, इंग्लिश बोलणे— अहाहा! मला दाढी ठेव सुचवणे, हेअरस्टाईल बदलायला लावणे, “फॉर्मलपेक्षा कॅज्युअलवर छान दिसशील” सांगणे… कसला संकेत? सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण आणि संध्याकाळची कॉफी— आम्हाला एकमेकांची सवयच झालीय! टीम्स मिटिंग असो की एखादा इवेंट, आमचे लाडिक विनोद सुरूच असतात. मागे मला मिळालेले गिफ्टही मी तिला देऊन आनंदी केले. ऑफिस कलीग हा फक्त आमच्यातला अडसर आहे,

शुक्र दोन वेळेस दिसण्याची दुर्मिळ स्थिती (50 अंश उत्तरेवरील मिपाकरांसाठी)

लेखक मार्गी यांनी गुरुवार, 20/03/2025 14:36 या दिवशी प्रकाशित केले.
शुक्र दोन वेळेस दिसण्याची दुर्मिळ स्थिती (Wonderful dual visibility of Venus!) नमस्कार. आपल्याला माहितीच आहे की, शुक्र पहाटेचा तारा किंवा संध्याकाळचा तारा (an evening star or a morning star) म्हणून ओळखला जातो. कारण तो एक तर पहाटे दिसतो किंवा संध्याकाळी दिसतो. पण ही स्थिती एकदा एकच असते. जर शुक्र संध्याकाळी सूर्यानंतर मावळत असेल, म्हणजे संध्याकाळी दिसत असेल, तर सकाळी सूर्य शुक्राच्या आधी उगवेल व त्यामुळे शुक्र पहाटे दिसू शकणार नाही. आणि जर शुक्र सूर्याच्या पूर्वेला असेल, तर फक्त तो पहाटेच दिसेल. पण एका दुर्मिळ स्थितीमध्ये शुक्र दोन वेळेस दिसू शकतो.

नाशिक जिल्ह्यातील प्राचीन मंदिरे

लेखक vcdatrange यांनी मंगळवार, 18/03/2025 14:54 या दिवशी प्रकाशित केले.
नर्मदा ते तुंगभद्राच्या जलरेघेतील महाराष्ट्रच्या ऐतिहासिक वारसास्थळांच्या अभ्यासास एकत्रित करण्यासाठी 'मध्ययुगीन मंदिरे' या संदर्भाने स्थळांची यादी करावयास घेतली आहे. याची सुरुवात राहत्या नाशिक जिल्ह्यापासुन करत आहे. या सर्व स्थळांना येत्या पाच वर्षात प्रत्यक्ष भेट देण्याचे व्यक्तिगत उद्दिष्ट ठेवले आहे. यातील वास्तुंचा विचार करताना मुख्यत्वेकरुन मराठापुर्व कालीन धार्मिक वास्तुंचाच विचार केला आहे. आंतरजालावरील उपलब्ध माहिती, गुगल लोकेशन व मॅपिंग करुन राज्यभरातील सर्व ठिकांणाचा एकत्रित नकाशा तयार होईल जो अभ्यासु व पर्यटकांसाठी उपयुक्त राहील.

जॉन अब्राहम (अंतिम भाग ६)

लेखक श्रीगुरुजी यांनी सोमवार, 17/03/2025 15:35 या दिवशी प्रकाशित केले.
जॉन अब्राहम (भाग १) >>> जॉन अब्राहम (भाग २) >>> जॉन अब्राहम (भाग ३) >>> जॉन अब्राहम (भाग ४) >>> जॉन अब्राहम (भाग ५) शेवटी २६ एप्रिलला व्हर्जिन्यातील एका शेतघरात तपास अधिकार्‍यांना बूथ व हेरॉल्ड सापडले. ते एका गवताच्या गंजीत लपले असल्याच

तुकाराम बीज सोहळा...

लेखक बाजीगर यांनी रविवार, 16/03/2025 11:19 या दिवशी प्रकाशित केले.
तुकाराम बीज सोहळा... (375 वर्ष पूर्ण सोहळा ) तीर्थ देहू, झाले सज्ज बीज आज, तुकाराम ।। त्रिशतकोत्तर, अमृतमहोत्सव, हा सण उत्सव, देहू क्षेत्री ।। बीजसोहळा, टाळ मृदंग, भाविक दंग, विठूनाम ।। लाखो भाविक, फुलांची सजावट, दु:खाची वजावट, नाचू रंगे ।। सोळा कॅमेरे, करती देखरेख, रांगोळी रेख, सुबकशी।। चोख व्यवस्था, स्वच्छता कर्मचारी, व्यस्त ते आचारी, वैकुंठस्थान ।। तरले अभंग, जुन्या आठवणी, उचंबळे इंद्रायणी, भेट घेण्या ।। वरून तुका, विमान गरुड अभंग गारुड, पाहतसे ।। अभंग गाथा, एकेक अक्षर, आहे ते अक्षय, अमृताचे ।। अभंग फॉर्म, शब्दप्रतिमा ध्यास, जाणकार अभ्यास, रात्र

गुलकंद शिरा

लेखक Bhakti यांनी रविवार, 16/03/2025 10:39 या दिवशी प्रकाशित केले.
*गुलकंद शिरा* उन्हाळ्या सुरू झालाय.लाहीलाही व्हायला सुरुवात झाली आहे आणि खरंच मन थंड गोष्टींकडे आकर्षित होत आहे.तर आज शिऱ्यावर ताव मारायची इच्छा झालीच होती.